-
Ghar Kaularu (घर कौलारू)
कथाकार, कादंबरीकार, नाटककार, प्रवासवर्णनकार, विनोदकार म्हणून जयवंत दळवी यांचे साहित्यात मोठे योगदान आहे. मात्र कथाकार म्हणून त्यांची रचनाशैली वैविध्यपूर्ण अशीच आहे. वासनांचे, सुखदु:खांचे दशावतार त्यांच्या कथांत दिसतात. आदिम कामेच्छांचे अस्वस्थ करणारे चित्र त्यांच्या साहित्यात आढळते. कामभावनेच्या माणसाच्या मनावर वेगवेगळा झालेला परिणाम ते अतिशय सूक्ष्मपणे रेखाटतात. गहरी प्रेम भावना हा त्यांच्या कथेचा मुख्य विषय आहे. त्यांच्या कथेत काही वेळेस वेडी, अर्धवट पात्रे येतात. जीवनातील विविध क्षेत्रातील विसंगतीचे अचूक व मार्मिक दर्शन घडवायचे व ते घडवताना वाचताना हसवीत अंतमर्र्ुख करावयाचे ही फारच अवघड कसरत आहे व ती फार थोड्यांना साधली. त्यात दळवींचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागते. गंभीर कथालेखनासोबत दळवींनी विनोदी लेख व कथा लिहिल्या. फॅन्टसीच्या दिशेने जाणार्या विक्षिप्त कथा लिहिल्या. मात्र सर्वसाधारणपणे लेखन गंभीर हवे आणि अधूनमधून विनोद यायला हवा हे त्यांनी लेखनातून सिद्ध केले.
-
Pimpalpan Part -14 (पिंपळपान भाग-१४)
Madhu Mangesh Karnik/ Jaywant Dalvi/ Malati Damale/ Shobhana Shiknis/ Madhavi Kunte/ Asha Ratanji/ Bha.La.Mahabalआशयसमृद्ध, भावस्पर्शी कथांच्या रूपानं आजवर अनेक सिद्धहस्त लेखकांच्या लेखणीचा स्पर्श 'मेनका'चं रंगरूप खुलवत राहिला आहे. मनाचा ठाव घेणाऱ्या विलक्षण प्रवाही कथा हे 'मेनका'चं बलस्थान. मराठी भावविश्वाला गेल्या साडेपाच दशकांहून अधिक काळ गुंतवून ठेवणाऱ्या दिग्गज लेखकांच्या विविधरंगी कथा एकत्रित स्वरूपात आणणारं हे पिंपळपान....
-
Chakra (चक्र)
मध्यमवर्गीय मराठी साहित्याला एका नव्या अनुभवविश्र्वाची जोड सहज, सफाईदार आणि सामर्थ्यशील शैलीने मिळवून देणारी ही कादंबरी. गलिच्छ झोपडपट्टीत, गटाराच्याकडेशी जीवजंतूंप्रमाणे वळवळणार्या मानवांच्या एका पुंजक्यावर इथे प्रकाशझोत टाकला गेला आहे. इथे जीवनाला कसलाच आधार नाही. माणसाच्या मूलभूत गरजा पुर्या होण्यापूर्वीच त्या इथे पिळवटून विकृत होतात आणि सफल, सुंदर जीवनाची स्वप्ने प्रत्यक्षात येण्यापूर्वीच परिस्थितीच्या निष्ठूर, अप्रतिहत चक्रात त्यांचा चक्काचूर होतो. जयवंत दळवी यांची ही पहिलीच कादंबरी असली, तरी मराठी वाचकांना ते अपरिचित नाहीत. त्यांच्या आजपर्यंतच्या प्रकाशित साहित्यातील खुसखुशीत अनुभवांच्या चुरचुरती चित्रणाने आणि प्रवाही भाषाशैलीने वाचक प्रभावित झाले. परंतु `चक्र’ कादंबरीमुळे गंभीर जीवनदर्शन आणि भेदक शैली हे त्यांचे विशेष जवळजवळ प्रथमच प्रकाशात येत आहेत.