Unbroken (अनब्रोकन)

संदर्भातल्या ठळक बातम्या तुम्ही बाचल्या आहेत, अफवा ऐकल्या आहेत. या साऱ्यांच्या केंद्रस्थानी असलेल्या श्रीकडून आता ही कथा ऐका. दि. २५ ऑगस्ट २०१५. इंद्राणी मुखर्जीसाठी आनंदाचा दिवस होता. घरात वाढदिवसाची जय्यत तयारी झाली होती. त्या दिवशी 'आनंद आश्रम' इथून त्या बाहेर पडल्या, तेव्हा मुंबई पोलीस अधिकाऱ्यांच्या साध्या कपड्यांतल्या एका समूहाने त्यांना हटकलं आणि सारं चित्र बदललं. त्यांची मुलगी शीना बोरा हिच्या खुनाचा त्यांच्यावर आरोप होता. बातमी पसरून त्याबद्दलची अधिकाधिक माहिती उपलब्ध होऊ लागली. एका खळबळजनक खून खटल्याच्या तपासात इंद्राणी अडकल्या. संशयितांची यादी झपाट्याने वाढू लागली. एका भयंकर कारस्थानाची ती सुरुवात होती. बातमी सनसनाटी ठरणार होती प्रसारमाध्यमांना रक्ताचा वास आला होता. पाहता पाहता पत्रकार आणि टी. व्ही. अँकर यांच्या निष्ठठुर पकडीत इंद्राणी आल्या. त्यांचं नाव घराघरांत पोहोचलं. पोटच्या पोरीला ठार केल्याचा आरोप, मोडलेले विवाह, शक्तिशाली व्यावसायिक साम्राज्य, श्रीमंत आणि प्रसिद्ध व्यक्तींचं हेवा करावंसं वाटणारं आयुष्य, सामर्थ्यशाली राजकारणी आणि गुंतागुंतीचं कुटुंब - सारंच होतं. खटला सुरू झाला. त्या संदर्भातल्या बातम्या आणि फोटो टी. व्ही. च्या पडद्यावरून देशाच्या कानाकोपऱ्यांत पोहोचले. उलटसुलट बातम्यांच्या आणि चक्रावून टाकणाऱ्या कथेच्या केंद्रस्थानी असणाऱ्या या स्त्रीबद्दल लोकांचं कुतूहल दिवसागणिक वाढू लागलं. 'अनब्रोकन' या स्मृतिप्रवासात इंद्राणीने हातचं काहीही राखलं नाही. त्यांचं बालपण गुवाहाटी इथे गेलं, १९९०च्या दशकात त्या कोलकात्यात राहिल्या. पुढे स्वप्ननगरी मुंबईत मीडियाने त्यांना उच्चासनावर बसवलं. त्यानंतर भायखळाच्या तुरुंगात 'कैदी नंबर १४६८' म्हणून त्यांनी २४६० दिवस व्यतीत केले. त्यांचा हा संपूर्ण प्रवास त्यांच्याच शब्दांत, अगदी पहिल्यांदा समोर येत आहे. अत्यंत प्रामाणिकपणे कथन केलेल्या या स्मृतिप्रवासात इंद्राणी मानवी नातेसंबंधांच्या नाजूकपणाबद्दल, फसवणूक आणि शोक यांमुळे वाट्याला येणाऱ्या उद्ध्वस्त झालेल्या जीवनाबद्दल आणि माणसाच्या एकंदरीत काटक लवचीकतेबद्दल बोलतात. इतकं सारं घडूनही त्यांच्यातली स्त्री आजही मोडून पडलेली नाही, आजही ती आहे अभंग अनब्रोकन !

Book Details

ADD TO BAG

Other Books From the Category