-
Nabhitun Ugavlelya Vrukshacha Rahasya (नाभितून उगव
खूप वर्षांनी भेटलेले मित्रं सोशल मीडियामुळे ‘कनेक्टेड’ असले, तरी प्रत्यक्षात मात्र बरेच बदललेले असतात. हा ताण त्यांच्या मैत्रीची ‘छत्री’ कशीबशी पेलत राहते... आर्थिक मंदी, ‘आयटी’तले लेऑफ यांमुळे कोलमडू लागलेलं एका जोडप्याचं आयुष्य एक साधा ‘भाजीवाला’ सावरू पाहतो, अन् अचानक गायब होऊन जातो... आचकट बोलणार्या ‘ट’च्या मनात कितीतरी वर्षं एक जखम ठसठसत असते, आणि ती जेव्हा उघडी पडते तेव्हा एक ‘टची गोष्ट’ समोर येते... आधुनिक जगण्याच्या रेट्यात आर्यन-संजिताची मनं एकमेकांपासून एवढी दुरावत जातात, की संबंधांचं ‘अॅबॉर्शन’ होणार आहे हे त्यांना समजत नाही... एका साध्याशा पोस्टमुळे सुरू झालेल्या चर्चेतून जेव्हा ‘अभ्र्यांमागे दडलेल्या फँड्री’चा भेसूर चेहरा समोर येतो तेव्हा सुन्न व्हायला होतं... आपण कुठून आलो, या प्रश्नाचा शोध घेत जेव्हा एक गर्भ भूत-वर्तमान-भविष्य अशा तिन्ही काळात संचार करू लागतो, तेव्हा ‘नाभितून उगवलेल्या वृक्षाच्या रहस्या’चा गुंतागुंतीचा गोफ विणला जातो... जगण्यातल्या ताणांचा, पेचांचा-गुंत्यांचा आणि प्रश्नांचा सखोल वेध घेणार्या, वास्तव-कल्पित व मिथककथा यांच्या बांधणीतून तयार झालेल्या ‘आजच्या काळाच्या’ आठ कथांचा संग्रह!
-
A.P.J.Abadul Kalam Ani Srujan Pal Singh Vidnyacha
भारताचे माजी राष्टपती, ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि मुलांचे लाडके 'शिक्षक' ए.पी.जे.अब्दुल कलाम आणि विख्यात तरुण लेखक सृजन पाल सिंग यांनी सखोल संशोधनातून हे पुस्तक साकारलं आहे. यात विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा अतुलनीय कामगिरीने आपण काय साध्य केलं आहे व त्याचे आपल्या भविष्यावर काय परिणाम होणार आहेत, याची रंजक माहिती देण्यात आली आहे. या पुस्तकातून त्यांनी भविष्यकालीन विज्ञानाचा, त्यातील क्षेत्रांचा वेध घेवून त्याविषयीचा व्यापक चित्र आजच्या विद्याथ्यापुढे उभं केलं आहे. तसंच भविष्यात विज्ञानात मोठ्या प्रमाणावर विकसित होणाऱ्या रोबोटिक्स, एरोनॉटिक्स (विमानविद्या), स्पेस सायन्स (अंतराळ विज्ञान), नुरोसायन्स (मेंदू विज्ञान) यासारखा 'आउट ऑफ द बॉक्स' कॅरीरचा सहजसोप्या भाषेत, सखोल परिचय करून दिला आहे. पुस्तकाची रचना वैशिष्ट्यपूर्ण असून प्रत्येक प्रकरणात त्या त्या शास्त्राची ओळख, त्याची व्याप्ती, तो विषय शिकवणाऱ्या शिक्षकांशी साधलेला संवाद, एका तज्ञाची मुलाखत आणि पालकांसाठी काही टिप्सही देण्यात आल्या आहेत.