-
The Legend of Bahirji Naik Part 1 (दलिजंड ऑफ बहिर्जी नाईक भाग १)
मराठा स्वराज्य १६६३ शिवाजी राजांनी पाहिलेले स्वराज्याचे स्वप्न भंग पावत आहे. उत्तरेकडे आणि दक्षिणेकडे शत्रू आहेत. सतत होणाऱ्या आक्रमणांमुळे स्वराज्याच्या सैन्याची धूळदाण उडाली आहे आणि खजिना संपत आला आहे. मुघल सुभेदार शाहिस्तेखान, मराठ्यांचे परंपरागत शहर, पुणे इथे त्याच्या ताब्यातील सैन्यासह तळ ठोकून बसला आहे. सगळ्या आशा मावळल्या आहेत. केवळ, शाहिस्तेखानला पुण्यातून बाहेर पळवून लावणे पुरेसे असणार नाही. टिकून राहण्यासाठी राजेंना स्वराज्याचा खजिना पुन्हा भरून काढवा लागणार आहे आणि सैन्याची पुनर्बांधणी करावी लागणार आहे. इथून शंभर कोसांवर एक शहर वसलेले आहे, सुरत, जणू भ्रष्टाचार आणि कारस्थानांचा नरक, पण सुवर्णाने समृद्ध. सुरतवरील हल्ल्याने राजेंच्या सर्व समस्यांचे निराकरण होणार आहे. पण सुरत मुघल हद्दीच्या खूप आत वसलेले आहे, मुघल सुभेदार इनायत खान, पाच हजारांच्या प्रशिक्षित सुसज्ज फौजेसह त्याचे रक्षण करत आहे. स्वराज्य टिकून राहण्याची आशा आता या अशक्य वाटणाऱ्या मोहिमेवर अवलंबून आहे. याची आखणी गुप्तहेर संघटनेला करावी लागणार आहे ज्याचे नेतृत्व बहिर्जी नाईक आणि त्यांचा नवशिका सहकारी, शशिध्वज, एक सोळा वर्षाचा पोरगा करत आहे, जे ही मोहीम फत्ते करण्यासाठी त्यांना ठाऊक असलेल्या सर्व गोष्टींचा वापर करत आहेत. हे गुप्तहेर, इतक्या मोठ्या प्रमाणात पसरलेल्या मुघल शत्रूच्या हद्दीत हालचाली करून राजेंचे सैन्य सुरतपर्यंत घेऊन जाऊ शकतील का? या शहराच्या राखणदारांवर मात करण्यासाठी ते काही युक्ती शोधतील का? यापेक्षा महत्वाचे, मराठी स्वराज्य विजयी होईल का? की, सार्वभौम मुघल साम्राज्याविरुद्ध उभ्या राहणाऱ्या इतर शेकडो लोकांप्रमाणे ते विनाश पावेल ?
-
Dr.Snehasudha Yanchya Nivadak Kavita (डॉ.स्नेहसुधा
डॉ स्नेहसुधा कुलकर्णी यांनी विविध काव्यगुणांनी समृध्द आणि संपन्न अशी कविता विपुल प्रमाणात लिहिलेली आहे. ती सहा काव्यसंग्रहांमधून व मान्यवर नियतकालिकांमधून काव्यप्रेमी रसिकांपुढे सातत्याने आली आहे. त्यांच्या एकुण ४६५ कवितांमधील १५१ कवितांची निवड केली असून त्यामध्ये छंदोबध्द आणि मुक्तच्छंद अशा दोन्ही प्रकारच्या कविता आहेत. छंदोबध्द कवितांमध्ये भावकविता, भावगीत, गौरवगीत, उद्देशिका, ओवी, अभंग, लावणी, गझल असे प्रकार असून प्रेमकविता, सामाजिक कविता, निसर्गकविता, आत्मचिंतनपर कविता, विनोदी कविता, विडंबनगीत, असे प्रकारही त्यांनी हाताळले आहेत.
-
Surya Girnari Mi (सूर्य गिळणारी मी)
एका कार्यकर्तीचं आत्मकथन “लग्न ही स्त्रीला एवढं आमूलाग्र बदलवणारी घटना असते? जर ती दोन जिवांची एकरूपता असेल, तर तिच्या सगळ्या अस्तित्वासह का नाही नवरा तिला स्वीकारत? का तिलाच तिच्यातून बरंच काही वजा करावं लागतं? मी माझ्या 'स्व' लाच वजा करायचं? नाही. बस झालं आता. मला जगायचं आहे. मला जगायचंच आहे. मला माझं स्वातंत्र्य हवं आहे . अगदी शेवटचे काही महिने माझी सर्व गात्रं बधिर झाली होती. दुःख, आनंद याच्यापलीकडे माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे, याची मला पूर्णपणे जाणीव झाली होती. स्वप्नहीन, भविष्यहीन, भावनाविरहीत, निर्जीव अशी होऊन गेले होते मी. ही अशी अरुणा तर माझ्या ओळखीचीच नव्हती. ओठांतून रक्त आले तरी वेदना होत नव्हत्या. कित्येक दिवस उपाशी ठेवले तरी मला भूक लागत नव्हती. ओठ आणि जीभ जखमी असताना जबरदस्तीने मला गरम चहा प्यायला लावला तरी वेदना होत नव्हत्या, की त्या मी माझ्या मनाला जाणवूच देत नव्हते? मी बधिर झाले होते हेच खरे! ज्या क्षणी मला असं वाटलं आता आपण इथे वाचू शकत नाही त्या क्षणी एका सकाळी मी माझ्या अंगावरच्या वस्त्रांनीशी घर सोडलं लपतछपत गल्लीबोळांतून जात होते. रस्त्यात एक टेलिफोन बुथ दिसला. थकलेल्या मेंदूला काहीतरी जाणीव झाली. बहिणीला फोन लागला. तिथून जवळच असलेल्या मोठ्या ताजुद्दीन बाबांच्या दर्ग्यात मी जाऊन बसले. तिथे घ्यायला माझा भाचा आशू आला; मला भिकारीण समजून तो माझ्या समोरून मलाच शोधत पुढे निघून गेला.” अशा अत्यंत दाहक अनुभवातून तावून सुलाखून निघालेला एक जीवन प्रवास! वाचायलाच हवं असं एका कार्यकर्तीचं प्रेरणादायी आत्मकथन!!