Nikhaltya Choukatit (निखळत्या चौकटीत)

By (author) Anjali Dhamal Publisher Rohan Prakashan

दोन प्रेमिक जवळ येतात तेव्हा निर्माण होते ऊब… त्यांचे रस्ते वेगळे होतात तेव्हा या उबेचा होतो फुफाटा… रागाचा वणवा पेटतो, आरोप-प्रत्यारोपांच्या ज्वाळा धुमसतात… चौकटी निखळू लागतात… नात्यांच्या आणि व्यवस्थेच्या… हळव्या आठवणींनी जीव होरपळून निघतो… स्पर्श आठवले की सल चटके देत राहतात… आणि मग हळूहळू धग कमी होते, ज्वाळा खाली बसतात… शेवटी काय उरतं? आठवणींची राख ? की नव्या दिशांकडे जाणारे वेगवेगळे मार्ग ? की अनुभवलेल्या क्षणांतून आलेलं शहाणपण? गजराची… शैलीची… श्रीरंगची आणि सरिताची, नात्यातल्या नाजूक गाठींची, त्यातल्या गुंत्यांची, जखमांची, प्रश्नांची आणि नव्या शोधांची कादंबरी… निखळत्या चौकटीत

Book Details

ADD TO BAG