-
Khar Sangayach Tar (खरं सांगायचं तर)
खरं सांगायचं तर...मी करण जोहरचे चित्रपट फार कधी फॉलो केले नाहीत. दुसरं असं की, या पूर्वी चित्रपटविषयक जी पुस्तकं मी प्रकाशनासाठी निवडली त्याचे विषय होते – ‘लिजेंड’ म्हणता येतील असे कलाकार...गुरुदत्त, एस.डी.बर्मन, साहिर लुधियानवी, वहिदा रहेमान...! अशा पाश्र्वभूमीवर करणचं पुस्तक माझ्या निवडीत कसं काय बसलं? करणचे चित्रपट मला आकर्षित करत नव्हते, मात्र ‘कॉफी विथ करण’ त्याच्याविषयीचं कुतूहल मनात निर्माण करत होतं. स्टार अॅक्टर्स घेऊन ‘कॉफी’चे एपिसोड्स धीटपणे कन्डक्ट करण्याची हातोटी, हजरजबाबीपणा, नर्मविनोदी शैली असे त्याच्यातील गुण त्याच्या तल्लख बुद्धीची चुणूक दाखवत होते. म्हणूनच नंतर ‘AN UNSUITABLE BOY' हे त्याचं आत्मचरित्र उत्सुकतेने वाचलं आणि मला असं जाणवलं की, करण प्रभावीपणे व्यक्त होऊ शकतो. त्याच्याकडे स्वत:चे विचार आहेत, ते स्पष्टपणे मांडण्याएवढा धीटपणा आहे, मोकळेपणा आहे, स्वत:कडे तो पारदर्शीपणे पाहू शकतो, आपल्या खासगी जीवनाविषयीही तो खुलेपणे बोलू शकतो. हातून घडलेल्या चुका तो प्रांजळपणे शेअर करतो. जीवनात नात्यांना अनन्यसाधारण महत्त्व देणा-या करणच्या जीवनविषयक काही स्वत:च्या व्याख्या आहेत...आपल्या दिग्दर्शक ते निर्माता या प्रवासाचा आढावा तो घेतो, पण त्रयस्थपणे. बहुतेक आत्मचरित्रात यशापयशाचेच पाढे वाचलेले असतात. मात्र या आत्मकथनाचा मुख्य सूर ‘खरं सांगायचं तर...’ अशा रोखठोक स्वरूपाचा आहे... आणि म्हणूनच या पुस्तकाचे प्रयोजन! - प्रदीप चंपानेरकर (प्रकाशक) ---------- ``पूर्वी मी यशाला फार महत्त्व द्यायचो. आता वाटतं, एखादा सिनेमा पडला तर पडला. पुढचा चालेल. आता एका अर्थाने, यश आणि अपयश याबाबतीत माझ्या भावना बधीर झाल्या आहेत.'' ``माझे सिनेमे तुम्हाला आवडले नाहीत तर त्याबद्दल माझं काहीच म्हणणं नसतं. तुम्हाला माझं काम आवडलंच पाहिजे किंवा मी तुम्हाला आवडलोच पाहिजे, असं माझं अजिबात म्हणणं नाही.'' ``रोज सकाळी माझ्या ऑफिसमध्ये अत्यंत उत्साहाने आणि एनर्जीने मी जातो. एकापाठोपाठ एक अविरत काम करण्याची माझी उमेद असते. मी आयुष्य नावाच्या ट्रेडमिलवर सतत धावतो आहे. त्याचे गिअर्स माझ्या डोक्यात आहेत, तर लिव्हर्स माझ्या हातात आहेत.'' ``मी जाणीवपूर्वक काही गोष्टी आत्मसात केल्या. मला सगळ्यांच्यात मिळून मिसळून राहायचं होतं. मला सर्वांपासून वेगळा राहणारा, लांब राहणारा चित्रपट दिग्दर्शक-निर्माता बनायचं नव्हतं. मला `सोशलाईट' दिग्दर्शक बनायचं होतं.'' ``मला जे मैदानात खेळांमध्ये करता आलं नाही त्याची कसर मी स्टेज गाजवून पुरेपूर भरून काढली. मी स्पर्धांमधला सर्वोत्तम वक्ता बनलो.'' ``आज मागे वळून पाहिलं आणि आयुष्याला निश्चित वळण देणा-या घटना कोणत्या असा विचार केला तर मी बोर्डींग स्कूलमधून परत येणं, माझ्या आईने त्यावरून मला खणखणीतपणे सुनावलेले चार शब्द आणि स्पर्धेत पटकावलेला तो पहिलावहिला पुरस्काराचा कप या तीन गोष्टी सांगाव्या लागतील.'' ``मी जसा आहे त्याच्याही पलीकडे सभ्यपणा आणि माणुसकी या दोन महत्त्वाच्या गोष्टी माझ्याजवळ आहेत. त्यामुळे मी आता लोकांच्या बोलण्याकडे काही लक्ष देत नाही.'' ``व्यभिचार हे आयुष्यातलं वास्तव आहे. ज्यामध्ये, व्यभिचाराला संधी होती पण ते अजिबात बळी पडले नाहीत, असं एक लग्न, एक वैवाहिक नातं मला दाखवावं.''
-
Telecom Kranticha Mahaswapna (टेलिकॉम क्रांतीचा मह
सत्यनारायण गंगाराम पित्रोदा... ओडिशा राज्यातल्या तितिलगड या छोट्याशा गावातला हा तरुण ‘स्वप्नभूमी’ अमेरिकेत गेला काय आणि झपाट्याने विस्तारत जाणार्या तंत्रज्ञानाच्या अवकाशात त्याच्या हाती सोनं लागलं काय! ...
-
Guide (गाइड)
आर क़े .नारायण हे जगभरात मान्यताप्राप्त असे इंग्रजी साहित्यिक . त्यांच्या ' द गाइड ' या इंग्रजी कादंबरीला १९६० मध्ये ' साहित्य अकादमी ' पुरस्कार प्राप्त झाला आणि एका श्रेष्ठ पौर्वात्य साहित्यकृती म्हणून ती जगभर बहुचर्चित ठरली . १९६५ मध्ये याच कादंबरीवर आधारित विजय आनंद दिग्दर्शित ' गाइड' हा कलात्मक चित्रपट प्रदर्शित झाला आणि कांदबरीचा व्यापक आशय व त्यातील राजू गाइड, नृत्यांगना रोझी ,तिचा पती मार्को आदी या मातीतल्या व्यक्तिरेखा सर्वतोमुखी झाल्या . आज पाच दशंक उलटून गेली तरी अनेक प्रश्न चर्चेत राहिले . एका सामान्य भोगवादी राजू गाइडच अध्यात्मिक 'स्वामी 'मध्ये रुपांतर होऊ शकत ? एका कलासक्त विवाहित स्त्रीने पतीला सोडून नृत्यकलेचा ध्यास घेण , राजूसारख्या परपुरुषासोबत राहणं नैतिकतेच्या चोकटीत बसत? मूळ कथेत व चित्रपट कथेत काय फरक होता ? तो योग्य होता का ? यांसारखा अनेक प्रश्नांचा उलगडा हि कांदबरी वाचल्याशिवाय होण अशक्यच . सर्जनशीलतेचा ध्यास,ज्ञान-संशोधनाच ध्यास , भोगवाद व अध्यात्म अशा अनेक गोष्टींचं एकात्म चिंतन करायला लावणाऱ्या मूळ इग्रजी कांदबरीचा उल्का राउत यांनी सिद्ध केलेला हा अनुवाद कल्पनारम्यता आणि अध्यात्म यांचा अभूतपूर्व मेळ घालणारी , अत्यंत रोचक व तत्वाण्यानात्मक डूब असलेली हि कांदबरी मराठी वाचकांसाठी आजही एक आगळी आनंदपर्वणी ठरते-गाइड
-
Happy Lagna.com Bhag-2 (हॅपी लग्न .कॉम भाग-1)
लग्नाला पांच-सहा वर्ष झाल्यानंतर संसारात जेव्हा तोचतोचपणा वाटू लागतो, जोडीदार निरास आणि कंटाळवाणा होऊन जातो तेव्हा आपल्या या सर्वांत जवळचा नात्याला खतपाण्याची गरज लागते. हे खतपाणी म्हणजे नेमकं काय, कशाप्रकारे हे नातं पुन्हा एकदा बहरू शकतं याचं प्रभावी मार्गदर्शन या पुस्तकात आहे. विजय नागास्वामी यांनी लग्नाच्या नात्यात ऊदभवणाऱ्या अनेक नाजूक आणि जटील समस्याची ओळख करून दिली आहे. वरवर क्षुलल्क वाटणाऱ्या गोष्टी पुढे जाऊन क्लिष्ट समस्येच रूप कसं धारण करू शकतात हे त्यांनी अनेक उदाहरणामधून स्पष्ट केल आहे. नवरा व बायको यांचे भिन्न स्वभाव, वेगळ्या आवडी-निवडी, दोन टोकाची ध्येय,लुडबुड करणारे त्यांचे नातेवाईक इथपासून ते लैंगिक समस्या आणि विवाहबाह्य संबंध असा एक मोठा पट या पुस्तकात त्यांनी मांडला आहे . केवळ समाजाला घाबरून किंवा सोयींच आहे म्हणून लग्न टिकवण्यात अर्थ नाही . तुम्हाला ज्याच्या जोडीने आयुष्याचा आनंद उपभोगायचा आहे , कौटुंबिक सुख वृद्धिंगत करायचं आहे , अशा नात्याला कायम बहरत ठेवण्यासाठी वाचा....
-
Happy Lagna.com Bhag-1 (हॅपी लग्न .कॉम भाग-1)
लग्न हा आयुष्यातला एक महत्वाचा टप्पा मानला जात असला, तरी निकोप सहजीवनाकडे वाटचाल होणं म्हणजेचं खऱ्या अर्थाने लग्न यशस्वी होणं, असा कानमंत्र क्वीचितच मिळतो. आणि मग बरेच जण 'पदरी पडल अन पवित्र झालं' म्हणत लग्न रेटत तरी राहतात किंवा मागचा-पुढचा विचार न करता 'काडीमोड' तरी करतात. प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ विजय नागास्वामी यांनी या पुस्तकात लग्न यशस्वी होण्यासाठी लग्न आधी पासूनच त्याचा पाया भक्कम कसा करावा, सहजीवन कसं 'फुलवत' न्यावं, हे सहजसोप्या भाषेत समजावून सागितलं आहे. गेल्या काही वर्षात, स्त्री-पुरुष याचे संसारातले 'रोल्स' बदलल्याने नातेसंबंधांवर झालेला परीणामाचाही यात विचार केला आहे. पुस्तकात नागास्वामी यांनी पुढील विषय उदाहरणासह स्पष्ट केले आहेत. * जोडीदाराची निवड * भावनिक व लैंगिक नात्यांचा विकास * लग्नाचा बदलत स्वरूप * एकमेकाच्या कुटुंबाशी असलेले नातेसबंध * व्यक्तिगत स्पेस * कॅरिअर व कुटुंबाचा समतोल इत्यादि.... लग्न झालेला किंवा होऊ घातलेल्या अन सुखी सहजीवनाच्या शोधात असलेल्या प्रयेत्कासाठी उपयुक्त आणि हो, भेट देण्यासाठी उत्तम!
-
Te Aani Mi (ते आणि मी)
शकुंतला पुंडे यांच्या ललित लेखांचं हे पुस्तक. पुण्यासारख्या शहरातील अनुभव, कोकणातील निसर्ग याबद्दल त्यांनी खूप जिव्हाळ्याने लिहिले आहे. शहरातील घराच्या गॅलरीबाहेरचा हिरवा रंगमंच असो किंवा कोकणातील मुक्त घनदाट विस्तीर्ण निसर्ग या साऱ्याबद्दल पुंडे वाचकांशी संवाद साधत सोप्या शब्दांत आणि ओघवत्या भाषेत लिहितात. पुस्तकात चारच प्रकरणे आहेत; पण यातून खूप मोठा पसारा आपल्यासमोर उलगडला जातो. केवळ माहिती न देता त्या भाष्यही करतात. त्यामुळे पुस्तक आणखीनच वाचनीय झाले आहे.