Sarkari Davakhana (सरकारी दवाखाना)
जेव्हा रुग्णासाठी पैसा संपतो, सोनं गहाण ठेवलं जातं, कधीकधी जमीन विकावी लागते तेव्हा सरकारी दवाखान्याची पायरी दिसू लागते आणि एक प्रवास सुरू होतो... मृत्यूची वाट बघण्याचा! अपघात विभागात घडणाऱ्या घटना, आयसीयूमधील आपल्या व्यक्तीचा मृत्यू, शेवटच्या क्षणी होणारी नातेवाईकांची घालमेल, पोस्टमार्टम करणाऱ्या व्यक्तीचं आयुष्य, डॉक्टर लोकांचं व्यवसायिक आणि खाजगी जीवन, डिलिव्हरी वार्ड! खूप वर्षांनंतर बाळाच्या जन्माचा आनंद... सगळंच वाईट नाही, काही चांगल्याही गोष्टी! सरकारी दवाखान्यातील लावारिस लोक, गर्दी, तिथला वास, कचराकुंडीत नाळेसहीत सापडलेलं बाळ, छातीवर 'मृत्यू' अशा नावाचा टॅटू काढणारा कर्मचारी, म्हाताऱ्यांची प्रेम कहानी, स्वतःच्या हाताने आपल्या मुलाचं व्हेंटिलेटर बंद करणारा बाप... काय नाही या कादंबरीत! हे सगळं सुरू असतानाच घडणारा वेगवान घटनाक्रम आणि दवाखान्याच्या चार भिंतींच्या नकळत घडणारे एक युद्ध! सस्पेन्स थ्रिलरने भरलेला एक फार मोठा गुन्हा... आणि त्याची उकल! एकीकडं माणूस वाचवा म्हणून प्रयत्न करणारी माणसं आणि दुसरीकडं मढ्यावरचं लोणी खाणारी माणसं! ही कादंबरी तुम्हाला जगण्याची आशा देईल, नात्यांचं महत्त्व देईल, माणसाची किंमत देईल... हसणं देईल, रडणं देईल! ही कादंबरी तुम्हाला सोडून गेलेल्या तुमच्या एकातरी माणसाची आठवण करून देईल.