-
Thembatl Abhal (थेंबातलं आभाळ)
आजच्या सुखवस्तू जगात, वस्तू सुखी आहेत, आणि माणसं मात्र दु:खी; नेमकं काय चुकतंय? आंनदी असणं आणि आनंदाचा मेकअप यातला फरक माणसं विसरली आहेत का? अविरत परिश्रमाने, आई- बाबांनी जे आयुष्य उभ केलं, त्याची किंमत रेडीमेड चंगळवादी युगातल्या मुलांना केव्हा कळणार आहे? सुखामागे धावता धावता दमून गेलेली आजची घरं कधीतरी अंतर्मुख होणार आहेत की नाही ? संवेदनांना साद घालणारा एक तरल अनुभव - 'थेंबातल आभाळ !"
-
Ekantacha Doh (एकांताचा डोह)
कोलाहातून कधीतरी दूरच्या आतल्या गावात जावसं वाटतं ना ? शहरी गजबजाटातून मनातल्यालाल कौलारु घरात नारळी पोफळीच्या बागेत बिलगणा-या गारव्यात कधीतरी सर्वांच्या नकळत गुणगुणावसं वाटतं न द्या टाळी! अशाच मनाच्या गार सावलतीच असतो तो एकांताचा डोह! तिथे कविता, गाणं, नृत्य, चित्र इतकंच काय ह्या एकांत डोहाकाठीच आपण आपल्याला नव्याने सुचत जातो.
-
Jivhalyachae Aarse (जिव्हाळयाचे आरसे)
ज्यांच्यावर अगदी मनापासून प्रेम करावं अशी काही माणसं आयुष्यात येतात, म्हणून तर व्यवहाराच्या डांबरी सडकवाटेला हिरवंगार वळण फुटतं. उन्हाचे रुक्ष क्षणही ही मनं आल्हाददायी करतात. जगण्याला एक सुरेल प्रयोजन देतात. ह्या अनामिक नात्याला खरंच कुठलंही नाव नसतं. नाव नसतं तर म्हणून तर ती चिरंतन सोबतही देतात. हि मनं कधी तुमच्या कचेरीत, कधी वर्गात, कधी अंगणात, कधी घरात अगदी कुठेही भेटतात… कुणाच्याही नकळत ह्या पारदर्शी क्षणांमध्ये आपलं रूप पाहणं हा वेगळाच विरंगुळा होतो… म्हणून हे एकमेकांचे जिव्हाळाचे आरसे !
-
Mothe Lok Chote Hote Tevha
`नोबेल पुरस्कारप्राप्त बंगाली कवी-लेखक रवींद्रनाथ टागोर, चित्रकार पिकासो, शास्त्रज्ञ आयझॅक न्यूटन, आल्बर्ट आइन्स्टाइन, चार्ल्स डार्विन, विन्स्टन चर्चिल, अब्राहम लिंकन, स्वामी विवेकानंद, युरी गागारीन, मार्क ट्वेन, पं. जवाहरलाल नेहरू, नेपोलिअन, कार्ल मार्क्स, स्वा. सावरकर, मार्टिन ल्यूथर किंग, म. धोंडो केशव कर्वे, नेताजी सुभाषचंद्र बोस, लिओ टॉलस्टॉय, राजा राममोहन रॉय, जॉर्ज बर्नार्ड शॉ, हेलन केलर, साने गुरुजी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, चार्ली चॅप्लिन, रामकृष्ण परमहंस... या जगद्विख्यात व्यक्तींच्या थोरत्वाच्या चाहूलखुणा बालपणीच्याच पाऊलवाटेवर उमटू लागल्या. सर्व शक्तिनिशी ते धडपडले, अनेक आघात सहन केले, संघर्ष झेलला, गरिबी सोसली, अथक जिद्दीने, ध्यासाने, ध्येयपूर्तीसाठी त्यांनी जिवाचे रान केले आणि ज्ञानाचा समुद्र पिऊन टाकण्यासाठी ते आतुर झाले. आदर्श नाहीसे होत चाललेल्या आजच्या काळात छोट्यांना ही व्यक्तिचित्रे मानसिक ताकद देतील.
-
Sparshgandh (स्पर्शगंध )
आयुष्यरंगातील अस्वस्थ पदर व्यक्त करणारा, मन ढवळून काढणारा कथासंग्रह. या कथांचे आपणही सहप्रवासी असल्याची अनुभूती देणा-या आगळ्या-वेगळ्या, जिवंत कथांचा अमूल्य ठेवा.
-