Manache Vyavasthapan (मनाचे व्यवस्थापन)
मन हे कधीच कोणाला कळत नाही. प्रत्येकाच्या मनी वेगळे विचार असतात. माणूस आनंदी, दुःखी होतो. व्यसनी होतो, क्रोध, मत्सर, तिरस्कार, प्रेम, द्वेष या भावना मनातून उमटतात. मनावर कोणाचेच नियंत्रण नसते, असे म्हणतात; पण संजय पंडित यांनी मन म्हणजे काय याचे रहस्य उलगडले आहे. ‘मनाचे व्यवस्थापन’मधून मनावर नियंत्रण करणे, त्याचे व्यवस्थापन, मन व मेंदू काय कार्य करते, या प्रश्नांची उत्तरे यात मिळतात. मानसशास्त्राच्या कसोटीवरपण वेगळ्या प्रकारे मनाचे प्रत्येक कप्पे यात खुले झाले आहेत. यामुळे आनंददायी, चैतन्यमय जगण्याबरोबरच आत्मविश्वास, धाडस अंगी कसे बाणवायचे याचे धडे यातून मिळतात.