-
Udyog Tumcha Paisa Dusryacha (उद्योग तुमचा पैसा दु
आपल्या समाजात उद्योजकांविषयी एक प्रकारचं कुतूहल आणि अनेक प्रकारचे समज-गैरसमज असतात. उद्योगाशी निगडीत अशा अनेक समजुतींचा तसंच तरुणांना व्यवसाय सुरु करण्यास प्रोत्साहन देणाऱ्या घटनांचा उहापोह या पुस्तकात लेखकाने अतिशय रंजकपणे केला आहे. केवळ पैशाचंच पाठबळ असल्यास समजुतीलाच हावरे यांनी छेद दिला आहे. भांडवलासाठी पैसा बाहेरूनही उभा करता येतो, किंबहुना तो बाहेरूनच उभा करायचा असतो. मात्र व्यवसाय करण्यासाठी मुख्य भांडवल तुमच्यापाशी आवर्जून हवं असतं ते दुर्दम्य इच्छाशक्तीचं, आत्मविश्वासाचं व व्यवसायिक वृत्तीचं! हा मुलभुत मंत्र आत्मसात करण्यासाठी आणि पुढे प्रत्यक्षात व्यवसाय वृद्धिंगत करण्यासाठी लागणाऱ्या घटकांची चर्चा ते विस्तृतपणे पुस्तकातून करतात. उद्योगाची उभारणी कशी करावी, आखणी व अंमलबजावणी, ब्रांडींग,प्लनिंग व ग्रोथ कशी करावी असे महत्वाचे विषय त्यांनी यात हाताळले आहेत. जो स्वतःच्या अनुभवातून शिकतो,तो हुशार माणूस समजला जातो पण जो इतरांच्या अनुभवातून शिकतो तो खरा चाणाक्ष माणूस. त्यामुळे नवउद्योजकासाठी किंवा उद्योगात प्रगती साधायची इच्छा असणारया तरुणांसाठी हे अनुभवाचे बोल अत्यंत उपयोगी पडतील. 'उद्योजक हा राष्ट्राची संपत्ती निर्माण करणारा मुख्य घटक असतो' असं मत हावरे आत्मविश्वासपूर्वक व्यक्त करतात. अनेक वर्ष यशस्वीपणे बांधकाम क्षेत्रातील उद्योगधुरा सांभाळणाऱ्या हावरे यांचे अनुभवाचे बोल नव उद्योजकांसाठी नक्कीच प्रेरक व मार्गदर्शक ठरतील.
-
Asahi Pakistan (असाही पाकिस्तान)
साहित्य,संस्कृती व कलाक्षेत्रातील आगळावेगळा पाकिस्तान... पाकिस्तानसारख्या शेजारी समजायला संवेदना हवी आणि राजकीय जाणही. पाकिस्तानला जाऊन, विविध क्षेत्रांमध्ये फिरून घेतलेला अनुभव हवा आणि अभ्यासही हवा. प्रत्यक्ष भेटी-गाठींमधून वेध घेण्याची उच्च पदस्थ वर्तुळातील लोकांबरोबर चर्चाही व्हायला हवी.. पाकिस्तानी साहित्याची ओळख हवी आणि भारत-पाकिस्तानमधील सांस्कृतिक साम्य स्थळांबद्दल आस्था हवी. अरविंद गोखलेंकडे या सर्व गोष्टींबरोबर आहे पत्रकारितेचा प्रदीर्घ अनुभव. त्यातून कसदार झालेली लेखनशैली. पाकिस्तानच्या रस्त्यांवरून केलेली भटकंती-कधी संशयाच्या छायेत तर कधी अनोळखी माणसांनी केलेल्या आदरतिथ्याच्या मायेत. अनेकांच्या परिचयातून समजलेला पाकिस्तान आणि कितीही वाचन-चिंतन केलं तरी गूढ राहिलेला पाकिस्तान. एकाच वेळेस मित्र असूनही शत्रूच्या रुपात भासणारा आणि तरीही नेहमी अनाकलनीय कारणांसाठी आकर्षित करणारा -असा आहे गोखलेंचा पाकिस्तान अर्थात 'असाही पाकिस्तान!'
-
Salle Lakhmolache (सल्ले लाखमोलाचे )
आयुष्यात अनेक माणसं भेटत असतात आणि त्यांच्याकडून कळत-नकळत मोलाचे सल्ले मिळत असतात.बरेचदा आपलं त्याकडे दुर्लक्ष होतं,पण काही जण हे सल्ले किव्हा उपदेश आवर्जून लक्षात ठेवून आचरणात आणतात ,म्हणूनच ते यशस्वी आणि नामवंत होतात! हे जाणूनच विज्ञान -तंत्रज्ञान, बँकिंग, अर्थ , मनोरंजन , जाहिरात ,चित्रपट, वैद्यक ,साहित्य आणि उद्योगव्यवसाय यांसारख्या विविध क्षेत्रांत यशस्वी झालेल्या ५५ नामवंताना उपयुक्त ठरलेल्या बहुमोल सल्ल्यांचे आणि उपदेशांच हे संकलन…. …नातेसंबंध सुधारण्यासाठी , व्यावसायिक कौशल्य वाढवण्यासाठी आणि कार्यक्षेत्र निवडण्यासाठी हे सल्ले तुमच्यासाठी लाखमोलाचे ठरतील . यातलं एखाढ पान तुम्हाला तुमचा समस्येकडे पाहण्याचा वेगळा दृष्टिकोण देउन मनोबलही वाढवेल …आणी पहा तुमचंही जीवन बदलून जाईल!
-
Good Muslim Bad Muslim (गुड मुस्लीम बॅड मुस्लीम)
'चांगला' मुसलमान कोण? 'वाईट' मुसलमान कोण? - हे कुणी ठरवलं? कसं ठरवलं? का ठरवलं? मुळात 'गुड मुस्लीम', 'बॅड मुस्लीम' या संकल्पनांचा व 'राजकीय ओळखीं'चा उद्भदवच कसा झाला? अशा अनेक प्रश्नांच्या अंगाने 'शीत युध्दा'नंतरच्या काळातील जागतिक राजकारणाचं अभ्यासपूर्ण व मार्मिक विश्लेषण करणाऱ्या 'गुड मुस्लीम-बॅड मुस्लीम' या महमूद ममदानी लिखित मूळ इंग्रजी पुस्तकाचा हा अनुवाद. महमूद ममदानी हे एक जागतिक कीर्तीचे अभ्यासक आणि मानववंश शास्त्रज्ञ आहेत. त्यांच्या मते, पाश्चात्त्यांनी जाणीवपूर्वक अशा स्वरूपाच्या सुलभ व्याख्या केल्या की, पाश्चात्त्य संकल्पनांनी संस्कारित तो म्हणजे 'गुड मुस्लीम' आणि आधुनिक-पूर्व विचारांना धरून ठेवणारा वा कडव्या विचारांचा तो 'बॅड मुस्लीम'. एकंदरीतच, १९६०च्या दशकातील व्हिएतनाम युध्द ते '९/११'च्या घटनेनंतरचा काळ या दरम्यान अमेरिका व त्यांच्या पाश्चात्त्य मित्रराष्ट्रांनी आपल्या राजकीय उद्दिष्टांसाठी मुस्लीम समाजसमूहांची 'धार्मिक ओळख' आणि 'राजकीय ओळख' यांची कशी हेतुपुरस्सर सरमिसळ केली आणि त्याचे किती विपरीत परिणाम संभवले, त्याचा उलगडा ममदानी या पुस्तकाद्वारे करू पाहतात. प्रदीर्घ संशोधन व विश्वासार्ह संदर्भांच्या आधारे त्यांनी हे पुस्तक सिध्द केलं आहे. जागतिक राजकारणातील अनेक अज्ञात गोष्टींवर, घटनांवर नव्याने प्रकाश टाकून अनेक गैरसमजुती दूर करू पाहणारं आणि जागतिक शांततेच्या दृष्टीने सर्वांनाच विचारप्रवृत्त करू पाहणारं असं हे पुस्तक... 'गुड मुस्लीम बॅड मुस्लीम!'
-
Tya Daha Varshantil Guru Dutta (त्या दहा वर्षांतील
मी ते दृश्य लिहून पूर्ण करेस्तोवर जवळपास मध्यरात्रीची वेळ झालेली होती. गुरू दत्त यांनी माझ्यासोबत जेवायला बसायचं कबूल केलं होतं, परंतु प्रत्यक्षात त्यांनी काही देखील खाल्लेलं नव्हतं. मला भूक लागलेली असल्याने मी मात्र यथेच्छ जेवलो. ज्या अर्थी गुरू दत्त मद्याचा प्याला लीलया हाती धरून होते, त्या अर्थी ते पिऊन खूप बेहोश झाले होते, अशातली गोष्ट नव्हती. परंतु त्यांची मनोऽवस्था मात्र निश्चितच भयानक होती. मला त्यांना संहिता वाचून दाखवायची होती, पण ते जराही ऐकून घेण्याच्या मनोऽवस्थेत नव्हते. खरंतर त्यातून मला संकेत मिळायला हवा होता. (अबरार अल्वी) गुरू दत्तने अबरारना संहिता रतनकडे ठेवून जाण्यास सांगितलं. ''इफ यू डोन्ट माईंड आय वुड लाइक टू रिटायर,'' असं म्हणून गुरू दत्त उठून उभे राहिले आणि आपल्या खोलीत गेले... ते गुरू दत्तचे अखेरचे शब्द ठरणार होते. गुरू दत्तचे निकटतम सहकारी व जिवलग मित्र अबरार अल्वी यांच्या कथनातून गुरू दत्तच्या व्यक्तिमत्त्वावर व त्याच्या अकाली मृत्यूसह त्याच्या जीवनातील विविध घटनांवर नव्याने प्रकाश. अबरार-गुरू दत्त यांच्या १९५४-६४ दरम्यानच्या सहप्रवासातून साकार झालेल्या 'प्यासा', 'कागज के फूल' व 'साहिब बीबी और गुलाम'सह सर्व चित्रपटांच्या निर्मितीप्रक्रियेचा सूक्ष्म वेध
-
Sahakardhurin (सहकारधुरीण)
भारतातील साखर उद्योगात सहकाराची ध्वजा रोवण्याचं पायाभूत कार्य कार्य करणारे विठ्ठलराव विखे पाटील यांचं समग्र चरित्र. विठ्ठलरावांच्या जीवनाच्या व कार्याच्या विविध टप्प्यांबाबत प्रदीर्घ काळ संशोधन करून सिद्ध केलेला 'सहकारधुरीण' हा समग्र चरित्रग्रंथ.
-
'IT'Gatha('आयटी'गाथा)
'बूमिंग' आयटी उदोयोगाचा इतिहास, प्रवास व विस्तार उलगडून दाखवणारं पुस्तक...