-
KalyaMalya - Bhingolya (काळ्यामाळ्या-भिंगोळ्या)
कृष्णात खोतांची काळ्यामाळ्या भिंगोळ्या काय काय आहे ? शिक्षणाच्या बाजारात फोफाट माजलेल्या आर्थिक, नैतिक आणि बौद्धिक भ्रष्टाचाराच्या वर्तमान वास्तवाचा त्रिमितिक एक्सरे. आधुनिक मराठी साहित्याच्या देशीवादी गद्य परंपरेतील महत्त्वाचा नवा आविष्कार. कादंबरीकाराच्या सामाजिक सभानतेशी एकरूप कथन- नीतिमत्ता कशी असावी याचे उत्कृष्ट उदाहरण. ग्रामीण महाराष्ट्रात समाजाच्या सर्वच स्तरावर खोल आत घुसलेली कीड, किडनी विकून जगणाऱ्या शालेय शिक्षकाच्या आणि आत्महत्यांच्या कड्याकडे ढकलल्या गेलेल्या, कोंडीत सापडलेल्याच्या नजरेतून क्षण-दर-क्षण टिपणारा 'समक्ष' अनुभव वृत्तांत. 'आपण दगडं फोडलेली बरी. इथं माणसाला माणूस म्हणून काहीच कसं ऐकायला येत नाही? आपल्या या व्यवस्थेनं मातीच्या गोळ्यांचं दगड तर घडवलं नाहीत?', विचारत, व्यवस्थेचा दगड फोडून दाखवणारी. भारतीय साहित्यात क्लासिक मानल्या गेलेल्या श्रीलाल शुक्लांच्या 'राग दरबारी'च्या कसाची, दमदार राजकीय-वृत्तांत कादंबरी. - गणेश देवी"
-
Vyavasay Sutra (व्यवसाय सूत्र)
व्यवसाय व्यवस्थापनातील भारतीय दृष्टिकोनास अधोरेखित करणाऱ्या या पुस्तकात नेतृत्व प्रशिक्षक आणि पौराणिक कथांचे अभ्यासक देवदत्त पट्टनायक यांनी या विषयातील वस्तुनिष्ठतेच्या दिखाव्यास बाजूला सारले आहे. पाश्चिमात्य श्रद्धांमध्ये रुतलेले आधुनिक व्यवसाय व्यवस्थापनाचे निकष, त्यातील उद्दिष्टपूर्तींबाबत त्यांची असलेली कठोर आसक्ती आणि भागधारकांचे वाढते महत्त्व हे देवदत्त यांनी या पुस्तकात विस्तृत मांडलेले आहे. उलटपक्षी, व्यवसाय करण्यातील भारतीय पद्धत – जी भारतीय पौराणिक कथांमध्ये तर दिसून येते, पण प्रत्यक्ष व्यवस्थापनात मात्र तिचा उपयोग केला जात नाही – ही पद्धत कशारीतीने सर्वसमावेशकतेचा पुरस्कार करणारी आहे, सापेक्षता आणि वैविध्य बाळगणारी आहे आणि ध्येयपूर्तीतीच्या प्रत्येक स्तरावरील सर्वंकष यशप्राप्तीचा ती कशा प्रकारे विचार करते, हे विशद केलेलं आहे.
-
Ravan Ani Eddie (रावण आणि एडी)
ब्रिटिश वसाहतीनंतरच्या भारतातल्या दोन कल्पनातीत हिरोंच्या जीवनात घडणाऱ्या वात्रट व साहसी कृत्यांची एक अतिशय विनोदी, 'रिबल्ड' कादंबरी.
-
Melelya Lekhakanchya Chaukashiche Prakaran (मेलेल्
जे लोक आज पुस्तके जाळतात ते एक दिवस माणसे जाळू लागतील.” अठराव्या शतकातील जर्मन लेखक हेन्रिक हें यांचं हे प्रसिद्ध वाक्य जणू या कादंबरीचा गाभा आहे असं म्हणता येईल. मानवी इतिहासात अनेक तत्त्वचिंतकांनी आणि तत्त्वप्रणालींनी ‘मी’, ‘स्व’ किंवा मानव एजन्सी असणं यांबद्दल महत्त्वाची मांडणी केलेली आहे. अर्थातच त्यांच्या एकंदर तत्त्वविचारातील तो एक घटक होता. असा घटक, ज्याचा विचार सामाजिक-राजकीय वास्तव, ते मानवी अस्तित्वविषयक प्रश्न, ते नैतिक मूल्यव्यवस्था, ते भावनिक प्रेरणाविश्व अशा व्यापक अवकाशावर पसरलेला होता. काही विचारवंतांचे ‘मी कोण’बद्दलचे असे काही विचार माझ्या दृष्टिकोनातून अशाप्रकारे गुंफावेंत की, त्याला माझी म्हणून काही चौकात असावी, समकालीन राजकीय संदर्भ असावेत, हा लेखकाचा या साहित्यकृतीच्या निर्मितीमागचा हेतू आहे. असा प्रयत्न करणारं हे एक फिक्शन आहे, एक कल्पित आहे, थोडंसं ललितही आहे. या लिखाणाला कादंबरी म्हणता येईल की नाही याबद्दल जरी मतभेद संभवले तरी आजमितीस अनेक गोष्टींच्या व्याख्याच बदलत आहेत त्यामुळे कादंबरीच्या शैलीचा आणि आशयाचा हा एक नवीन प्रयोग म्हणता येईल. या कादंबरीत लेखकाने उपस्थित केलेला प्रश्न सोपा नाही, या कोड्याला एकाच एक उत्तरही नाही. पण या कोड्याशी झुंजताना लेखकाला जे समाधान मिळालं, जो आनंद मिळाला तसाच आनंद कदाचित वाचकांनाही मिळेल. मात्र लेखकाचं म्हणणं समजून घेत, नव्या शैलीशी जुळवून घेत नेटाने वाचण्याची जिद्द मात्र हवी
-
Dhag (धग)
ही कादंबरी पूर्णतः ग्रामीण वातावरणातील आहे.तिच्यातील बोली वर्हाडी आहे.प्रादेशिक कादंबरी म्हणून तिचा कुणी गौरवाने उल्लेख करतात ,तर प्रादेशिकता हे वास्तववादाचेच विस्तृतीकरण असल्यामुळे ते वाड्मयमूल्य होऊ शकत नाही,अशीही बाजू मांडली जाते.
-
Lokakatha 78 Aani Tyavishayee Sarvakahi (लोककथा ७८
‘लोककथा’७८’ हे चाळीस वर्षांपूर्वी रंगभूमीवर आलेले नाटक त्यातील भेदक सामाजिक आशय आणि रंगमंचीय सादरीकरणातील वेगळेपणा यांमुळे बरेच चर्चेत आले. गेल्या चाळीस वर्षांत स्वतः लेखक रत्नाकर मतकरी, मराठीतले अनेक मोठे समीक्षक, पत्रकार, या नाटकात काम केलेले कलाकार अशा अनेकांनी या नाटकाविषयीच्या आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. नाटकातून व्यक्त होणाऱ्या आशयामुळे आजही महत्त्वाच्या असलेल्या या नाटकावरील प्रतिक्रिया या पुस्तकात समाविष्ट केल्या आहेत. त्याबरोबरच मूळ नाटकाची रत्नाकर मतकरींनी नव्याने वाढवलेली संहिताही यात समाविष्ट केली आहे.
-
Putting Women First-Grameen Bhagateel Striya Ani T
जेव्हा जागतिकीकरण आणि मुक्त आर्थिक व्यवहाराचे वारे भारतीय उपखंडातून वाहू लागले, तेव्हा ग्रामीण कुटुंबे त्यामुळे होणाऱ्या आर्थिक, सामाजिक आणि व्यक्तिगत परिणामांसाठी तयार नसल्याने भरडली जाऊ लागली. विोषतः शिक्षण, माहिती, साधनसंपत्ती या क्षेत्रांत फार मोठे फरक जाणवू लागले. खाण्यापिण्याच्या सवयी, पोशाखाची पद्धत, माणसांचं दिसणं, वागणं या सगळ्यात बदल झाल्यामुळे जीवनपद्धतीच बदलली आणि या सगळ्याचा परिणाम माणसामाणसांतली नाती, आरोग्य आणि आयुष्यावर होऊ लागला. राणी बंग यांच्यासारखे डॉक्टर या लोकांच्या जवळून सान्निध्यात असतात आणि त्यांच्याकडून होईल तेवढा जास्तीत जास्त प्रयत्न करून या समाजाभोवती झालेली समस्यांची कोंडी फोडून मार्ग काढण्याचा प्रयत्न करतात. या समस्या म्हणजे लैंगिक संबंधातून पसरणारे रोग, नको असलेले गर्भ, दारूचं व्यसन, तीव्र निराशा, सैल होत चाललेले कौटुंबिक आणि सामाजिक बंध वगैरे वगैरे. हे पुस्तक आपल्याला ग्रामीण स्त्रीपुरुषांच्या कहाण्या सांगतं. हे स्त्रीपुरुष इतक्या वर्षांत बंगबार्इंच्या दवाखान्यात आलेले. त्यांनी त्यांचे प्रश्न कसे सोडवले, त्यांचे आपापसांतले नातेसंबंध कसे होते, त्यांवर कसा परिणाम झाला नि आजही होतो आहे हे आपल्याला यात वाचायला मिळतं. आणि या कहाण्या वाचत असताना एक सत्य उमगतं की, माणसांचा भूगोल, संस्कृती, वर्ण आणि वर्ग वेगवेगळे असले तरी बऱ्याच समस्या या वैश्विक असतात.