Dhukyat Harvalele Shakunanche Pakshi (धुक्यात हरवलेले शकुनांचे पक्षी)

By (author) Arvind Budhkar Publisher Navsrujan Prakashan

अनुभूतीचा ओरखडा जोपर्यंत मनावर उमटत नाही, जोपर्यंत आपण अस्वस्थ होत नाही, तोपर्यंत आशयाचे तरंग शब्दांच्या रूपातून अंतरंगात साकार होत नाहीत. अशा तरंगांचे दृश्य स्वरुप कथारूपाने साकारणे ही सुद्धा एक प्रकारची साधनाच होय. एखादे कथाबीज मनात रुजणे व ते कागदावर उतरणे ही निर्मिती प्रक्रिया अत्यंत जटिल व सूक्ष्मतम असते. मानवी मनोव्यापारासोबतच भवतालाचे दर्शनही कथेतून घडत असते. ते अचूकपणे टिपता येणे हेही कौशल्याचे काम असते. लेखक अरविंद बुधकर यांचा 'धुक्यात हरवलेले शकुनांचे पक्षी' हा कथासंग्रह वाचताना वाचकाला या सर्वांचे दर्शन घडते. 'महाराष्ट्रातील तीन शिलेदार', 'ध्यासंग' ही दोन मुलाखतींची ई-पुस्तके प्रसिद्ध झाल्यावर 'डोहाचे अंतरंग' हा अरविंद बुधकरांचा पहिला कथासंग्रह प्रकाशित झाला. त्याच डोहातून आता ‘धुक्यात हरवलेले शकुनांचे पक्षी' हा दुसरा कथासंग्रह प्रसिद्ध होत आहे. अथांग समुद्रासारखे अगम्य जीवन, शकून-अपशकूनांच्या वादळी लाटांवर विवेकाच्या शिडाने प्रवास करीत असलेले मानवी मन या कथांच्या केंद्रस्थानी आहे. त्यामुळे या कथा वाचताना वाचकांना विविध वळणांवर भेटलेली माणसे नक्कीच आठवत राहतील यात शंका नाही. -- गीतेश गजानन शिंदे

Book Details

ADD TO BAG