lavachikata Anandi Jivanachi Kala(लवचीकता - आनंदी

जेव्हा गौरांग दास यांनी सांगितलेल्या गोष्टी तुम्ही तुमच्या जीवनामध्ये वापराल तेव्हा निश्चितच तुमचं हृदयपरिवर्तन होईल. तुम्हाला एका वेगळ्याच शांततेचा अनुभव मिळेल. यामुळे तुम्ही जास्त प्रभावीपणे निर्णय घेऊ शकाल आणि योग्य दिशेने प्रगती करू शकाल. त्यांचं जीवन आणि शिकवणीमुळे मी अतिशय प्रभावित झालो आहे. आता तीच शिकवण या पुस्तकरूपाने तुमच्यासाठी उपलब्ध झाली आहे. - जय शेट्टी, ‘न्यूयॉर्क टाइम्स’चे बेस्टसेलर लेखक * तुम्ही अति विचारांच्या गर्तेमध्ये हरवलेले आहात का? * कोणता निर्णय घ्यावा, या विचारांनी तुमची झोप उडाली आहे का? * जीवन, कामधंदा आणि नातेसंबंध या सगळ्या गोष्टींमध्ये प्रगती करून जीवनाला जास्त चांगला अर्थ प्राप्त व्हावा असं तुम्हाला वाटतं का? * आईन्स्टाईन एकदा म्हणाले होते की, ज्ञान हे शाळेत जाण्यामुळेच मिळतं असं नाही तर जीवनभर ते मिळवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांनी ते प्राप्त होत असतं. तुमची शोधमोहीम या पुस्तकाच्या माध्यमातून जास्त चांगल्या प्रकारे सुरू होऊ शकते. या पुस्तकातील महान कथा आणि त्यामधून घ्यावयाचा बोध याच्या माध्यमातून गौरांग दास हे आपल्याला एका वेगळ्याच यात्रेवर घेऊन जातात. अपेक्षांच्या आणि अस्वीकृतीच्या दर्‍याखोर्‍यांमधून पलीकडे जाऊन आपल्याला आपल्या खर्‍या अस्तित्वाची ओळख करून देतात. यामुळे आपल्या हृदयाची दारं खुली होतात आणि आपल्याला खर्‍या आध्यात्मिक अस्तित्वाची जाणीव होते. गौरांग दासजी आपल्यामध्ये असलेलं असामान्य सामर्थ्य आणि लपलेल्या गोष्टींची आपल्याला जाणीव करून देतात. विवेक बिंद्रा, बड़ा बिझनेसचे संस्थापक आणि सीईओ. गोष्टींच्या माध्यमातून अमूल्य असा संदेश देणारे गौरांग दास हे माझे प्रेरणास्थान आहेत. कथा सांगण्याची त्यांची शैली ही अतिशय वैशिष्ट्यपूर्ण, प्रगल्भ, सहज पण तितकीच प्रभावीही आहे.- राधाकृष्णण पिल्लई, लेखक आणि चाणक्य इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ लीडरशीप स्टडीजचे संचालक. यशाचे मापदंड हे जागतिक स्तरावरील व्यावसायिकांसाठी कालानुरूप बदलत चाललेले आहेत. पण या पुस्तकामधून आपल्याला हेच पाहायला मिळतं कीकितीही परिवर्तन झालं तरीही काही गोष्टी या कधीच बदलत नाहीत. त्यामुळेच यशाची खरी परिभाषा समोर येते.- अजय पिरामल.

Book Details

ADD TO BAG

Other Books From the Category