Sakha Nagjhira (सखा नागझिरा)
सखा नागझिरा हे एक प्रकारे किरण पुरंदरे यांचं जंगलात घालवलेल्या ४०० दिवसाचं आत्मचरित्रच आहे पण त्यात निसर्गातील सगळेच पात्र आहेत. एक निसर्गप्रेमी म्हणून प्रत्येकाने हे पुस्तक वाचायला हवे. हे आपल्याला निसर्गातील चालीरीती आणि एक प्रकारे आपण कोणत्याही जंगलात गेल्यावर कशा प्रकारचं आचरण केलं पाहिजे याचा बोध नक्की आपल्याला होतो.तसेच जंगलात आणि सभोवताली राहणाऱ्या लोकांचं आयुष्य कस असत याची सुद्धा मांडणी खूप चांगल्या प्रकारे लेखकाने या पुस्तकात केली आहे. पुस्तक वाचताना आपण त्या जंगलात फिरत असल्याचा भास आपल्याला होतो आणि एखादा शिकारी पक्षी किंवा शिकारी प्राणी बघितल्यावर त्यांना जेवढा आनंद होतो तेवढाच आपल्यालाही होतो.पुस्तकाबद्दल लिहायला खूप आहे पण पुरंदरेंनी पुस्तकात आपल्या काही भावना व्यक्त केल्या आहेत त्या प्रत्येक निसर्गप्रेमींच्या असतात किंवा असायला पाहिजे.