-
TaNaPiHiNiPaJa
आपण लहानपणी इंद्रधनुष्याचे सात रंग असे पाठ केले होते. हे पुस्तक म्हणजे द्वारकानाथ संझागीरींच्या आयुष्यातल्या त्या समृद्ध आठवणींच इंद्रधनुष्य आहे. ते त्यांच्या ओघवत्या लेखणीच्या गाडीत बसवून बऱ्याचदा आपल्याला हसवतात, कधी अंतर्मुख करतात तर क्वचित प्रसंगी डोळ्यात एखादा अश्रू उभा करतात आणि जवळपास पन्नास वर्षांच्या कालखंडातून फिरवून आणतात. एका बैठकीत संपवावा असा हा सप्तरंगी प्रवास आहे.
-
Aflatoon Avliyae (अफलातून अवलिये )
द्वारकानाथ संझगिरी यांना आयुष्यातील विविध टप्प्यांवर काही सुप्रसिद्ध तर काही अपरिचित असे अविलीये भेटले आणि त्यांची अफलातून व्यक्तिमत्वं संझगिरींच्या मन:पटलावर कोरली गेली ती कायमचीच! या अफलातून अवलियांची ही लोभसवाणी व्यक्तिचित्रं.
-
Purva Apurva (पूर्व अपूर्व)
"द्वारकानाथ संझगिरीचं हे पुस्तक वाचताना मला असं वाटलं की, ते माझ्यासमोर बसले आहेत आणि त्यांचे पर्यटनाचे अनुभव मला कथन करतायत. त्यांची शैली अशी ओघवती आहे." -विजय तेंडुलकर
-
Phalnichya Deshat (फाळणीच्या देशात)
दक्षिण आफ्रिकेतला वर्णद्वेष. पूर्व आणि पश्चिम जर्मनीला विभागणारी बर्लिन भिंत आणि भारताची फाळणी या सर्व घटना म्हणजे इतिहासाचा अविभाज्य काळा भाग. कालांतराने तो वर्णद्वेष विरघळतोय. भिंत तुटतेय... वारे वाहू लागलेयत. हा नवा इतिहास घडताना, तुटलेली मनंजुळत असलेली पाहताना एका संवेदनाक्षम पत्रकाराच्या मनात उठलेल्या स्पंदनांचं हे एक शब्दरूप...
-
Valli Aani Valli (वल्ली आणि वल्ली)
हे पुस्तक म्हणजे, काही वल्लींवरच्या पूर्वप्रकाशित लेखांचा संग्रह आहे. मी माणसात रमणारा माणूस आहे. माझी एखाद्याशी मैत्री पटकन होते आणि टिकते. तुम्ही मला एकट्याला क्वचित पहाल. मी घोळक्यातला माणूस आहे. खरं तर घोळका जमवून गप्पा मारणे हा माझा सर्वात आवडता छंद आहे. त्यामुळे अस्सल वल्लींवर लिहायला मला आवडतं. क्रिकेट आणि इतर लिखाणातून जेव्हां मला संधी मिळाली तेव्हा मी विविध वल्लींवर लिहिलंय.
-
Mazi Baherkhyali ( माझी बाहेरख्याली )
द्वारकानाथ संझगिरीचं 'माझी बाहेरख्याली' हे पुस्तक म्हणजे जगभरातल्या अनेक अपरिचित ठिकाणांचा बोलका वेध तर आहेच. पण त्याहीपेक्षा जास्त तो एका मार्मिक भाष्यकाराने घेतलेला तिथल्या संस्कृतीचा तिथल्या लोकजीवनाचा वेध आहे. त्यामुळेच यात निवळ प्रवासवर्णन नाही. हृदयाला भिडणाऱ्या, कधी अस्वस्थ करणाऱ्या तर कधी दिलखुलास हसविणा-या अनेक गोष्टी यात आहेत. त्यामुळेच क्रिक्रेटच्या मैदानावर घडणाऱ्या गोष्टींपेक्षा त्याच्या पल्याड दडलेलं एक जग हे पुस्तक वाचता आपल्या डोळ्यापुढे येतं. यातून खूप विलक्षण माणसंही भेटतात. त्यामुळेच पुस्तक हातात घेतल्यावर खाली ठेववत नाही. वेस्ट इंडीजचा यातून घडणारा परिचय तर केवळ अप्रतिम !