-
Dayri Apanga Jagrachi (डायरी अपंग जागराची)
डॉ. त्र्यंबक दुनबळे यांनी 'अली यावर जंग' या राष्ट्रीय श्रवण-विकलांग संस्थेत माध्यम अधिकारी म्हणून दोन दशकांपेक्षाही अधिक काळ व्यतीत केला. कामानिमित्तनं त्यांनी मणिपूरपासून अहमदाबादपर्यंत आणि जम्मूपासून चेन्नईपर्यंत देशभर प्रवास केला. त्यातून आलेल्या अनुभवांतून हे पुस्तक आकाराला आलं आहे. मात्र हे केवळ अनुभव नाहीत, हे संशोधनही आहे. शास्त्रीय माहिती आहे. कार्यकर्त्याच्या, संघटकाच्या भूमिकेतून पाहिलेली माणसे, अनुभव आहेत. हे सर्व येतं ते सोप्या, सुलभ भाषेत. अपंगत्व हे पुस्तकाच्या केंद्रस्थानी आहे. अपंगत्वाचे प्रकार आणि व्याख्याही ते सांगतात. त्यांना आवश्यक असणाऱ्या साधनांची, तंत्रज्ञानाची माहितीही ते देतात. विशेषतः कर्णबधिरपणासंबंधी असं विवेचन क्वचितच वाचायला मिळतं.
-
Adhuri Ek Kahani (अधुरी एक कहाणी)
काश्मिरी वातावरण, गूढ तसंच निसर्गरम्य अशी पार्श्वभूमी लाभलेल्यावेद राहींच्या काही कथांचा हा सरस प्रत्ययकारी अनुवाद.
-
Jamala Tar Ganit (जमलं तर गणित)
गणिताबद्दलची भीती घालवून त्याची रुची वाढविणारे पुस्तक.
-
-
Harwlelya Watewarcha Prawasi ( हरवलेल्या वाटेवरचा
समताधिष्ठित समाजनिर्मिती हा लोकशाही समाजवादी विचारांच्या संघटना व कार्यकर्त्यांच्या चळवळीचा मूळ उद्देश असतो. समाजातील संख्येने अधिक असलेल्या सर्वहारा वर्गाला संघटित करून त्यांना सामाजिक, राजकीय व सांस्कृ़तिकदृष्टय़ा सक्षम करण्याचं आव्हान स्वीकारणाऱ्या आणि त्यासाठी प्रसंगी प्रखर संघर्ष करणाऱ्या कार्यकर्त्यांची फळीच एकेकाळी महाराष्ट्रात होती. त्यातील एक म्हणजे नाशिकचे ज्येष्ठ समाजवादी कार्यकत्रे शांताराम चव्हाण. नाशिक शहर व परिसरातील हातगाडीवाले, चहाच्या टपरीवाले, रॉकेल, फळविक्रेते तसेच भंगार वेचणाऱ्या असंघटित क्षेत्रातील कष्टकऱ्यांना त्यांचा न्याय्य हक्क मिळवून देण्यासाठी तब्बल ३० वष्रे एकहाती संघर्ष करणाऱ्या चव्हाण यांचं नुकतंच प्रकाशित झालेलं 'हरवलेल्या वाटेवरचा प्रवासी' हे आत्मचरित्रपर पुस्तक वाचताना त्यांच्या लढाऊ बाण्याचं पानोपानी दर्शन होतं.
-
Deshodeshichya Vivek Pantapradhan (देशोदेशीच्या पं
जगात अनेक देशांच्या प्रमुखपदी महिलांची निवड झाली. आपल्याला इंदिरा गांधी यांचे कर्तृत्व आणि त्यांचे कार्य माहीत आहे. त्यानंतर अन्य देशांतील काही महिला पंतप्रधान माहीत असतात. पण जगात 193 देशांपैकी पन्नास देशांत पंतप्रधानपदावर किमान एकदा तरी महिला निवडली गेली आहे. या महिला पंतप्रधांनाची ओळख या पुस्तकामुळे होते. अर्थात या पदावर निवडल्या गेलेल्या महिलांना आपला कार्यकाळ पूर्ण करताच आला, असे नाही. यापैकी काहींना केवळ दोन दिवस काम करता आले, तर काही जणींना 15 वर्षांचा काळ मिळाला. महिला पंतप्रधान निवडण्यामध्ये केवळ प्रगत देशच होते असे नाही, तर विकसनशील आणि आफ्रिका खंडातील अविकसित देशांनीही पंतप्रधानपदी महिलांची निवड केली आहे. या पंतप्रधान, त्यांचा कार्यकाळ, ते देश आणि त्यांच्याबद्दलची रोचक माहिती या शिल्पा विवेक बेळे यांनी या पुस्तकात दिली आहे.
-
Kahi Oli Anubhavavya (काही ओळी अनुभवाव्या)
काही कविता कायमच्या आठवणींत राहतात. काही मनात घर करून राहतात. काही श्रेष्ठच असतात. अशा निवडक कवितांचा भुंग्याच्या गुणाने घेतलेला कवितांचा हा रसास्वाद.