-
Part Of The Pride (पार्ट ऑफ द प्राइड)
प्राणीशास्त्रज्ञ आणि प्राणी वर्तनशास्त्रज्ञ म्हणून दक्षिण आफ्रिकेतील एका सिंह उद्यानात काम करणार्या तरुण मनुष्य प्राण्याची ही अनोखी कहाणी. लहानपणापासून छोट्या-मोठ्या प्राणी–पक्षी(घरात पाळता येतील) अशांना पाळून, त्यांचं संगोपन करून- त्यांचं बारकाईनं निरिक्षण करण्याची त्याची सवय त्याला सिंहाच्या मनीचे भाव वाचायला मदत करते. मनुष्य प्राण्याचे दैनंदिन काम म्हणजे - जगातील सर्वांत भयानक-घातक जंगलचा राजा असणार्या सिंहाच्या डोळ्यांना डोळा भिडवून स्वत:च्या हाताने खाऊ घालायचं, सिंहिणींनी वाळीत टाकलेल्या बछड्यांना स्वहस्ते बाटलीतून दूध पाजायचं, त्यांच्यासमोर बसून-त्यांच्या पाठीवर झोपून वेळ काढायचा, त्यांच्याशी कधी गवतावर- मोकळ्या जागेत खेळायचं; तर कधी तळ्यात मनसोक्त डुंबायचं आणि जर सिंहाचा मूड असेल तर, कधी कधी त्या सामान्य माणासांसाठी असणार्या भयानक प्राण्यांच्या नाकांचे चुंबन घेऊन त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव करणारा अशक्य असा मनुष्य प्राणी आहे ‘केव्हिड रिचर्डसन..!
-
Deserter(डेझर्टर)
आघाडीवर प्राण पणाला लावून लढणार्या, दुर्दैवी परिस्थितीवर मात करणार्या साहसवीरांची अर्थात ल लष्करातील ढवय्या सैनिकांच्या पराक्रमाची गाथा उलगडवून दाखविणारी कादंबरी ‘डेझर्टर्स’. या कादंबरीतील संघर्ष, नाट्य, शोकांतिका, व्यथा-वेदना वाचकाचे मन खिळवून ठेवतात. सैनिक कसे तोंड देतात या युद्धपरिस्थितीला? का ‘डेझर्टर्स’ म्हणून घोषित केलं जातं त्यांना? सैनिकांच्या पलायनामागील घेतलेला अचूक शोध म्हणजेच ‘डेझर्टर’
-
Chicken Soup For The Couples Soul ( चिकन सूप फॉर क
देवाने गाठी जरी स्वर्गात बांधल्या, तरी विवाह साजरे होतात इथे पृथ्वीवरच! ते निभवावेही लागतात आपल्या तुपल्यालाच! कसं निभावतो आपण हे नातं? - त्याच्या या कथा! एकांड्या आयुष्यात दुस-याचा प्रवेश झाला, की जीवनाचे आयाम बदलतात. मग प्रेमाच्या बहरात सप्तरंगी स्वप्न फुलतात. रोमान्स, स्फूर्ती, उत्साहाची कारंजी उडतात. जबाबदारी वाढली की संघर्ष आला - संकटं आली! एकमेकांच्या मदतीनं त्यांनाही तोंड देण्याची हिंमत येते. प्रेम कार्यप्रवण बनवतं - प्रेम व्यक्तीला स्वतंत्र करतं. कधी भानावर आणायचं कर्तव्य पार पाडतं - कधी आत्मभान जागृत करतं! एकमेकाला गृहीत धरलं तरी एकमेकाचा आदर करायला शिकवतं. मुरलेले प्रेम जन्मोजन्मीची साथ करतं. हळुवार प्रेम तितकंच कणखरही असतं. कुटुंब-समाज अशा अवघ्या पसार्यात स्वत:च्या अस्तित्वाचा शोध घ्यायला प्रवृत्त करतं. पती-पत्नीच्या सहजीवनाच्या अशा या कथा आपल्या प्रत्येक भावनेला स्पर्श करतात. काही कथा जुन्या - पण आजही तितक्याच ताज्या वाटणा-या - कालातीत! देशातीतही. फरक फक्त संस्कृतीचा आहे. पाश्चात्य संस्कृतीच्या चष्म्यातून कथा वाचल्या, की लक्षात येतं, अरे या तर आपल्याच कथा - आपल्या आयुष्यात आपल्या आसपास घडणा-या! कपल्ससाठी असणारं हे "चिकन सूप', "तुमचं - आमचं सेम असतं' याची प्रचीती देणा-या!