-
Chandrabudhicha Blog (चंद्राबुडीचा ब्लॉग)
कथांचा घाट आणि विषय़ यांचे मोठया प्रमाणात नागरीकरण झालेलं आहे. पण कथांची बीजं छोट्या गावातही असतात. त्यातून विनोदी अंगानी जाणाऱ्या गावातल्या कथा लिहिण्यासाठी केवळ निरीक्षण आणि भाषाशैली पुरेशी नसते; ती भाषा जगलेली असावी लागते. अस्सल वऱ्हाडी भाषा जगणारे आणि ती समर्थपणे उतरवणारे लेखक ही ओळख अशोक मानकरांनी कमावलेली आहे. या कथा लिहिताना ग्रामीण भागावर नव्या तंत्रज्ञानाचा झालेला परिणाम, त्याचं चित्रण करण्यात मानकरांचा हातखंडा आहे. वऱ्हाडी ठेचा आवडणाऱ्यांना आणि त्याची चव न चाखलेल्यांनाही हा कथासंग्रह सारखाच आनंद देईल.
-
Ibru (इब्रु)
प्रियांका पाटील हिच्या कथांमधून भेटणार्या स्त्रिया (आणि पुरुषही) एकविसाव्या शतकातल्या जागतिक मानवी संबंधांच्या परिवर्तनशील पर्यावरणाच्या द्योतक आहेत. हिंदुस्थानात आणि मराठी साहित्यामध्ये तर या लेखिकेच्या काही कथा धक्कादायक व परंपरेला धीटपणे छेद देणार्या ठराव्यात अशाच! लिखाणाची वैशिष्ट्यं पाहता, प्रियांका पाटील ही उद्याची समर्थ कथाकार असू शकेल, हे मी बिनधास्तपणे नमूद करतो. - मधु मंगेश कर्णिक (ज्येष्ठ साहित्यिक) ... नवोदित कथाकारांच्या घोडदौडीत प्रियांका पाटीलचा ‘इब्रु’ हा कथासंग्रह एक वेगळी कथाशैली घेऊन येत आहे, जो माझ्यातल्या वाचकाला स्तब्ध तर करतोच, पण माझ्या आतल्या माणूसपणालादेखील काहीसा अस्वस्थ करून जातो. आपल्यातल्या हरवत चाललेल्या माणूसपणाला साद घालत राहतो. प्रियांका, तुझ्यातल्या व्यथा कथारूपांत येत असताना इतकंच म्हणावंसं वाटतं, की कागद नवा नसेलही, पण शाई नक्कीच नवी आहे! - गजेंद्र अहिरे (निर्माता-लेखक-दिग्दर्शक)
-
Pimpalpan Part 12 (पिंपळपान भाग -१२)
आशयसमृद्घ, भावस्पर्शी कथांच्या रूपानं आजवर अनेक सिद्धहस्त लेखकांच्या लेखणीचा स्पर्श ‘मेनका’चं रंगरूप खुलवत राहिला आहे. मनाचा ठाव घेणार्या विलक्षण प्रवाही कथा हे ‘मेनका’चं बलस्थान. मराठी भावविश्वाला गेल्या साडेपाच दशकांहून अधिक काळ गुंतवून ठेवणार्या दिग्गज लेखकांच्या विविधरंगी कथा एकत्रित स्वरूपात आणणारं हे पिंपळपान...
-
Pimpalpan Part 11 (पिंपळपान भाग -११)
आशयसमृद्घ, भावस्पर्शी कथांच्या रूपानं आजवर अनेक सिद्धहस्त लेखकांच्या लेखणीचा स्पर्श ‘मेनका’चं रंगरूप खुलवत राहिला आहे. मनाचा ठाव घेणार्या विलक्षण प्रवाही कथा हे ‘मेनका’चं बलस्थान. मराठी भावविश्वाला गेल्या साडेपाच दशकांहून अधिक काळ गुंतवून ठेवणार्या दिग्गज लेखकांच्या विविधरंगी कथा एकत्रित स्वरूपात आणणारं हे पिंपळपान