-
Zebunisa (झेबुन्निसा)
रुचिर गुप्ता यांच्या ‘द हिडन वन’ या पुस्तकाचा हा अनुवाद आहे. कवयित्री व कवींच्या गुप्त मंडळाची संस्थापक आणि औरंगजेबाची कन्या, बंडखोर शहजादी झेबुन्निसा हिची ही कहाणी आहे. औरंगजेब-काळातील कटकारस्थानं, सत्ता मिळवण्यासाठीचे डावपेच, कुरघोड्या या पार्श्वभूमीवर न्याय्य भूमिका घेणाऱ्या झेबुन्निसाची कथा या पुस्तकात वाचकांसमोर येते. रोमांचक घटना आणि व्यक्तिरेखांनी परिपूर्ण अशी कादंबरी. झेबुन्निसाची ऐतिहासिक कहाणी मराठीत प्रथमच.
-
Pratekachi Najar Tumchya Pakitavar Aahe Ka (प्रत्य
वैयक्तिक अर्थव्यवस्थेवरील अत्यंत उपयुक्त असे हे पुस्तक आहे. वाचण्यास अतिशय सोपे, शब्दकोशीय भाषा नसणारे, तरीही मनोरंजक उदाहरणांनी परिपूर्ण असे हे पुस्तक आहे. बचतीची सवय लावणे, तसेच सद्य:स्थितीतील गरजा भागवण्यापासून ते निवृत्तीपर्यंतचे नियोजन अशा अनेक विषयांचा पट उलगडणारे पुस्तक. समग्र अर्थव्यवस्थेविषयीचे सखोल ज्ञान देणारे आणि एकूणच अंतर्दृष्टी देणारे मार्गदर्शनपर पुस्तक.
-
Padadyamagche Kisse (पडद्यामागचे किस्से )
रंगमंचावर नाटक सादर होते , तेव्हा त्यातील नाट्य प्रेक्षकांचे मनोरंजन करते ; पण नाटक रंगमंचावर सादर होण्याआधी आणि नाटकाचा पडदा पडल्यानंतरही काही मजेशीर आणि कधी काही गंभीरसुद्धा किस्से , प्रसंग घडत असतात , कधी अनवधानाने , कधी अपघाताने , कधी विविध प्रकारच्या स्वभावप्रकृतींमुळे , तर कधी अनपेक्षितपणे उद्भवलेल्या अडचणींमुळे अशा गोष्टी घडतात , त्या प्रेक्षकांसमोर कधीच येत नाही , त्यातील गंमत ही त्यांत गुंतलेल्या लोकांपुरतीच राहते , लेखक राज्य शासनाच्या सांस्कृतिक संचालनायात कार्यरत होते ,शासनाच्या हौशी नाट्य - नृत्य - चित्रपट - संगीत - लोककला आदि स्पर्धा - महोत्सवांच्या आयोजनात ते सक्रिय होते , त्यांनी त्यांच्या आठवणीतले निवडक किस्से या पुस्तकात हलक्याफुलक्या शब्दांत सांगितले आहे , ते वाचनीय तर आहेतच , शिवाय त्यातून रंगभूमी व अशा स्पर्धा - महोत्सवांचे विविध पैलूही उलगडले आहे ,
-
Jeevansafalyasathi Vicharanchya Chandanya ( जीवनसा
आपल्या ठायी असलेल्या 'विचारशीलता' या स्वभावविशेषाद्वारे कुठलीही कृती प्रत्यक्षात साकारते , अमुर्त संकल्पनांना मूर्त स्वरूप मिळते , नेमका हाच धागा पकडून लेखकाने या पुस्तकातील लेखांद्वारे वैचारिक चांदण्यांची उधळण केली आहे , वाचनाचा निखळ आनंद देण्यासोबतच हे विचार सर्वानांच अंतर्मुखही करतात ; किंबहुना ते आत्मचिंतनाकडे नेणारे आहेत , आपलं जीवन सर्वार्थाने तेजाळण्याची क्षमता असलेल्या या 'विचारांच्या चांदण्या !'
-
Paragrahavarun Corona Aani… (परग्रहावरून कोरोना आण
विज्ञान काल्पनिका-वास्तविका या अनोख्या स्वरूपातली ही ‘कोरोना’ या विषयावर आधारित कादंबरी. जगभर कोरोना कसा पसरला आणि सगळ्या देशांनी तो थोपवण्याचे कसे प्रयत्न केले, हे समग्रपणे मांडणारी ही कादंबरी. वैज्ञानिकदृष्ट्या अतिशय सुस्पष्ट आणि सहजशैलीत अभिव्यक्त झालेली ही कादंबरी मानवी स्वभाववैशिष्ट्यांवरही प्रकाश टाकते. सत्य आणि कल्पना या दोन्ही स्तरांवर विहरणारी ही कादंबरी कोरोनाच्या साथीचा मुद्देसूद आणि परिपूर्ण लेखाजोखा मांडते. प्रत्येक पानागणिक वाचकांची उत्सुकता वाढवणारी आणि देशोदेशींच्या रोमहर्षक घटनांसह अनेक देशांचे चित्रण करणारी ही विज्ञान काल्पनिका- वास्तविका.
-
Fault Line ( फ़ॉल्टलाइन )
पर्यावरणाचा विचार न करता ऐश आरामासाठी माणसाला धावताना बघताना बेसुमार इंधनांचा वापर करताना त्याहीपेक्षा त्यामागची बेफिकिरीची भावना पाहून मनात निर्माण होणाऱ्या प्रश्नांनी एका काल्पनिक वैज्ञानिक कथेचं रूप घेतलं . एरव्ही स्वतः पुरतीच असणारी आणि वाढीस आलेली भावनिकता पाहता ही काल्पनिक असणारी गोष्ट खरोखर होऊ शकते . अशीदेखील भीती वाटली . या आणि अशाच विचारांनी एका कथेच्या रूपाने घेतलं .
-
Jinkun Denarya Savai ( जिंकून देणार्या सवयी )
जीवनात ध्येयप्राप्तीच्या मार्गावर वाटचाल करताना आपल्या अनेक कृतींचे सवयीत रूपांतर होते. आणि त्याच सवयी आपल्याला ‘जिंकून देणार्या सवयी’ ठरतात. त्याचे समग्र विवेचन या पुस्तकात आले आहे. विजेता नेमका कशामुळे ‘विजेता’ होतो? हे स्पष्ट करणारे पुस्तक. अनेक प्रथितयश आणि लोकप्रिय व्यक्तींच्या आयुष्यासंदर्भातल्या उदाहरणांद्वारे झालेली सहजसोपी मांडणी हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य. शक्यता दृढतेत बदलली जाण्यासाठी, क्षमता योगदानात बदलली जाण्यासाठी आपल्या सवयी या जिंकून देणार्या सवयी ठरतात. त्यामुळे आयुष्याला खर्या अर्थाने गती प्राप्त होते. हे विशद करणारे पुस्तक. जिंकून देणर्या सवयींची जोपासना हा आपल्याला पुढे नेण्याचा एकमेव मार्ग कसा ठरू शकतो याचं मर्म उलगडणारं पुस्तक.
-
Apala Vyaktimattwa Ghadavinyasathi ( आपलं व्यक्तिम
नवीन आव्हानं आणि प्रतिष्ठा मिळविण्याच्या दृष्टीने आटोकाट प्रयत्न करण्यासाठी आपण स्वत:ला जेव्हा सिद्ध करतो, तेव्हा खर्या अर्थी विकास घडून येतो, याचे महत्त्व विशद करणारे पुस्तक. छोट्या-छोट्या पैलूंच्या साहाय्याने आपले व्यक्तिमत्त्व कशा प्रकारे आकारास येऊ शकते, हे या पुस्तकात स्प्ट केले आहे. स्वत:चे व्यक्तित्व घडविण्याच्या दृष्टीने जी ठिणगी चेतवली जाण्याची गरज आहे, तिचे अनन्यसाधारण महत्त्व विशद करणारे पुस्तक. आपलं व्यक्तिमत्त्व योग्य प्रकारे घडविण्यासाठी ‘तुम्ही कशाची वाटत पाहात आहात?’ तर त्याचं उत्तर देऊ शकणारं महत्त्वपूर्ण पुस्तक.
-
Sahaj, Sobat Jodidarachi ( सहज, सोबत जोडीदाराची )
विवाह या अतिशय सुंदर अशा नात्याचा गाभा उलगडणारं हे पुस्तक आहे. छोट्या छोट्या गोष्टींच्या वा कृतींच्या प्रत्यक्ष अवलंबनाद्वारे आपलं वैवाहिक जीवन कसं परिपूर्ण करता येईल, याचं मर्म उलगडणारं हे पुस्तक आहे. लेखकाने खुमासदार शैलीत वेगवेगळ्या उदाहरणांद्वारे वैवाहिक नात्यातल्या महत्त्वपूर्ण बाबी उलगडल्या आहेत. वैवाहिक जीवनातले खाचखळगे ओळखा आणि दूर करा या विचारसूत्राभोवती फिरणारं पुस्तक. प्रत्येक जोडप्याने एकमेकांना आवर्जून भेट द्यावं असं पुस्तक.
-
Are Vva ( अरे व्वा )
मनाला प्रेरणा देणार्या गोष्टी या पुस्तकातून चित्रित झाल्या आहेत. आपल्यामध्ये बदल घडवून आणणार्या तसेच महत्त्वाचे काही प्रश्न विचारणार्या, तरीही मनाला भिडणार्या अशा या कथा आहेत. जीवनानुभव अधिक अर्थपूर्ण, स्पष्ट आणि सशक्त करणार्या कथा यामध्ये आल्या आहेत. परिपूर्ण व्यक्तिमत्त्वासाठी रसरशीत, पोषक, तसेच प्रत्यक्ष न शिकवता अप्रत्यक्षपणे शिकवणार्या गोष्टी म्हणजेच, ‘अरे व्वा!’ हे पुस्तक.
-
Hoy!Amhi Karu Shakto ( होय! आम्ही करू शकतो )
जीवनात ध्येयसाध्यतेच्या दृष्टीने ‘होय! आम्ही करू शकतो’ या ठिणगीने सुरुवात होण्यासाठीचे महत्त्व विशद करणारे पुस्तक. ‘होय! आम्ही करू शकतो’ या ठिणगीद्वारे दैनंदिन जीवनात येणार्या अडचणींवर कशी मात करता येईल, हे या पुस्तकातून प्रभावीपणे मांडले आहे. ‘होय! आम्ही करू शकतो’ या दुर्दम्य आशावादाच्या साहाय्याने प्रगतीचे टप्पे गाठण्याविषयीचे मार्गदर्शन करणारे हे पुस्तक आहे.
-
Polish ( पॉलिश )
पॉलिश’ हा विनोदी कथासंग्रह आहे. विनोदी लेखनाच्या माध्यमातून जीवनातल्या कारुण्याला या कथासंग्रहाने स्पर्श केला आहे. जीवनशोधाची प्रक्रिया यामध्ये दिसते. व्यंगपूर्ण अनुभूती देणार्या समजुती, उपरोध, उपहास तसेच विडंबन यांसारख्या विनोदी लेखन पैलूंच्या आधारे कथांमध्ये विनोदाची निर्मिती करण्यात आली आहे, हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. विनोदी लेखन वाचकांचे मनोरंजन करणारे असले, तरीही वाचकांना अंतर्मुख करण्याचे सामर्थ्य लेखिकेच्या लेखणीत आढळते.
-
Inspector Chougule ( इन्स्पेक्टर चौगुले )
सत्य घटनांवर आधारित असे हे पुस्तक आहे. कर्तव्यदक्ष इन्स्पेक्टर चौगुले यांच्या व्यक्तित्वाचे पैलू उलगडणारे हे पुस्तक आहे. उल्लेखनीय; पण आव्हानात्मक प्रसंग कथाचित्रण हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. पोलीसदलातील उच्चपदस्थ अधिकार्याच्या नजरेतून मांडलेले अनुभव या पुस्तकात चित्रित झाले आहेत. खादी वर्दीतल्या प्रत्येक कर्मचार्याला, अधिकार्याला समर्पित अशा या पुस्तकात प्रभावी सत्यकथा मांडण्यात आल्या आहेत. तरुणाईसाठी अत्यंत प्रेरणादायी असे हे पुस्तक आहे.
-
Bhitichi Bhiti Kashala ? ( भीतीची ‘भीती’ कशाला? )
माणसाच्या ठायी असणार्या ‘भीती’ या भावनेविषयी महत्त्वपूर्ण अशा अनेक गोष्टी उलगडणारे हे पुस्तक आहे. भीती अजिबात महत्त्वाची नाही, तर भीतीपेक्षाही अधिक महत्त्वाचं असं काहीतरी आहे, हे ठामपणे स्पष्ट करणारं पुस्तक. माणसाच्या आयुष्यातल्या अनेक कंगोर्यांद्वारे भीतिमुक्त जीवन कसं जगावं? या दृष्टीने प्रेरणादायी पुस्तक. ‘भीतीचा सामना कराल, तर ती निघून जाईल. भीतीला टाळू पाहाल, तर ती वाढत राहील.’ या सूत्राभोवती विचारांची गुंफण झालेले पुस्तक. आपल्याला जाणवत असलेल्या भीतीपासून सर्वाधिक प्रेरीत कसं व्हायचं याचं मर्म उलगडणारं पुस्तक.
-
Vyavasaikanche Bible ( व्यावसायिकांचे बायबल )
आयुष्यात काहीतरी साध्य करण्याच्या दिशेने कार्यरत असताना मध्येच अशा काही गोष्टी घडतात, की ज्या आपल्याला रोखून धरतात. त्या वेळी तिथे न अडकता काही ना काही कृती करत राहण्याच्या प्रक्रियेतून तुम्ही मार्ग कसा काढू शकता, हे सांगणारे पुस्तक. अनेक दृष्टीकोनांचा समावेश असलेले, आकलनास व आचरणास सोपे असे पुस्तक.
-
Hindu Dharmachi Punrabhivyakti ( हिंदू धर्माची पुन
‘हिंदू धर्माची पुनराभिव्यक्ती’ हे बौद्धिक विरोध करणारे पुस्तक आहे. सध्या विद्यापिठीय विद्वानांच्या वर्तुळात, प्रसारमाध्यमे आणि सामान्य मनात पसरलेल्या हिंदूभयगंडवादावर चतुर आणि प्रभावशालीपणे टीका करून वम्सी जुलुरी यांनी आपल्याला हे दाखवून दिले की, हिंदूभयगंडवादी दृष्टिकोन जी गोष्ट नाकारत आहे, ते ना केवळ सत्य आणि हिंदू विचाराचे मर्म आहे, तर ते ह्या सृष्टीचे पावित्र्य आणि पूर्णता आहे. सृष्टी, इतिहास आणि इतिहासपूर्व काळ याविषयीच्या प्रसारमाध्यमांमधील धारणा, तसेच आर्य आक्रमण आणि बलीप्रथा याविषयीची हिंदूभयगंडवादी मिथके यांना बेधडक आव्हान देत ‘हिंदू धर्माची पुनराभिव्यक्ती’ने हिंदूभयगंडवाद आणि त्याच्या अहंकाराला हिंसक आणि आत्मघातकी संस्कृतीशी संबंधित असल्याचे दाखवून दिले आहे. ह्याचा विरोध केवळ नवीन हिंदू संवेदनशीलताच करू शकते. हे वर्तमानाकडे अशा दृष्टिकोनातून पाहण्याचे आव्हान आहे, जे आपला देश आणि काळ यांना पुन्हा एकदा सनातन धर्माच्या आदर्शांपर्यंत घेऊन जाईल.
-
Adharanchi Jadu ( आधारांची जादू )
आपलं ध्येय गाठण्याच्या प्रवासात अशा अनेक गोष्टी अथवा व्यक्ती भोवताली असतात, ज्या आपल्या ‘आधार’ होऊन जातात. त्यांच्या साहाय्याने प्रेरित होऊन आपण आपली वाटचाल कशी करू शकतो, हे सांगणारे पुस्तक. सर्वत्र अंधकार पसरला आहे. असं वाटत असताना आशेचा सकारात्मक किरण दाखवणार्या आधारांविषयचे समग्र विवेचन ह्या पुस्तकात आले आहे. मानसिक वादळातही स्थिरता टिकवून ठेवण्यासाठी मदत करणार्या आश्चर्यकारक आधारांचे महत्त्व सांगणारे पुस्तक. स्वत:चे आश्चर्यकारक आधार निर्माण करण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन करणारं पुस्तक. इतिहास निर्माण करणार्यांच्या यादीत स्वत:चं नाव समाविष्ट व्हावं हे ज्यांना वाटतं, त्या सर्वांसाठी महत्त्वाचं असं एकमेव पुस्तक
-
Vanar Yodha ( वानर योध्दा )
आनंद नीलकंठन यांच्या ‘वानरा’ या मूळ इंग्रजी पुस्तकाचा हा अनुवाद आहे. सुग्रीव, बाली, तारा यांची आख्यायिका या कादंबरीत चित्रित झाली आहे. वाचकाला खिळवून ठेवणारी लेखनशैली, प्रभावी व्यक्तिचित्रणं, पुराणकथांकडे पाहण्याचा वेगळा दृष्टिकोन ही या कादंबरीची लेखनवैशिष्ट्ये आहेत. बाली, सुग्रीव आणि तारा यांच्या संदर्भातल्या तर्कसुसंगत विवेचनाद्वारे त्यांची कथा आपल्यासमोर साकारली गेली आहे.
-
Udyasathi Mulana Ghadava ( उद्यासाठी मुलांना घडवा
पालकत्व निभावण्याच्या सुंदर प्रक्रियेविषयी अनोखा अनुभव आणि आनंद देणारे पुस्तक. पालकत्वाबाबतचा प्रवास विविध घटकांच्या साहाय्याने पुस्तकात स्पष्ट करण्यात आला आहे. सर्वार्थाने पालकांसाठी असलेले पुस्तक. वृत्ती, क्षमता आणि दृष्टिकोन या गोष्टी मुलांच्या व्यक्तिमत्त्वाचा पैलू होण्याच्या दृष्टीने पालकांनी नेमकं काय करणं अभिप्रेत आहे यावर प्रकाश टाकणारं पुस्तक.
-
Vichar kara, Ayushyachi disha Tharava ( विचार करा,
जीवनात विशिष्ट ध्येय साध्य करण्याच्या दृष्टीने स्वत:ला काही प्रश्न सतत विचारण्याचे महत्त्व विशद करणारे पुस्तक. प्रश्न विचारून त्यांची उकल करण्याच्या माध्यमातून ‘विशिष्ट’ अशा साचलेपणातून तुम्ही नेमके कसे बाहेर पडू शकता, हे सांगणारे पुस्तक. सकारात्मक दृष्टीकोनातून प्रश्नांचा विचार करून तुम्ही तुमच्या ध्येयसाध्यतेकडे कसे जाऊ शकता, हे सांगणारे पुस्तक. दुर्मीळ अशी व्यक्ती म्हणून स्वत:चा विकास घडवण्याच्या दृष्टीने प्रेरक पुस्तक. प्रश्न कसे विचारावेत, प्रश्न कोणते व नेमके केव्हा विचारावेत हे समजून घेण्यासाठी व त्या अनुषंगाने व्यक्तिमत्त्वविकासासाठी मार्गदर्शनपर पुस्तक.
-
Netrutwakalechi 12 sutre ( नेतृत्वकलेची १२ सूत्रे
नेतृत्वशैलीचा ' आपल्या वाढीच्या दृष्टीने निश्चित अशी रूपरेषा तयार करणे हा अत्त्यंत महत्वाचा व मूलभूत असा गुणधर्म आहे.
-
Police Files ( पोलीस फाइल्स )
पुणे पोलिसांनी केलेल्या उत्तम कामगिरीवर आधारित कथांचे संकलन म्हणजे पोलीस फाइल्स. परदेशातील पोलीसकथा चित्तथरारक वाटतात; पण तुमच्या स्वत:च्या शहरातील पोलीसही कर्तबगारीत कुठेही कमी नाहीत. पुणे पोलिसांची कामगिरी वाचताना तुमचीही मान अभिमानाने ताठ होईल आणि ‘पोलीस आपला मित्र’ याची प्रचिती येईल. या पुस्तकातील कथा वाचल्यानंतर तुमच्या मनातील पोलीस कर्मचार्यांविषयी असलेली समजूत निश्चित बदलेल. तो (किंवा ती) सदैव कठोर नसतो, तो (किंवा ती) सदैव ‘चौकशी’च्या मन:स्थितीत नसतो, तो (किंवा ती) पोलीसठाण्यात हजर नसला, तरी तो (किंवा ती) सदैव ड्युटीवर असतो. गुन्हे घडू नयेत आणि माणूस गुन्हेगारीकडे वळू नये म्हणून पोलीस समुपदेशकाची भूमिकाही किती उत्तमरीत्या निभावतात, हेही आपल्याला वाचायला मिळेल. पोलीस सेवेबद्दल तरुण-तरुणींच्या मनात असलेले गैरसमज दूर होतील आणि हुशार, सक्षम युक-युवतींना या क्षेत्राचे निश्चितच आकर्षण वाटेल.