-
Tata Pravas Mulyadhishthit Jaganyacha (टाटा प्रवास मूल्याधिष्ठित जगण्याचा)
जे. एन. टाटा स्कॉलर आणि सुवर्णपदक विजेते टी. आर. डुंगाजी, 'डॉन' या नावाने प्रसिद्ध आहेत. राज्यशास्त्रातील दोन मास्टर्स पदव्या मिळवणारे डॉन जबलपूर आणि बर्कल विद्यापीठांचे माजी विद्यार्थी असून, डिसेंबर १९६६ मध्ये ते टाटा स्टील कंपनीत रुजू झाले. तिथे त्यांनी व्यवस्थापकीय संचालक पदापर्यंत वाटचाल केली. टाटा स्टीलशी संबधित दोन कंपन्यांच्या कामकाजातील महत्त्वपूर्ण बदलाच्या काळात त्यांच्याकडे नेतृत्व होते. त्याशिवाय कॉनकॉर आणि फोर्ब्स अँड कंपनी लि. या कंपन्यांचे स्वतंत्र संचालक (Independent Director) म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. २०११ मध्ये, डॉन यांनी 'क्रेडिबिलिटी कन्सल्टिंग' ही स्वतःची सल्लागार कंपनी सुरू केली. तसेच दोन मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट्स मध्ये त्यांनी 'बिझनेस एक्सलन्स डीन' म्हणूनही काम केले आहे. सोबतच मुंबईतील प्रसिद्ध छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालयाचे (पूर्वीचे प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम) विश्वस्त म्हणूनही त्यांनी काही काळ काम पाहिले. सध्या ते फोर्ब्स चॅरिटेबल ट्रस्टवरही विश्वस्त म्हणून कार्यरत आहेत. टाटा कुटुंबातील दिग्गजांच्या कार्यशैलीने प्रभावित झालेले डॉन, व्यवस्थापन हे मूलतः एक आध्यात्मिक कार्य (spiritual pursuit) आहे असे मानतात. त्यातूनच क्रेडिबिलिटी ( Credibility), कल्चर ( Culture) आणि कम्युनिकेशन (Communication) या तीन मूल्यांवर त्यांनी कायम भर दिला आहे. सन १९९२ मध्ये त्यांना युवा रत्न पुरस्कार मिळाला. ब्रसेल्स येथील 'इंटरनॅशनल असोसिएशन फॉर ह्युमन व्हॅल्यूज' चा 'एथिक्स इन बिझनेस अवॉर्ड, २००६' हा सन्मान मिळवणारे पहिले मानकरी आहेत. "डॉन डुंगाजी यानी 'टाटा मूल्ये' म्हणजे काय याचा पुरेपूर अनुभव तब्बल चार दशकांच्या कार्यकाळात घेतला आहे. टाटांच्या या तत्त्वज्ञान आणि संस्कृतीने त्यांना कसे सामावून घेतले आणि त्याच 'टाटा मार्गा' ने परिवर्तन घडवून आणताना समाधान कसे लाभले, याविषयी त्यांनी या पुस्तकात सविस्तर लिहिले आहे. हे पुस्तक म्हणजे टाटा समूहाच्या सेवेत वाहून घेतलेल्या एका ध्येयवादी सहकाऱ्याने त्या समूहाला वाहिलेली आदरांजली आहे. " रतन टाटा (मानद अध्यक्ष, टाटा सन्स लि.) “पाच दशकांपूर्वी, टाटा समूहात मी आणि डॉन डुंगाजी एकाच वेळी, एकाच ठिकाणी टाटा स्टिलच्या कार्यालयात रुजू झालो. आमचे कार्यालय समूहाचे अध्यक्ष जेआरडी टाटा यांच्या कार्यालयालगत होते. आम्ही दोघांनीही आमच्या पहिल्या नोकरीत, 'टाटा मार्ग' आणि 'टाटा मूल्ये' शिकत कामाला सुरूवात केली. पंचवीस वर्षे मी त्यात आकंठ बुडालेलो होता. व्यवसायाच्या सगळ्या संकल्पना, नीतिमत्ता यांना तेथेच आकार मिळाला. त्यानंतर मी दुसरीकडे गेलो. डॉन मात्र शेवटपर्यंत समूहाबरोबच राहिला. तिथे तो जे शिकला आणि ज्या पद्धतीने त्याने ते सारे आत्मसात केले तो सगळा प्रवास हाच चांगुलपणा, मूल्याधारित, व्यवसाय व्यवस्थापनाचा 'टाटा मार्ग' आहे. ' अरुण मायरा (माजी सदस्य, नियोजित आयोग, भारत सरकार )