-
Krushnarang Savala (कृष्णरंगसावळा)
कृष्णांबद्दल ओशो सांगतात - कृष्ण पाच हजार वर्षांपूर्वी जन्मले; पण ते पाच हजार वर्षं पुढे होते. इतर संत-महात्म्यांचा कल विरक्तीकडे होता; पण कृष्ण मात्र भरभरून जगायला सांगतात आणि भरभरून जगतानाही आव्हानांना सामोरं जायला शिकवतात. ज्या कृष्णांनी कौरव-पांडव युद्ध टाळायचा प्रयत्न केला, म्हणजे एक प्रकारे हिंसेला नकार दिला, त्याच कृष्णांनी ऐन युद्धाच्या वेळी कच खाणाऱ्या अर्जुनाला लढायला प्रवृत्त केलं, म्हणजे हिंसेला सामोरं जाण्याचं बळ दिलं. कृष्ण एकमेव असे आहेत जे जीवनाला पूर्णत्वाने स्वीकारतात. म्हणूनच सामान्य माणसालाही ते परिपूर्णतेने जगायला शिकवतात आणि जीवनरूपी द्वंद्वाला भिडायलाही शिकवतात. ओशोंच्या मते विरक्त होणं, शांतीचा मार्ग धरणं हे चुकीचं नसलं तरी त्यातून जीवनापासून पळण्याची एक वृत्ती दिसते. त्याउलट कृष्ण जीवनाला निर्भयपणे सामोरं जायला सांगतात. कृष्णांचं इतर संत-महात्म्यांच्या तुलनेतील वेगळेपण ओशोंनी विविध उदाहरणांतून, विवेचनातून या पुस्तकाद्वारे स्पष्ट केलं आहे.
-
Bhaktichandra (भक्तिचंद्र)
संत नामदेव. एक निस्सीम विठ्ठलभक्त. आद्य कीर्तनकार, आद्य चरित्रकार, आद्य आख्यानकर्ता, कुशल संघटक, कुशल नेता अशी नामदेवांची विविध रूपं या कादंबरीतून भेटतात. नामदेवांचं बालपण ते त्यांच्या निर्वाणापर्यंतचा हा प्रवास अतिशय रसाळ भाषेत उलगडला आहे. नामदेवांचं कौटुंबिक जीवन. नामदेव-ज्ञानेश्वर भेट, ज्ञानेश्वरादी भावंडं, चोखोबा इ. अन्य संतांबद्दल नामदेवांना असलेला जिव्हाळा. या सर्वांसह त्यांनी हातात घेतलेली भागवत धर्माची पताका. महाराष्ट्राव्यतिरिक्त उत्तर प्रदेश, राजस्थान, पंजाबपर्यंत त्यांनी केलेली भटकंती आणि मराठीव्यतिरिक्त हिंदी, राजस्थानी, पंजाबी भाषेत केलेली अभंगरचना इत्यादीतून नामदेवांनी संत म्हणून केलेल्या अजोड कामगिरीचं दर्शन या कादंबरीतून घडतं. यवनांच्या राज्यातही मनाची सकारात्मकता कशी जपावी, हेच नामदेवांनी भक्तिमार्गातून, आपल्या कीर्तनांतून सूचित केलं आणि भागवतधर्माची पताका महाराष्ट्राच्या बाहेर पोहोचवली, हे त्यांचं महान कार्य अधोरेखित करणारी, भक्तिरसात चिंब भिजलेली प्रासादिक कादंबरी.
-
How To Kidnap The Rich (हाउ टू किडनॅप द रिच)
रमेश हा एक एज्युकेशन कन्सल्टंट. मध्यमवर्गीय भारतीयांच्या गाड्याचा भार ओढणाऱ्या चाकाचं जणू तो वंगण आहे. आपल्या हुशारीच्या बळावर त्यानं बनावट परीक्षा उमेदवारीचं थक्वंÂ करणारं नाट्यमय जाळं उभं केलं आहे. जणू चिनी बनावटीचा नकली परीक्षा उमेदवारच. रमेश एका श्रीमंत आणि महाआळशी किशोरवयीन रुडीसाठी बनावट उमेदवार म्हणून परीक्षा देतो. कर्मधर्म संयोगाने थेट देशात पहिला येतो. ज्याने रुडीला वेगळीच ख्याती प्राप्त होते. पण रमेशचं आयुष्य मात्र अनपेक्षित वळण घेतं. `हाउ टू किडनॅप द रिच` ही नवीन युगातल्या प्रसिद्धीची आणि यशाची एक खिळवून ठेवणारी पण वेगवान कहाणी आहे. राहुल रैना यांच्या खुसखुशीत निवेदनाचा रंगतदार नमुना !
-
The Ultimate Happiness Prescription (द अल्टिमेट हॅ
जीवनाचा हेतू्च आनंदाचा विस्तार करत जाणे आहे. प्रत्येक ध्येयाचे ईप्सित आनंदप्राप्ती हेच असते. या आनंदातून अंतिमत: मोक्ष मिळावा अशीही प्रत्येकाची इच्छा असते. या पुस्तकाचे लेखक दीपक चोप्रा यांनी आनंदप्राप्तीसाठी सात गुरुकिल्ल्या (अर्थात सात सहजसुलभ मार्ग) वाचकांच्या हाती दिल्या आहेत. या सात गुरुकिल्ल्या आहेत - स्वत:च्या शरीराचा परिचय करून घ्या, तुमच्या खऱ्या आत्मविश्वासाचा शोध घ्या, तुमच्या जीवनातून अशुद्ध तत्त्व काढून टाका, बरोबर असणं सोडून द्या, वर्तमानावर लक्ष केंद्रित करा, स्वत:मध्ये जग पाहा, मोक्षप्राप्तीसाठी जगा. या सातही मार्गांचे लेखकाने सविस्तर विवेचन केले आहे. दैनंदिन जीवनात त्याचा वापर करून प्रत्येकजण आनंदी होऊ शकतो. अशा प्रकारे सर्वजण सुखी झाल्याने अवघं जग (विश्व) आनंदमय होईल. हे पुस्तक वाचकांना भौतिक सुखांच्या पलीकडचा आनंद कसा मिळवायचा याचे विस्तृत मार्गदर्शन करते.
-
Kandyacha Vandha (कांद्याचा वांधा)
माणसाच्या आयुष्यातील रसिकता, विनोद काढून टाकला तर ते आयुष्य शुष्क, नीरस आणि भणंग होऊन जाईल...जीवनातला निखळ आनंद शोधूनही सापडणार नाही. अशावेळी आपल्या रोजच्या जगण्यातूनच निर्माण होणारा ‘वास्तव विनोद` म्हणजे ‘कांद्याचा वांधा` या कथासंग्रहातील कथा होय. या कथासंग्रहातील प्रत्येक कथा आपल्याला हसवते व अंतर्मुख करते. जीवनातील चतुराई शिकवते, शहाणं करून सोडते.
-
Zanzibari Masala (झांझिबारी मसाला)
झांझिबारी मसाला... आंबट, गोड, तिखट, खारट अशा सर्व चवींचं मिश्रण असणारा लज्जतदार साहित्यिक ऐवज. झांझिबारी या ऐतिहासिक बेटासोबतच जगाच्या कानाकोपऱ्यात घडणाऱ्या या खमंग कथा. यातली कित्येक पात्रं खास मराठी मातीतली, पण ती जगाच्या दुसऱ्या कोपऱ्यात रंगतदार गोष्ट गुंफत जातात. कधी कोल्हापूरचा धट्टाकट्टा मालोजी मॅटहॅटनमध्ये खंडेनवमी साजरी करतो, तर कधी पाटील पॅरिसची पोरगी पटवण्याच्या नादात भलत्याच फंदात अडकतो. या कथा कधी डच पाहुचणार घडवतात, तर कधी जपानी. त्यांचा कॅनव्हास जगातल्या भिन्न रंगी अवकाशाने व्यापलेला असला, तरी त्या तितक्याच आपल्या मातीशीही नातं सांगतात. कल्पनेचे पंख घेऊन जगाचा अवकाश अनुभवू देणाऱ्या अफलातून कथांचा हा तृप्त करणारा संग्रह.
-
Dongra Evdha (डोंगराएवढा)
प्रतिकूल परिस्थीती आणि निसर्गाशी दोन हात करत जगणारे गोपालय्या आणि त्यांना साथ देणारी पत्नी शंकरम्मा यांचे सहजीवन तसेच त्यांचा मुलगा त्या उभयतांना भेटायला येत नसल्याची हृदयातील वेदना व त्यांच्या कणखर जीवनाचे तत्त्वज्ञान सांगणारी मनोवेधक कादंबरी. मुळात कट्टद गोविंदय्या या व्यक्तीचं बोलणं, वागणं, सच्चेपणा आणि धीरोदात्त वृत्ती या कादंबरीच्या प्रेरणास्थानी आहे. लेखकाने त्यांच्या जीवनावर आधारित गोपालय्या हे पात्र साकारले आहे.
-
Mi Bahurupi Ashok Saraf (मी बहुरूपी अशोक सराफ)
या आठवणी आहेत. आठवणी माझ्या आजवरच्या प्रवासातल्या. नट म्हणून आलेल्या बर्यावाईट अनुभवांच्या. माझ्यावर झालेल्या संस्कारांच्या आणि मला भेटलेल्या , सांभाळून घेतलेल्या माणसांच्या. माझ्यासारख्या नायकाचा चेहरा नसणार्या अभिनेत्याला नाटक, सिनेमा आणि टिव्ही या तिन्ही माध्यमांमधून इतक्या वैविध्यपूर्ण भूमिका करायला मिळाल्या हा म्हटल तर चमत्कारच म्हणायला हवा. म्हटल तर? पण का म्हणायच? कारण केवळ नशिबाच्या हवाल्यावर मला इथवर मजल गाठता आलेली नाही. जे काम केल ते अतिशय गंभीरपणे, प्रामणिकपणे आणि मन लावून केल. त्यात कधीही हयगय केली नाही. कोणतही काम, मग ते छोट असो की मोठ, नायकाच असो की खलनायकाच, विनोद असो की गंभीर, मी ते माझ्या पूर्ण क्षमतेनच केल. त्यासाठी प्रचंड मेहनत घेतली. आज मी जो काही आहे, जिथे आहे ते या सगळ्याच फळ आहे. या क्षेत्रात वावरणारी, काहीतरी करू इच्छिणारी तरूण मंडळी आपापली लढाई तर लढत असणारच, पण त्यात माझ्या अनुभवांची भर पडली तर? या पुस्तकामधून त्यांना थोडी स्फूर्ती मिळाली, कामाकडे पाहण्याचा वेगळा दृष्टिकोन मिळाला आणि त्यांच्या नैराश्याच्या काळात किंचिंत आधार सापडला तरी या पुस्तकान खूप काही साधल अस मला वाटेल.