-
Amerikecha N Sangitlela Gelela Sakshipt Itihas (अम
अमेरिका आणि तिच्या निरंतर सत्ता नाट्याचं व्यामिश्र दर्शन घडविणारा अनमोल ऐवज म्हणजे हे पुस्तक. ऑलिव्हर स्टोन आपला आवाज सहजगत्या पडद्यावरून पुस्तकाच्या पानांवर उतरवतात. मार्मिक छायाचित्रे, खिळवून ठेवणारी वर्णने आणि अज्ञात कागदपत्रे यांनी युक्त असलेले हे माहितीपट मालिकेतले कथन, स्टोन आणि विख्यात इतिहासकार पीटर कुझनिक यांच्या, ‘द अनटोल्ड हिस्टरी ऑफ द युनायटेड स्टेट्स’चे एक संक्षिप्त रूप सादर करते. अमेरिकेच्या अपवादात्मकतावादाच्या प्रचलित, रूढ मतांना हे आव्हान देते आणि अमेरिका तिच्या लोकशाही मूल्यांपासून किती दूर गेली आहे हे दाखवते, तसेच आपल्याला पुन्हा मार्गावर आणण्याकरता ज्यांनी संघर्ष केला त्या प्रबळ शक्तींचे दर्शन घडवते.
-
Sangati (सांगाती)
सांगाती हा प्रवास आहे, कलावंतांच्या सर्जनशीलतेला कुर्निसात घालणारा. या विलक्षण पुस्तकात सदानंद कदम आपल्याला साहित्य, संगीत, चित्रकला अशा विविध कलाप्रकारातील अवलियांची भेट घडवतात. या कलाकारांच्या कलासक्त जाणिवांची रेखीव मांडणी करतात. अनेक किस्से, प्रसंग आणि आठवणींचा पट उलगडत जात हे पुस्तक जणू अनेक प्रतिभावंतांशीच आपली ओळख घडवतं. गोनीदां, कुसुमाग्रज, विंदा, ‘स्वामी’कारांपासून, वपु, सुशि, खेबूडकर, ‘मृत्युंजय’कारांपर्यंत सगळ्यांचं जिव्हाळपण सांगातीच्या शब्दाशब्दात उतरतं.
-
Gurukilli Smaranshaktichi (गुरुकिल्ली स्मरणशक्तीची
स्मरणशक्तीचा विकास करणे, हा सगळ्यांसाठी उत्सुकतेचा विषय असतो. स्मरणशक्ती वाढवण्याची तंत्रे आणि त्यांची उपयुक्तता सांगणारे हे पुस्तक आहे. स्मरणशक्ती विकासाचे उद्दिष्ट साध्य करण्याचे मार्ग आणि स्मरणशक्तीची तंत्रे याविषयी हे पुस्तक मार्गदर्शन करते. ही तंत्रे कशी समजून घ्यायची इथपासून ते त्यावर प्रभुत्व कसे मिळवायचे इथपर्यंतचे सगळे टप्पे या पुस्तकात सांगितले आहेत. या तंत्रांचा तुमच्या व्यावसायिक वाटचालीमध्ये सुयोग्य वापर कसा करावा, याचेही मार्गदर्शन या पुस्तकातून मिळते. वाचकाने सक्रिय सहभाग नोंदवावा, या उद्देशाने पुस्तकात कृतिपेटिका दिल्या आहेत. असा सहभाग वाचकांना उपयुक्त ठरू शकतो. जसे, या संकल्पनांचा दैनंदिन जीवनात उपयोग करण्याच्या क्षमतांमध्ये वृद्धी होईल. तसेच, या मार्गदर्शनातील आशय त्यांना चांगल्या रीतीने आकलन होईल. स्मरणशक्ती वाढविण्यासाठीचे सविस्तर, उपयुक्त मार्गदर्शन.
-
Asa Asava Aai Pan (असं असावं ‘आई’पण)
हे पुस्तक मातृत्वाविषयी सांगत असतानाच त्याबरोबर येणाऱ्या जबाबदाऱ्या, समस्या यांचाही परामर्श घेते. आई म्हणून तुम्हाला मूल्यांचे महत्त्व निश्चितपणे अधिकच वाटते. मातृत्वासाठी आवश्यक असणारा विश्वास तुम्ही कसा मिळवाल, त्यासाठी कशा प्रकारचे प्रयत्न करावेत, मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी तुम्ही काय कराल इत्यादींबरोबरच प्रामाणिकपणा, सहनशीलता, नम्रता, औदार्य, सत्यता, शिस्त, क्षमाशीलता ही आणि अशी इतर मूल्ये आपल्या मुलांमध्ये रुजावीत असे सर्वच मातांना वाटते. त्यासाठीचे योग्य मार्गदर्शन या पुस्तकात केले आहे. त्याचबरोबर लहान-मोठ्या प्रश्नांची उत्तरे या पुस्तकात दिली आहेत. आई म्हणून तुमच्याकडे आवश्यक असणारा दृष्टिकोन, तुमची शैली याविषयीही हे पुस्तक सविस्तर चर्चा करते.
-
Vegalya Vatevarcha Doctor (वेगळ्या वाटेवरचा डाॅक्ट
‘मेडिसिन्स सान्स फ्रॉन्टिअर्स` या सेवाभावी संस्थेतर्फे डॅमियन ब्राऊन हा तरुण ऑस्ट्रेलियन डॉक्टर स्वयंसेवक म्हणून मोठ्या आत्मविश्वासाने आफ्रिकेत पोहोचतो. पण त्याची नेमणूक एका दूर, चहूबाजूंनी भू-सुरुंग पेरलेल्या, सर्वत्र निव्वळ मातीच्या झोपड्या असलेल्या शहरात झालेली असते. या नव्या डॉक्टरसाठी सगळीच परिस्थिती अपरिचित असते. ‘अंगोलन वॉर`चा प्रत्यक्ष अनुभव असणारे, त्याच्या दुप्पट वयाचे, इंग्लिश बोलू न शकणारे आणि पहिल्याच दिवसापासून वितंडवाद घालणारे आरोग्यसेवक त्याच्यासोबत असतात. पण तरी डॅमियन सर्व आव्हानांना धैर्यानं तोंड देतो. तीन स्वयंसेवकांच्या मदतीनं तिथल्या समाजातला असमंजसपणा, तर्कविसंगतता अशा गोष्टींशी लढत राहतो. कधी चित्त्याच्या हल्ल्यात जखमी होणारी माणसं, कधी भू-सुरुंगाचा स्फोट, तर कधी चुलीवर हत्यारं उकळून कराव्या लागणाNया शस्त्रक्रिया अशी आव्हानं सतत त्याच्या पुढ्यात असतात, तरी स्थानिकांशी मैत्री जुळवत तो परिस्थितीवर मात करतो. ‘वेगळ्या वाटेवरचा डॉक्टर’ हे अंगोला, मोझाम्बिक आणि दक्षिण सुदान इथल्या वैद्यकीय दुरवस्थेवर प्रकाश टाकणारं प्रभावशाली पुस्तक आहे. वैद्यकीय क्षेत्रातील मानवहितवादी गट आणि त्यांच्यासाठी काम करणारी- विक्षिप्त; पण असामान्य अशी माणसं, यांच्याबद्दलची प्रामाणिक मत मांडणारं, हे एक हृदयाला भिडणारं पुस्तक आहे.
-
Katha Ya Kshanachi (कथा या क्षणाची)
नाओ नावाची जपानी मुलगी डायरी लिहिते...ती डायरी एका बेटावर राहणाऱ्या लेखिकेला, रुथला सापडते...नाओ आणि रुथच्या प्रथमपुरुषी निवेदनातून कादंबरी पुढे सरकत राहते...नाओचे वडील सिलिकॉन व्हॅलीमधल्या एका मोठ्या कंपनीत नोकरी करत असतात...ते नावाजलेले कॉम्प्यूटर प्रोग्रामर असतात...पण त्यांची नोकरी जाते आणि नाओ तिच्या आईविडिलांसह टोकियोला येते...शाळेतल्या मुलांकडून नाओवर होणारं रॅगिंग, तिच्या वडिलांचं नैराश्य, त्यांनी आत्महत्येचे केलेले प्रयत्न...एवूÂणच, झाकोळलेलं नाओचं जीवन...तिची बौद्ध धर्माचं अनुसरण करणारी पणजी जिकोचा तिच्यावर प्रभाव...एका क्षणी वडिलांच्या नोकरी जाण्याचं आणि त्यांच्या आत्महत्येच्या प्रयत्नांमागचं कारण नाओला समजणं आणि त्याच वेळी जीवनाकडे सकारात्मकतेनं पाहण्याचा दृष्टिकोन गवसणं...नाओची डायरी वाचून तिला भेटण्याची उत्सुकता रुथच्या मनात दाटून येणं... क्वान्टम फिजिक्स थिअरी, व्यावहारिक जीवन, अध्यात्म आणि विज्ञानाची सांगड घालणारी, बुकर पुरस्कारासाठी नामांकन मिळालेली विलक्षण कादंबरी
-
Mind Master (माइंड मास्टर)
विश्वनाथ आनंद म्हणजे 64 घरांचा राजा. बुद्धिबळाच्या पटावरचा अनभिषिज्ञ सम्राट. तब्बल पाच वेळा विश्वविजेतेपदावर मोहोर उमटवणारा विजेता. त्यांच्या या आत्मकथनात लहानग्या विशीपासून ते विश्वविजेत्याच्या जडणघडणीतील अनेक टप्पे उलगडत जातात. बुद्धिबळाच्या गंतवून टाकणाऱ्या पटाइतकंच हे आत्मकथन गुंतवून टाकतं. वयाच्या सहाव्या वर्षी सुरू झालेला आनंदचा प्रवास, विश्वविजेतेपदावर वर्चस्व गाजवत त्यानं रशियाची मोडीत काढलेली मक्तेदारी, जगाच्या कानाकोपऱ्यात स्पर्धांसाठी केलेला प्रवास, क्रीडा प्रकारातलं राजकारण, त्याचं कुटुंब ते अगदी निवृत्तीच्या संकेतांमधली त्याची तगमग अशा अनेक गोष्टींना स्पर्शून जातात.
-
Warren Buffett Yanche Guntavanuk Mantra (वॉरन बफे
खेळण्या-बागडण्याच्या वयात एखादं मूल कोकच्या बाटल्या विकतं, घरोघरी वर्तमानपत्र टाकतं. एवढंच नव्हे तर यांसारखे अनेकविध व्यवसाय करून मिळवलेल्या रकमेतून अकराव्या वर्षी शेअर्सची खरेदी करतं... लवकरच जमीन विकत घेतं आणि इन्कम टॅक्सचं रिटर्न दाखल करून हशारीने आपली मिळकत व खर्च यांचा हिशेबही मांडतं... ही कोणतीही काल्पनिक कथा नव्हे तर हे आहे दिग्गज गुंतवणूकदार वॉरन बफे यांच्या बालपणाचं वर्णन... जगाला स्तिमित करणारं गुंतवणुकीचं साम्राज्य उभं करणारे वॉरन जितके श्रीमंत आहेत तितकेच मूल्यसंपन्नही. सर्वोच्च दर्जाची व्यावसायिक तत्त्वं आणि अफाट दानशूरता हे त्यांच्या लखलखत्या कारकिर्दीतील महत्त्वाचे पैलू. व्यवस्थापनातील आदर्श असलेल्या वॉरन यांनी आपल्या यशाची सूत्रं वेळोवेळी सर्वांसमोर खुली केली आहेत. त्याचबरोबर दीर्घकालीन गुंतवणुकीकडे बघण्याचा विवेकी दृष्टिकोन देऊन त्यांनी गुंतवणूकदारांसमोर आदर्शही ठेवला आहे. त्यांच्या याच दृष्टिकोनातून आकाराला आलेले हे अनोखे गुंतवणूक मंत्र वाचकांसाठी दीपस्तंभ ठरतील.