-
Jhadajhadti
तुमच्या बागा फुलाव्यात, ऊस मळे झुलावेत, साखर कारखाने निघावेत, यंत्रं चालावीत, तुमच्या घराघरात वीज खेळावी, म्हणून आम्ही आमची गावं आणि आमचं भवितव्य धरणाच्या घशात कोंबलं. विकासाचा नारळ फोडण्यासाठी दगड म्हणून आमची डोकी वापरलीत. खोबरं तुम्हाला मिळालं आणि आम्ही पाण्यासाठी, साध्या स्मशानासाठी भिका मागायच्या.जिवंतपणी आणि मेल्यावरही झडती चालूच. गाव आणि देव पाठीवर बांधून चालणार्या हजारो धरणग्रस्तांची मन सुन्न करणारी कहाणी.
-
Not Gone With The Wind
वाऱ्यासोबत न वाहून गेलेली आणि वाऱ्यावर स्वार झालेली जगातील अव्वल चित्रशिल्पे आणि शब्दशिल्पे!हॉलीवूड-बॉलीवूडच्या अंतर्बाह्य दृष्टीक्षेपासह इटालियन, फ्रेंच , ब्रिटिश अशा अनेक अभिनव चाकोऱ्यांचा, विश्वास पाटील यांनी घेतलेला अभ्यासपूर्ण ललित धांडोळा.शेक्सपिअर, टॉलस्टॉय, जॉन फोर्ड, दोस्तायव्हस्की, गार्बो, सोफिया लॉरेन, थॉमस हार्डी, शरत्चंद्र, डेव्हिड लीन, मार्लन ब्रँडो, स्टॅन्ले क्युब्रिक, रोमन पोलन्स्की, चार्ली चॅप्लीन, स्टीव्हन स्पीलबर्ग, मेहबूब खान, कोपोला, मधुबाला, के. असिफ, इनग्रिड बर्गमन, व्ही. शांताराम असे अवघ्या विश्वाचे अनेक सगेसोयरे या शब्दांगणात तुमच्याशी हृद्गत करतील!
-
Panipat (पानिपत)
महाराष्ट्राच्या पुढ्यात विधात्याने असे शिवधनुष्य कधीच टाकले नसेल. परक्या घुसखोराला हिंदुस्थानबाहेर हाकलून देण्यासाठी मराठी मनगटानेही या शिवधनुष्याला जिद्दीने, इरेसरीने हात घातला. मराठी पठारावरचे असे एक गाव, एक घर एक उंबरठा नव्हता; अशी एखादी जात, पोटजात, बलुता नव्हता, सारा महाराष्ट्र एकदिलाने मौजूद होता. काळाशीही चार हात करीन, प्रलयाशी झुंजता झगडता तुटेन, फुटेन पण मागे हटणार नाही. अशा निश्चयाने पानिपतचा वीर सदाशिवरावभाऊ रणात गाडून उभा राहिला. वैर्याचा विजयाचा आनंद विरून जावा अशी पराक्रमाची शर्थ करून पस्तीस हजार कटिल मराठी स्वारांनी पानिपतावर देह ठेवला. मराठी मातीच्या, मराठी मनाच्या सर्वोच्च सद्गुणांचा अन् दुर्गुणांचा मिलाफ झालेल्या या ऐतिहासिक रणाला नव्या अस्सल कागदपत्रांच्या आधारे जिवंत करणारी कादंबरी.