Aapuliya Bale Nahi Mi Bolat ( आपुलिया बळे नाही मी बोलत)

By (author) Shriram Borkar Publisher Manorama Prakashan

शताब्दीच्या उंबरठ्यावरचे दादा' गेली 50 वर्षे मी दादांना पाहातो आहे, ऐकतो आहे, आणि वाचतो ही आहेच, दादा म्हणजे मराठी साहित्यातले ज्येष्ठ लेखक-समीक्षक श्रीराम कृष्णाजी बोरकर, राष्ट्रीकृत बँकेचे सेवानिवृत्त अधिकारी. दादांचे कुटुंब साक्षात गोकुळच. दादा त्यातले आदर्शवत कर्ता पुरुष. दादांची पहिली कादंबरी ते मॅट्रीकला असताना प्रसिद्ध दार्दाचे विविधांगी, विपुल लेखन लोकप्रिय मासिकांतून आणि प्रतिष्ठित वृत्तपत्रांमधून सातत्याने प्रसिद्ध, दैनिक महाराष्ट्र टाईम्सच्या रविवार पुरवणीतून सुरवातीपासून सतत 18 वर्षे दार्दानी असंख्य ललित ग्रंथाची परीक्षणे करून साक्षेपी समीक्षक म्हणून नाव मिळविले. दादांनी कविता, लघुकथा, लघुनिबंध, कादंबरी, समीक्षा, चरित्र आणि इतिहास असे वेगवेगळे वाडमय प्रकार स्वतःच्या ललित मधुर शैलीत समर्थपणे हाताळले. त्याचीच पुढे अनेक पुस्तके निघाली. डेमिसाईज आकारातला सुमारे 750 छापील पृष्ठाचा दादांचा श्रीमहाभारत' नामक भारदस्त संशोधनपर ग्रंथ विशेष लोकप्रिय आहे हा ग्रंथ दादांच्या वाङ्‌मयीन कार्यकर्तृत्वाचा एक चिरस्थायी ठेवा समजला जातो. "आपुलिया बळे नाही मी बोलत" या नावाचे दादांचे आत्मकथन पर नवे पुस्तक आज प्रकाशित होत आहे. दादांच्या आयुष्याचे व समग्र जडण-घडणीचे एक नितळ, प्रांजल दर्शन त्यातून घडते, ते मनोवेधक आहे, मनाने अतिशय निर्मळ, निगर्वी असणारे दादा स्वभावानेही तितकेच निष्कपट आणि निर्मत्सरी आहेत. शताब्दी वर्षातल्या त्यांच्या प्रवेशाची सारीजण आतुरतेने वाट पाहाताहेत, दादांनी शतायु व्हावे हीच सर्वाची शुभकामना !

Book Details

ADD TO BAG