-
Kandyacha Vandha (कांद्याचा वांधा)
माणसाच्या आयुष्यातील रसिकता, विनोद काढून टाकला तर ते आयुष्य शुष्क, नीरस आणि भणंग होऊन जाईल...जीवनातला निखळ आनंद शोधूनही सापडणार नाही. अशावेळी आपल्या रोजच्या जगण्यातूनच निर्माण होणारा ‘वास्तव विनोद` म्हणजे ‘कांद्याचा वांधा` या कथासंग्रहातील कथा होय. या कथासंग्रहातील प्रत्येक कथा आपल्याला हसवते व अंतर्मुख करते. जीवनातील चतुराई शिकवते, शहाणं करून सोडते.
-
Zanzibari Masala (झांझिबारी मसाला)
झांझिबारी मसाला... आंबट, गोड, तिखट, खारट अशा सर्व चवींचं मिश्रण असणारा लज्जतदार साहित्यिक ऐवज. झांझिबारी या ऐतिहासिक बेटासोबतच जगाच्या कानाकोपऱ्यात घडणाऱ्या या खमंग कथा. यातली कित्येक पात्रं खास मराठी मातीतली, पण ती जगाच्या दुसऱ्या कोपऱ्यात रंगतदार गोष्ट गुंफत जातात. कधी कोल्हापूरचा धट्टाकट्टा मालोजी मॅटहॅटनमध्ये खंडेनवमी साजरी करतो, तर कधी पाटील पॅरिसची पोरगी पटवण्याच्या नादात भलत्याच फंदात अडकतो. या कथा कधी डच पाहुचणार घडवतात, तर कधी जपानी. त्यांचा कॅनव्हास जगातल्या भिन्न रंगी अवकाशाने व्यापलेला असला, तरी त्या तितक्याच आपल्या मातीशीही नातं सांगतात. कल्पनेचे पंख घेऊन जगाचा अवकाश अनुभवू देणाऱ्या अफलातून कथांचा हा तृप्त करणारा संग्रह.
-
Dongra Evdha (डोंगराएवढा)
प्रतिकूल परिस्थीती आणि निसर्गाशी दोन हात करत जगणारे गोपालय्या आणि त्यांना साथ देणारी पत्नी शंकरम्मा यांचे सहजीवन तसेच त्यांचा मुलगा त्या उभयतांना भेटायला येत नसल्याची हृदयातील वेदना व त्यांच्या कणखर जीवनाचे तत्त्वज्ञान सांगणारी मनोवेधक कादंबरी. मुळात कट्टद गोविंदय्या या व्यक्तीचं बोलणं, वागणं, सच्चेपणा आणि धीरोदात्त वृत्ती या कादंबरीच्या प्रेरणास्थानी आहे. लेखकाने त्यांच्या जीवनावर आधारित गोपालय्या हे पात्र साकारले आहे.
-
Mi Bahurupi Ashok Saraf (मी बहुरूपी अशोक सराफ)
या आठवणी आहेत. आठवणी माझ्या आजवरच्या प्रवासातल्या. नट म्हणून आलेल्या बर्यावाईट अनुभवांच्या. माझ्यावर झालेल्या संस्कारांच्या आणि मला भेटलेल्या , सांभाळून घेतलेल्या माणसांच्या. माझ्यासारख्या नायकाचा चेहरा नसणार्या अभिनेत्याला नाटक, सिनेमा आणि टिव्ही या तिन्ही माध्यमांमधून इतक्या वैविध्यपूर्ण भूमिका करायला मिळाल्या हा म्हटल तर चमत्कारच म्हणायला हवा. म्हटल तर? पण का म्हणायच? कारण केवळ नशिबाच्या हवाल्यावर मला इथवर मजल गाठता आलेली नाही. जे काम केल ते अतिशय गंभीरपणे, प्रामणिकपणे आणि मन लावून केल. त्यात कधीही हयगय केली नाही. कोणतही काम, मग ते छोट असो की मोठ, नायकाच असो की खलनायकाच, विनोद असो की गंभीर, मी ते माझ्या पूर्ण क्षमतेनच केल. त्यासाठी प्रचंड मेहनत घेतली. आज मी जो काही आहे, जिथे आहे ते या सगळ्याच फळ आहे. या क्षेत्रात वावरणारी, काहीतरी करू इच्छिणारी तरूण मंडळी आपापली लढाई तर लढत असणारच, पण त्यात माझ्या अनुभवांची भर पडली तर? या पुस्तकामधून त्यांना थोडी स्फूर्ती मिळाली, कामाकडे पाहण्याचा वेगळा दृष्टिकोन मिळाला आणि त्यांच्या नैराश्याच्या काळात किंचिंत आधार सापडला तरी या पुस्तकान खूप काही साधल अस मला वाटेल.