-
21 Vya Shatakakarita Smart Brain (२१ व्या शतकाकरिता स्मार्ट ब्रेन)
२१ व्या शतकात यशस्वी होण्याकरिता केवळ ज्ञान, पदवी किंवा कष्ट पुरेसे नाहीत, तर आवश्यक आहे तो स्मार्ट ब्रेन, म्हणजेच जागृत, प्रशिक्षित आणि सर्जनशील मेंदू! सिद्धहस्त लेखक, व्याख्याते आणि सुप्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉ. उल्हास कोल्हटकर यांचे हे पुस्तक मेंदूची रचना व कार्यपद्धती सोप्या भाषेत समजावून सांगते. तसेच तुमची • विचारशक्ती • स्मरणशक्ती • एकाग्रता • निर्णयक्षमता • सर्जनशीलता • भावनिक बुद्ध्यांक यांचा विकास करण्यासाठी मेंदूच्या अपहरणकर्त्यांपासून कसे सावध राहावे आणि आधुनिक विज्ञान व पारंपरिक वैद्यक (आयुर्वेद) यांच्या मदतीने नेमके काय करावे, याचे सोप्या भाषेत मार्गदर्शन करते.
-
Rahasya Dirghayushyache Bhag 2 (रहस्य दीर्घायुष्याचे भाग २)
प्रत्येक माणसाला आपण दीर्घायुषी व्हावे असे वाटते; परंतु केवळ दीर्घायुष्य नव्हे, तर निरोगी आणि आनंदी जीवन जगणेही तितकेच महत्त्वाचे आहे. आयुर्वेद आणि आधुनिक वैद्यकशास्त्र यांचा उत्कृष्ट मिलाफ साधून आहार-विहार आणि सद्विचार यांविषयी मार्गदर्शन करणारे ‘रहस्य दीर्घायुष्याचे – भाग 2’ हे पुस्तक वाचकांसाठी एक वेगळा दृष्टिकोन घेऊन येते. दीर्घायुष्याबरोबरच आरोग्यपूर्ण जीवन (Health Span) आणि एकूण आयुष्यकाल (Life Span) यांतील महत्त्वाचा फरक समजून घेण्यास हे पुस्तक मदत करते. आरोग्याविषयी जागरूक असणाऱ्या आणि जीवनशैली अधिक चांगली बनवू इच्छिणाऱ्या वाचकांसाठी हे पुस्तक उपयुक्त ठरू शकते. पुस्तकाची वैशिष्ट्ये आयुर्वेद आणि आधुनिक वैद्यकशास्त्र यांचा समन्वय. आहार, विहार आणि सद्विचार यांचे महत्त्व. निरोगी व दीर्घायुष्याच्या संकल्पनेची ओळख. आरोग्यपूर्ण जीवन आणि आयुष्यकाल यांविषयी मार्गदर्शन
-
Rahasya Dirghayushyache Bhag 1 (रहस्य दीर्घायुष्याचे भाग १)
दीर्घायुष्याचे रहस्य नेमके काय आहे? निरोगी आणि आनंदी जीवन जगण्यासाठी कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत? ‘रहस्य दीर्घायुष्याचे’ या पुस्तकात डॉ. उल्हास कोल्हटकर यांनी दीर्घायुष्य, आरोग्य आणि जीवनशैली यांविषयी उपयुक्त मार्गदर्शन केले आहे. केवळ औषधांवर अवलंबून न राहता योग्य आहार-विहार, सदाचार आणि आरोग्यदायी सवयींच्या माध्यमातून निरामय जीवन कसे जगता येईल, याची माहिती या पुस्तकातून मिळते. आयुर्वेद आणि आधुनिक विज्ञान यांचा समन्वय साधत आरोग्य, जीवनशैली आणि दीर्घायुष्य यांविषयी जाणून घेण्यासाठी हे पुस्तक नक्की वाचा
-
Aplya Potache Arogya (आपल्या पोटाचे आरोग्य)
डॉ. उल्हास कोल्हटकर यांनी बदलती जीवनशैली, वाढते आजार आणि पचनसंस्थेशी निगडित समस्या लक्षात घेऊन आपले शरीर आणि पोट घरात बसून सोप्या पद्धतीने कसे सुदृढ व निरोगी ठेवावे, याचे मार्गदर्शन या पुस्तकात केले आहे.