Ahitagni Rajwade - Aatmvrutt (अहिताग्नि राजवाडे -आत्मवृत्त )

By (author) Ahitagni Rajwade Publisher Shree vidya prakashan

ॐ शांती, शांती, शांती. माझि वाणि माझ्या मनी स्थित राहो। मन ठाव घेषो वाणीमाजी || १ ॥ प्रकट ब्रह्माचे प्रकट स्वरूप। देउनी समीप बेसो माझ्या ॥ २ ॥ मन बाणी दोन्ही घेउनी सांगाती। वेदांसी आणीती मजकडे ॥ ३ ॥ मी न जाता माझ्या कानांनी ऐकले. त्यांनी दिवसांत त्यांच्या मनाचा सराव केला. ४ ॥ ऋत मी बोलेन सत्य आचरीन। ते माझे रक्षण करो सदा ॥५॥ सदा करो माझे बक्त्याचे रक्षण। वक्त्याचे रक्षण करो सदा ॥ ६ ॥ वेद आपल्याला दोनदा सांगतात. त्रिवार शांतीसी बोला चाचे ॥ ७॥ ओम शांती शांती शांती. मी, शंकर रामचंद्र राजवाडे, आहिताग्मि, पुणे, जे येथे माझे आत्मचरित्र देण्याचे योजिले आहे त्यात मुख्यतः माझ्या गेल्या ३२ वर्षातील म्हणजे इ. स. १९१८ पासून १९५० (शके १८४० ते शके १८७२) पर्यतच्या काळातील महाराष्ट्र आणि बृहन्महाराष्ट्र यांच्या मराठी भाषाक्षेत्रातील कार्याचा व्याप केवढा मोठा आहे ते दर्शविण्याचा संकल्प केला आहे व तदनुषंगाने बाकीचे माझे केवळ त्याच्या पुष्टी करणार्थ जीवनवृत्त येणार आहे. हे माझे कार्य विशेषेकरून धार्मिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि चाख्ययीन स्वरूपाचे आहे. या काळात भी उभ्या महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर बहुतेक मोठमोठ्या शहरी, जिल्ह्यांच्या आणि तालुक्यांच्या ठिकाणी ष ठळक ठळक गाबी एकेकदा व क्वचित्त दोनदोनदा बा अधिक हिंडून आलेलो आहे. तथापि मी माझे कार्य केव्हाही स्वतः आपण होऊन स्थानिक वा बाहेरच्या पत्रांत जाहीर करण्यास दिले नाही.

Book Details

ADD TO BAG

Other Books From the Category