-
Indradhanushya Kshitijache (इंद्रधनुष्य क्षितिजाचे
सुमंतजींनी नवीन पार्टीच्या नेत्याचं अभिनंदन केलं आणि अध्यक्षांना आपल्या मंत्री मंडळाचा राजीनामा पाठवून दिला. इतकी वर्षे सत्ताधीश म्हणून मिळालेली प्रतिष्ठा इतक्या सहजासहजी धुळीला मिळेल? राजमहलातून रस्त्यावर आल्यावर लोक त्यांच्याशी कसा व्यवहार करतील? पार्टीतले त्याचे सहकारी मंत्री, राज्याचे पदाधिकारी, सरकारी मोठे अधिकारी, भावी सत्ताधीश त्याच्याशी कसे वागतील? खुर्ची गेल्यानंतर त्यांची दिनचर्या काय असेल? आज जी गर्दी त्यांच्या भोवती जमते यापुढे तशी जमेल का?......
-
Ajinkya Rani Tara (अजिंक्य राणी तारा)
बादशहाच्या मृत्यूची बातमी साताऱ्याच्या किल्ल्यावर येऊन पोहोचली होती. मराठा सरदार महाराणी ताराबाईंसह जिथे जमले होते. औरंगजेबाच्या मृत्युबरोबरच मोगलांचे मराठ्यांबरोबरचे युद्ध संपले होते. महाराणी ताराबाई विजयी ठरल्या होत्या. मराठे विजयाचा जल्लोष करीत होते. औरंगजेबाने साताऱ्याच्या किल्ल्याचे नाव 'आझ्झमतारा' असे ठेवले होते. आता मराठे वीर "अजिंक्य तारा" असा जयजयकार करीत होते. आपल्या पराक्रमाने किल्ल्यांची मोगली नाव त्यांनी पुसून टाकले होते. हे सर्व पाहताना कृतकृत्यतेने महाराणी ताराबाईंचे ह्रदय भरून आले होते. आपल्या हातात भगवा ज़िन्दा घेऊन तो आनंदाने हेलावत महारानी म्हणाल्या, "विरांनो! महाराष्ट्राचा उत्कर्ष असाच वाढत राहो. पुढे तुम्ही नसाल, मी नसेन पण भावी मराठी पिढ्या असतील. या भावी काळातील मराठी पिढ्या आपल्या पराक्रमाचे गीत गातील अणि ऐकतील. आपला पराक्रम त्यांना स्फूर्ति, तेज आणि धैर्य डेट राहील."
-
The Fox (द फॉक्स)
"असे मानले जाते की शेक्सपीअरनंतर ज्याच्यावर सर्वात अधिक लिहिले गेले असेल तर तो जग विख्यात कादंबरीकार डी. एच. लॉरेन्स होय.लॉरेन्सच्या कादंबऱयांचे मोल जसे, जसे वाचक समीक्षकांच्या ध्यानी येऊ लागले तशी तशी त्यांची लोकप्रियता वाढत गेली. जीवनाचा आस्वाद, शोध-बोध घेत त्याचे 'जिवंत' रसरशीत प्रत्ययकारी चित्रण करताना त्याने आपली विशिष्ठ वैचरिक भूमिका व दृष्टिकोण मोठ्या निष्ठेने संभाळला. अत्यंत इंद्रियसंवेध वर्णनांमध्येही त्याची तत्वज्ञानाची बैठक जाणवत राहते.-हास पवनरया,मोडकलीस येऊन व्यक्ति व समाजविकस कुंठित करणार्या व्यवस्थेवर अप्रत्यक्ष भाष्य करताना तो मुक्त अविष्कारांची,मानसशात्रिय सिद्धान्तविचारांच्या प्रकाशात उजळणारी वाट व दिशा दाखवत राहिल. ख्रिश्चन प्युरिटॅनिझमच्या जोखडातून मोकळे होत मानवी प्रेमाविष्कराचे मोल व सौंदर्य ओळखणे व त्यांचा आस्वाद घेत राहणे तसेच त्यामागील 'अध्यात्म' विचार समजावून हे जीवनाचे मर्म त्याने तीन पिढ्यांच्या ध्यानात आणून दिले. सुविख्यात साहित्यीक व इंग्रजी वाङमयाचे गाढ़े अभ्यासक डॉ. चंद्रशेखर चिंगरे यांच्या प्रतिभावंत सव्यासाची लेखणीतून उतरलेला एक अप्रतिम अनुभव"
-
Jalati Mashal (जळती मशाल)
एक दिवस वाड्यात एकही माणूस जिवंत राहणार नाही भकास पडलेल्या वाड्यात केवळ कावऴय़ाची कर्कश्श काव् काव् चाललेली असेल हेच स्वप्न तो पाहत होता. आणि याच दारुण जिद्दीने तो पेटला गेला होता त्या चमत्कारिक प्राण्याने अलगद आपले पाय खाली सोडले.अगदी पालीसारखा तो धाब्याला गच्च चिपकला होता. दोन्हीही बाजूना धाब्याच्याखापरीत हात रोवायला जागा मिळाल्यामुळे त्याला आपला कंबरेपर्यंतचा भाग खाली घेता आला होता.नाहीतर कमाल होती त्याची इतक्या शांतपणे आणि सफाईदार अशी हालचाल तो करीत होता की, त्याच्याऎवजी दुसरा कुणी माणूस जरी असता तरी त्याने एव्हाना जमीन गाठली असती आणि पय लावून धूम ठोकण्याची वेळ आली असती.
-
Pratarna (प्रतारणा)
तिने ठाम निश्चय केला आहे. या पुढं दुबळे राहायचं नाही. स्वतःच्या पायावर उभं रहायचं. स्त्री स्वतंत्र झाली, मनाने कठोर बनली आणि आपलं रक्षण करण्यापूरती का होईना आर्थिक दृष्टया सबळ झाली. तिच्यावर अन्याय करण्याचे साहस समाजातला कुठलाही पुरुष करू शकणार नाही. मी स्वतः त्याचा अनुभव घेतला आहे. दातेसाहेब, आज समाजातल्या बर्याच स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करताहेत.साहशी कामं यशस्वीरित्या पार पाडत आहेत. पुरुषाइतक्याच त्या सबळ झाल्या आहेत.लाथ मारु तिथून पाणी काढू असं म्हणण्याइतपत त्यांच्यात ताकत आली आहे.ती कुणालाच जुमानणार नाही, कुणाची बटीक राहणार नाही. अन्याय तर मुळीच सहन करणार नाही. जशास तसे वागेल!...........
-
Nyayasan ( न्यायासन )
लंडन शहराला सर्प दंशचि का भीती वाटत होती? काय परिणाम होणार होता विशिष्ठ जाहिरातीचा ज्यात फक्त घरातील कोणी तरी शास्त्रज्ञ हवे असा मजकूर प्रसिद्ध झाला होता .
-
Nakalat Sare Ghadale (नकळत सारे घडले)
देवयानी, खरं म्हणजे त्या मेरी गो ग्रुपची मेन लीडर. तीच आकस्मिक निधन त्या सर्वानाच चटका देणारं होतं. परन्तु तिनं आपल्या मृत्युनंतरही त्यांच्यात टेक चैतन्य जागृत होतं... त्यांना प्रेरित कल. एक दिवस तिनं स्वप्नात सांगीतल, "माझ्या मृत्युनंतरही माझा आत्मा तुम्हाला सहकार्य देइल.. एवढंच नाही टार मी तुमच्या बरोबर असेल." आपल्या मित्राना दिलेलं वचन.. दिलेला शब्द त्याप्रमाण त्यांना कोणत्या ना कोणत्या अडचणींतुन, समस्येतुन वाचवलं होतं. त्या त्या उद्भवलेल्या समस्या दूर केल्या होत्या.. कधी धोक्याचे इशारे दिले होते.. सर्वसाधारण लोकांना मात्र त्यांच्या अलौकिक कर्तृत्वाबद्दल नेहमीच कुतूहल वाटत होत... अन् आश्चर्यही. मी मी म्हणणाऱ्याणा... आणि दंदेलाशाली करणाऱयानाही त्यांची जागा दाखवली. टी म्हणजे देवयानिच्या माध्यमांतून!
-
Komejlel Phul (कोमेजलेलं फूल)
'कोणती स्वप्न बघितली होती आणि काय झांल?' बाळ गेल, बाळाचे वडिल गेले. आता सुगंधानं जायची तैयारी सुरु केली. पाच-सहा महीने टी हॉस्पिटल मधेच होती. डॉक्टरांना, नर्सेसला तिल जबरदस्तीनं औषधं द्यावी लागायची. डॉक्टर कुलकर्णी रोज भेटायला यायचे. समजावून सांगायचे. पण सुगंधाचं उत्तर ठरलेलं असायचं- 'आता जगुन काय करू?'
-
Aagnimanchak (अग्नीमंचक)
मुंबईच्या सैलसर आणि पुढारलेल्या वातावरणात मनमोकळे वाटणार होते. इथे ख्रिश्चन समाज पुधारालेला असला तरी डेटिंग. रात्रिबेरात्री बॉबफ्रेंडबरोबर भटकणे हे पश्चात्य रिवाज फारसे सभ्य लोकांना रुचत नसत. मुंबईत मात्र हे चालते. शिवाय अफाट मुंबईत छिपाछिपी खेलने सोपे.भोळ्या एस्थर आन्टीला चकवणे टार त्याहुन सोपे. इथे गोव्यामधे संथ आणि ठण्ड हवेत आनखिन दोंन वर्षात तारुण्य वाया घालवण्यापेक्षा आत्ताच कॉलेज सोडून मुंबईला जाने काय वाईट? बी.ए. होउन फरक काय? थोड़ा पगार जादा मिळेल. पण एवढी पैशांची निकड नव्हतीच. पप्पांची इस्टेट खुप होती. पोर्तुगीज कायद्याने मुलीला बरोबरीने हिस्सा मिळतो. पप्पंच्या पश्यात टी, फिलिप, अग्नेस व फिलोमिना यांना इस्टेटीचा बरोबर एकेक चतकोर येणार होता. तोही थोड़ा नव्हता.
-
Vishwas (विश्वास)
'झांलं ते चांगलं झांलं सुजा जिथं प्रेम नहीं तिथं संसारही नाही. तो सुखी नक्कीच झाला असता. पण तुझ आयुष्य मात्र दु:खानं झोकाळून गेलं असतं. लग्न झाल्यावर चुकीची दुरुस्ती करता येत नाही. चुक होण्याआधीच तू सावारालीस ते ठींक झाल.' क्षणभर ते थांबले. मग तिच्याकडे एकटक पाहत म्हणाले. 'हा तुझ्या वेदना मला काळातत. पण वेदना सहन करण्याची ताकद परमेश्वरानं त्याला आधीच दिलेली असते. तो त्याची परिक्षाच पहात असतो.