Cave In The Snow (केव्ह इन द स्नो)

मूळ लेखक विकी मेकांझी अनुवाद मनिषा पोतनीस हे एक विलक्षण पुस्तक आहे. लंडनमधील राहणाऱ्या एका इंग्लिश मासे विक्रेत्याच्या मुलीची बौद्ध धर्मातील अलौकीक अशा व्यक्तींमध्ये गणना झाली. तशीच अध्यात्मिक प्रगती करण्यासाठी लागणाऱ्या अधिकारांसाठी झटणारी अशी ती महिला आहे . 1976 साली ज्योना पेरीला असे तिचे नाव , "तेंझिन पाल" हे नाव प्राप्त झाले. हिमालयातील 13 हजार 200 फूट उंचीवरील एका गुहेत एकांतवासात ती राहिली. हे दुर्गम असे ठिकाण आहे. बर्फाच्छादित डोंगरांनी वेढलेले आहे .तिथे तिने बारा वर्षे बौद्ध धर्मात सांगितल्याप्रमाणे उग्र तपश्चर्या केली; तिथे तिला अनेक संकटांशी सामना करावा लागला. कल्पनातीत थंडी , हिंस्र प्राणी ,उपासमार कोसळणारे बर्फान्चे कडे अशा अनेक संकटांशी सामना करत तिथे ती राहिली .स्वतः साठी लागणाऱ्या भाजीपाल्याची लागवड करणे तसेच एका तीन बाय तीन च्या लाकडी पेटीत साधना करत बसणे तेही न झोपता , हे सर्व तिने केले कारण तिला याच रूपातच ज्ञानप्राप्ती करून घ्यायची होती

Book Details

ADD TO BAG

Other Books From the Category