Shikhandi Aani Na Sangitalya Janarya Katha (शिखंडी आणि न सांगितल्या जाणाऱ्या कथा)
पितृसत्ताक व्यवस्था म्हणते कि पुरुष हे स्त्रियांपेक्षा श्रेष्ठ आहेत. स्त्रीवाद स्पष्ट करतो की स्त्री आणि पुरुष सामान आहेत. भिन्नत्व विचारते की पुरुषत्व म्हणजे काय आणि स्त्रीत्व म्हणजे काय. भारतीय पुराणशास्त्राचे अभ्यासक देवदत्त पटनायक म्हणतात, भिन्नत्त्व हे फक्त आधुनिक, पाश्चात्य किंवा लैंगिकच असते असं नाही. हिंदू धर्मातील लेखी आणि मौखिक परंपरांचं नीट निरीक्षण करा, त्यातील काही परंपरा तर दोन हजार वर्षांपूर्वीच्या आहेत. त्यांत ' शिखंडी' सारख्या काही दुर्लक्षित कथा दिसतील. पत्नीला तृप्त करण्यासाठी शिखंडी पुरुष बनली होती. महादेवांन भक्तिणीच्या लेकीची प्रसूती करण्यासाठी स्त्रीरूप घेतलं होतं. पाटील ज्ञान मिळावं म्हणून चूडाला पुरुष बनली होती. सामवान आपल्या मित्राची पत्नी बनला होता. अशा बऱ्याच कथा तुम्हाला आढळून येतील. खेळकर आणि हृदयस्पर्शी असलेल्या आणि कधीकधी अस्वस्थही करणाऱ्या या कहाण्यांची तुलना त्यांच्या समकालीन मेसापोटेमियन, ग्रीक, चिनी आणि बायबली कहाण्यांशी आपण करतो तेव्हा ह्या वेगळेपणाचा अर्थ लावण्याचा खास भारतीय दृष्टिकोन आपल्यासमोर उघड होतो.