-
Rajyache Vaibhav Birbal Ani Itar Katha (राज्याचे वैभव बिरबल आणि इतर कथा)
भारतीय चातुर्यकथा म्हटलं की बिरबल आणि तेनालीराम हीच नावं झटदिशी डोळ्यांपुढे येतात. या दोन्ही अत्यंत हुशार व्यक्ती इतिहासात अजरामर होऊन बसलेल्या आहेत. त्यातही बिरबलाच्या कथा तर अजूनही संदर्भासाठी वापरल्या जातात. अगदी इंटरनेटवर, मॅनेजमेंटच्या धड्यांमध्ये बिरबलाचं स्थान अव्वल असल्याचं दिसतं. अकबर बादशाह आणि बिरबल यांचं मेतकूट फारच खुमासदार जमलेलं आहे. अकबराच्या दरबारातल्या नऊ रत्नांपैकी बिरबल अकबराचा विशेष लाडका होता. बिरबलानं आपलं बुद्धिचातुर्य, हजरजबाबीपणा, सच्चेपणा, निर्भयता, शौर्य वगैरे गुणांच्या जोरावर बादशाहचं मन तर जिंकून घेतलं होतंच; पण देशविदेशांतही त्याची कीर्ती पसरलेली होती. बिरबल-बादशाहच्या कथा वाचताना करमणूक तर होतेच, पण बोधही मिळतो. शहाणपण मिळतं. शिकायला मिळतं. आपल्या देशात इतकं मौल्यवान रत्न जन्माला आलं, याचा अभिमानही वाटतो. या गोष्टी केवळ मुलांनाच नाही, तर सर्व वयोगटांच्या, लहान-थोर माणसांना अनेक प्रकारे आनंद देतील अशाच आहेत.
-
Durche Pravasi Ani Pravasi Itar Katha (दूरचे प्रवासी आणि इतर कथा)
राजू आमचा आहे हुशार. विज्ञानाची त्याला आवड फार. कनसाई गावाची तो आहे शान. रनाळ्यात एकदा रात्रीच्या वेळी पाहिली त्याने अद्भुत चकती, चकतीतून त्या उतरल्या सहा विचित्र आकृत्या, पडक्या घराभोवती फिरू लागल्या. राजूने लावला छडा त्या आकृत्यांचा. एकदा रनाळ्यातच रात्रीच्या वेळेला राजूला तळ्यात सापडला एक अद्भुत जीव, ज्याच्यातून प्रकाश बाहेर येत होता. राजूने शेवटी जाणूनच घेतलं त्या जिवाचं रहस्य. एकदा रनाळ्यात झाली ढगफुटी; पण राजूने सगळ्यांना वाचवलं त्या संकटातून. आष्ट्याला एकदा गेला असताना रात्री त्याला शेतात उतरताना दिसलं एक यान. त्या यानातून चार काळसर आकृत्या बाहेर पडल्या; पण त्या विघातक नाहीत हे राजूने त्यांच्या स्पर्शातून जाणलं. तर अशा या राजूच्या करामती. त्याला विज्ञानाची आहे संगती. त्याचा आयुकातील शास्त्रज्ञ किरणमामा आणि विज्ञान क्षेत्रातील, पोलीस खात्यातील मंडळी नेहमीच उभी त्याच्या पाठीशी.. गूढ वातावरणातून उलगडणारं विज्ञान, त्याच्या जोडीला रंगीत चित्रं छान. राजूची ही हुशारी आणि मानवता, आवडेल खास आमच्या कुमार दोस्तांना.
-
Aaji Aajobanchya Goshti (आजी आजोबांच्या गोष्टी)
गोष्टी मनोरंजनाबरोबर आपल्याला संस्कृती, इतिहास, नैतिक मूल्ये यांची ओळख करून देत असतात. तसेच संस्कार करण्याचे एक उत्तम माध्यम म्हणजे गोष्टी. या पुस्तकात काही निवडक गोष्टींना सुगम भाषेत आणि सुंदर चित्रांसहित सादर करण्यात आलं आहे. चला टी.व्ही. आणि कॉम्प्युटरने व्यापलेल्या आपल्या भावविश्वातून जरा बाहेर पडून या गोष्टींद्वारे आपल्या संस्कृतीची आणि मूल्यांची ओळख करून घेऊ या. या गोष्टी आपल्या बुद्धीचा विकास तर करतातच; पण त्याचबरोबर आपल्याला स्वतःचीदेखील नव्याने ओळख करून देतात.
-
Avakashatil Doot Ani Itar Katha (अवकाशातील दूत आणि इतर कथा)
राजू आमचा आहे हुशार. विज्ञानाची त्याला आवड फार. कनसाई गावाची तो आहे शान. राजूला एकदा सापडला एक विचित्र धोंडा. त्या धोंड्याची मग राजूने केली शहानिशा. राजू एकदा गेला प्रतापगडावर. अफजलखानाच्या वधाची घटना प्रत्यक्ष घडताना पाहिली त्याने डोळ्यांसमोर. त्याच्यामागचं विज्ञान जाणून घेतलं राजूनी. राजूला रानात सापडली एक अळी. मग नेहमीच्या पद्धतीने त्याने घेतला तिचा विज्ञानातून शोध. कनसाई गावात अमावस्येला घटना घडत होत्या भीतिदायक. राजूने एका चिमणीच्या माध्यमातून त्या घटनांचा घेतला वेध. अशा या राजूच्या करामती. त्याला विज्ञानाची आहे संगती. त्याचा आयुकातील शास्त्रज्ञ किरणमामा आणि विज्ञान क्षेत्रातील, पोलीस खात्यातील मंडळी नेहमीच उभी त्याच्या पाठीशी. गूढ वातावरणातून उलगडणारं विज्ञान, त्याच्या जोडीला रंगीत चित्रं छान. राजूची ही हुशारी आणि मानवता, आवडेल खास आमच्या कुमार दोस्तांना.
-
Tenaliramachya Goshti (तेनालीरामच्या गोष्टी)
१६ व्या शतकातील तेनाली रामकृष्णन् म्हणजेच तेनालीराम अनेक शतकांपासून मुलांचा मित्र आहे. आंध्र प्रदेशातील तेनाली जिल्हयात जन्मलेले रामकृष्णन् म्हणून त्यांचे तेनालीराम असे नामकरण करण्यात आले. बुद्धिमत्ता, चातुर्य समयसूचकता आणि विनोदीशैली या वैशिष्ट्यांमुळे कृष्णदेवराय महाराजांच्या दरबारात त्यांना नवरत्नांपैकी एक म्हणून स्थान मिळाले. राज्यावर कोणतेही संकट आले, तरी ते त्यावर त्वरित उपाय सांगत. त्यांचे चातुर्य आणि बुद्धिमत्तेमुळे ते दरबारात ईर्षेचे मुख्य लक्ष्यही बनत; पण महाराजांच्या नजरेत त्यांचे स्थान हे कायम महत्त्वाचे आणि जवळचे होते. तेनालीरामच्या १६ व्या शतकातल्या गोष्टी आजही मुलांना सांगितल्या जातात. त्यांच्या गोष्टीतील चातुर्य, बुद्धिमत्ता, समयसूचकता मुलांच्या बुद्धीच्या विकासासाठी साहाय्यभूत ठरतात. छोट्या-छोट्या घटनांतून मोठ-मोठे संदेश आणि शिकवण देणाऱ्या या गोष्टी आहेत. बुद्धीला चालना देणाऱ्या तेनालीरामच्या या १६ गोष्टी प्रकाशित करीत आहोत.
-
51 Bodhapar Goshti (५१ बोधपर गोष्टी)
आपल्या मुलांवर चांगले संस्कार व्हावेत, त्यानं खूप मोठं व्हावं हे प्रत्येक पालकाचं स्वप्न असतं; पण प्रत्यक्षात या प्रक्रियेत अनेक समस्या, अडचणी येतात. मूल जसजसं मोठं होत जातं तसतसं त्याचं वागणं आपल्याला समजणं अवघड जातं आणि आपलं म्हणणं त्याला या वयात प्रेमानं कसं समजावून सांगावंहेदेखील कळत नाही. अशा वेळी गरज असते ती मुलांवर योग्य संस्कारांची आणि मार्गदर्शनाची. त्यासाठी मुलांची वाचनाची आवड जोपासण्याकडे पालकांनी डोळसपणे बघून त्यांच्या हाती संस्कारक्षम साहित्य देणं गरजेचं असते. बोधपर आणि रंजक गोष्टींमुळे मुलांचा भावनिक, बौद्धिक आणि नैतिक विकास तर होतोच; शिवाय मुलांची कल्पनाशक्तीही वाढते. म्हणून आम्ही मनोरंजक, बोधपर, कथांचा संग्रह खास छोट्या दोस्तांसाठी घेऊन आलो आहोत. जीवनाचे सार सांगणाऱ्या आणि मुलांना नीतिमूल्यांची शिकवण देणाऱ्या गोष्टींचा खजिना या संग्रहात आहे. कथेच्या शेवटी जीवनासाठी उपयुक्त ठरेल असा संदेश दिलेला आहे. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी या बोधकथांचे वाचन उत्तम संस्कारांचे काम करू शकते. मुलांचं मनोरंजन करतानाच त्यांना सुज्ञ व चौकस बनवण्यासाठी या बोधपर संस्कारकथा आवर्जून वाचायला हव्यात.