-
Rang Maza Vegla (रंग माझा वेगळा)
डॉ. जगदीश करमळकर यांनी लिहिलेल्या या पुस्तकात चाळीस डॉक्टरांची वैद्यकीय व्यवसायाव्यतिरिक्तच्या क्षेत्रातील मुशाफिरी आहे. वैद्यकीय व्यवसाय सुरू असताना कला, साहित्य, संगीत, अभिनय, क्रीडा अशा दुसऱ्या क्षेत्रात यश मिळवणाऱ्या चाळीस नामवंत व्यक्तींचा परिचय करमळकर यांनी करून दिला आहे. यातील प्रत्येकाला भेटून त्यांच्याशी चर्चा करून हे लेख लिहिलेले असल्याने यात तपशिलातील अचूकता तर आहेच, पण या मंडळींनी दुसऱ्या क्षेत्रातही यशस्वी वाटचाल कशी केली तेही समजते. लेखक झालेले गोडबोले, छायाप्रकाशयात्री जोगळेकर, पक्षीमित्र पांडे, डॉ. सरदेसाई या नामवंत डॉक्टरांसह अन्य अपरिचित अशा डॉक्टरांचीही कामगिरी या पुस्तकामुळे कळते.
-
Bhatkanti Kudal-Vegulyarchi(भटकंती कुडाळ-वेंगुर्ल्
तरुण गिर्यारोहक महेश तेंडूलकर यांचे यांचे कोकणातील कुडाळ आणि वेंगुर्ले या दोन ठिकाणची आणि परिसरातील विविध ठिकाणांची माहिती देणारे हे पुस्तक. पर्यटन म्हणजे केवळ दोन दिवस मौजमजा असे समजणाऱ्या मंडळी[...]
-
Bhatkanti Leh Laddakhchi...
लेह लडाख हा अतिशय दुर्गम प्रदेश असून येथील सौंदर्य अवर्णनीय आहे. या पुस्तकात लेखक प्र. के. घाणेकर, यांनी इथल्या निसर्गाबरोबरच प्राणी, पक्षी, नद्या, एवढेच नाही तर येथील माणसांचेही वर्णन केले आहे. या दूरच्या प्रदेशात कसे जावे, तेथे काय पहावे या महत्वाच्या प्रश्नांबरोबरच तेथे कशासाठी जावे याचेही उत्तर या पुस्तकातून आपल्याला मिळू शकते. अनेक रंगीत चित्रांद्वारेही आपल्याला तेथील परिस्थितीची ओळख होण्यास मदत होते.