-
Gruhini-Mitra Athva Hajar Pakakriya (गृहिणी-मित्र अथवा हजार पाकक्रिया)
`गृहिणीमित्र अथवा हजार पाकक्रिया’ हा या विविधकलानिपुण लेखिकेने लिहिलेला अनुभवसिद्ध ग्रंथ, म्हणजे गेल्या काही पिढ्यांतील महाराष्ट्रीय भगिनींचा पाककलेवरील नित्योपयोगी आधार ग्रंथ. शाकाहारी, मत्स्याहारी व मांसाहारी अशा सर्व भिन्नरुची पाककृतींबरोबरच आजारी व्यक्तींसाठी दिलेले पथ्यकर पदार्थ हे या ग्रंथाचे विशेष होत. 1910 साली प्रथम प्रसिद्ध झालेल्या या पुस्तकाच्या यापूर्वीच एकोणीस आवृत्त्या खपल्या, हेच याच्या उपयुक्ततेचे गमक म्हटले पाहिजे. डिसेंबर, 1968 मध्ये निघालेली सोळावी आवृत्ती संपल्यावर, तेरा वर्षे हे पुस्तक दुर्मिळ होत. मूळ लेखिका कै. लक्ष्मीबाई धुरंधर यांनी 70 वर्षांपूर्वी लिहिलेल्या ह्या पुस्तकाची 19वी आवृत्ती त्यांच्या नातसून श्रीमती सुधा गोरक्षकर यांनी परिश्रमपूर्वक संकलित व संस्कारित केली होती. आता ही 20 वी आवृत्ती प्रसिद्ध होत आहे. आजच्या महाराष्ट्रीय गृहिणी तिचे यथोचित स्वागत करतीलच.