Part Of The Pride (पार्ट ऑफ द प्राइड)

प्राणीशास्त्रज्ञ आणि प्राणी वर्तनशास्त्रज्ञ म्हणून दक्षिण आफ्रिकेतील एका सिंह उद्यानात काम करणार्‍या तरुण मनुष्य प्राण्याची ही अनोखी कहाणी. लहानपणापासून छोट्या-मोठ्या प्राणी–पक्षी(घरात पाळता येतील) अशांना पाळून, त्यांचं संगोपन करून- त्यांचं बारकाईनं निरिक्षण करण्याची त्याची सवय त्याला सिंहाच्या मनीचे भाव वाचायला मदत करते. मनुष्य प्राण्याचे दैनंदिन काम म्हणजे - जगातील सर्वांत भयानक-घातक जंगलचा राजा असणार्‍या सिंहाच्या डोळ्यांना डोळा भिडवून स्वत:च्या हाताने खाऊ घालायचं, सिंहिणींनी वाळीत टाकलेल्या बछड्यांना स्वहस्ते बाटलीतून दूध पाजायचं, त्यांच्यासमोर बसून-त्यांच्या पाठीवर झोपून वेळ काढायचा, त्यांच्याशी कधी गवतावर- मोकळ्या जागेत खेळायचं; तर कधी तळ्यात मनसोक्त डुंबायचं आणि जर सिंहाचा मूड असेल तर, कधी कधी त्या सामान्य माणासांसाठी असणार्‍या भयानक प्राण्यांच्या नाकांचे चुंबन घेऊन त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव करणारा अशक्य असा मनुष्य प्राणी आहे ‘केव्हिड रिचर्डसन..!

Book Details

ADD TO BAG

Other Books From the Category