-
Harit Yuddhe (हरित युद्धे)
एका पर्यावरण पत्रकार स्त्रीने केलेलं अनुभवकथन म्हणजे ‘ग्रीन वॉर्स.’ पर्यावरण रक्षणाच्या विविध मोहिमांदरम्यान आलेले हे अनुभव आहेत. त्या अनुभवांचं हे तपशीलवार चित्रण आहे. गारुड्यांचं पुनर्वसन, सारस पक्ष्यांना वाचविण्याची मोहीम, सुसरींच्या कमी होणाnया संख्येबाबत अभ्यास, मेघालयातील जंगलतोड थांबविण्यासाठी केलेले प्रयत्न, हुलॉक वानरांसाठी चालवलेलं मुक्तिकेंद्र, ‘सरस्वती वन्यजीव अभयारण्य’ वाचविण्यासाठी उघडलेली मोहीम, गोव्यात खाणमाफियांना दिलेली टक्कर, इंडोनेशियातील जंगल आणि ओरंग उटान माकडाचं अस्तित्व जपण्यासाठी केलेले यशस्वी प्रयत्न, हिमनद्या, ग्लोबल वॉर्मिंगसाठी अभ्यासदौरा इ. विविध प्रकारच्या पर्यावरण मोहिमा त्यांनी राबवल्या. तर पर्यावरणाच्या विविध अंगांचा बहार यांनी केलेला अभ्यास, पर्यावरणाच्या त्या त्या प्रश्नातील वंगोरे आणि आव्हानं, या समस्यांच्या संदर्भातील त्यांना भेटलेली माणसं इत्यादी बाबींबद्दल बहार यांनी वाचकांशी साधलेला हा.
-
Sokol Griho Haralo Jar (शोकोल ग्रिह हारालो जार)
अनंत अडचणींचा सामना करत, खुनाच्या धमक्या येऊनसुद्धा अंतरातल्या आवाजाला सतत प्रतिसाद देत, तळमळीने, निर्भयपणाने लिहिणाऱ्या मोजक्या लेखकांपैकी एक अग्रगण्य नाव म्हणजे तसलिमा नासरिन. ‘शोकोल ग्रिह हारालो जार’ हे पुस्तक उपरोक्त विधानाला पुष्टी देणारे असेच आहे. या पुस्तकात तसलिमाने विविध विषयांचा परामर्श घेतला आहे. अगदी अमेरिकेच्या निवडणुकीपासून ते फिडेल कॅस्ट्रोच्या क्यूबापासून अंधश्रद्धांपर्यंत अनेक विषयांवर तिने पोटतिडकीने, निर्भयतेने रोखठोक शब्दांत स्वतःची मते मांडली आहेत. त्याचबरोबर स्वतःच्या आयुष्यातील अडचणी, अन्याय, एकाहत्तर सालच्या कटू आठवणी यांबद्दलही लिहिले आहे. सर्व प्रकारची विषमता दूर होऊन सर्व जग म्हणजे एक एकसंध, सुसंस्कृत, मानवतावादी समाज घडावा, ही तळमळ हा तिच्या लिखाणाचा पाया आहे.
-
Udayan (उदयन)
‘कथासरित्सागर’ या सोमदेव शर्मा यांनी रचलेल्या संस्कृत ग्रंथात उदयनकथा विस्ताराने कथन केली आहे. राजेन्द्र खेर यांनी उदयन-वासवदत्ता यांची हीच भावमधुर प्रेमकथा उत्कटतेने रंगवली आहे. कलासक्त उदयन संगीतसाधना आणि विलासात मग्न होतो. त्याचीच परिणती वत्सदेशाच्या पतनात होते. पांडवानंतरच्या पाच पराक्रमी पिढ्यांनी अबाधित ठेवलेल्या सम्राज्याला पराजयाचे ग्रहण लागते. सम्राटपद गमावलेला उदयनराजा वीणावादन आणि नाट्यशालेत मश्गूल असतो. त्याचे वीणावादन इतके कर्णमधुर असते, की त्या स्वर्गीय वादनामुळे श्रोतेच नव्हे, तर पशुपक्षी, मदोन्मत्त हत्ती आणि निसर्गसुद्धा मंत्रमुग्ध होतो. अवंतीनरेश प्रद्योत आपली रूपसुंदर कन्या वासवदत्ता हिला वीणावादन शिकविण्यासाठी उदयनचं कुटिल डाव रचून अपहरण करतो. वीणेच्या प्रशिक्षणकाळात घडलेल्या सहवासातून उभयतांचं परस्परांवर प्रगाढ प्रेम बसतं. कलेच्या साक्षीने त्यांची प्रेमाराधना पुâलत जाते. वत्सदेशाचे महाअमात्य यौगंधरायण यांच्या मनात पराजयाचं शल्य असतंच, त्यात उदयनच्या अपहरणाच्या व्यथेची भर पडते. ते प्रतिज्ञा करतात... पुढे काय काय वेगवान घटना घडतात ते जाणून घेण्यासाठी ही उत्वंâठावर्धक कादंबरी अवश्य वाचायला हवी. ही कथा जशी उदयन-वासवदत्ता या युगुलाची आहे, तशीच साम्राज्याच्या पुनस्र्थापनेची प्रतिज्ञा घेणारे चाणाक्ष
-
Churchilchya Paulkhuna (चर्चिलच्या पाऊलखुणा)
दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ब्रिटनचं यशस्वी नेतृत्व केलेले ख्यातकीर्त नेते म्हणजे विन्स्टन चर्चिल. जागतिक इतिहासात त्यांची कामगिरी कधी सुवर्णाक्षरांनी नोंद व्हावी अशी, तर कधी विपरीत अर्थाने इतिहास घडवणारी ठरली. अशा या वादळी वा आलेख या पुस्तकामध्ये मांडला आहे. चर्चिल यांचे राजकीय व आणि वैयक्तिक जीवन या अपरिहार्यपणे एकमेकांमध्ये मिसळलेल्या वाटा होत्या. विन्स्टनच्या स्वभावाचे पडसाद त्यांच्या सार्वजनिक जीवनावर आणि पर्यायाने ब्रिटनच्या आणि उर्वरित जगाच्याही पटलावर कसे उमटले? याचा मार्मिक लेखाजोखा होम्स यांनी मांडला आहे.
-
River God (रिव्हर गॉड)
फेरोंच्या आधिपत्याखालील, सोन्याचा प्रचंड साठा असलेल्या एका समृद्ध प्रदेशातील म्हणजे इजिप्तमधील ही कहाणी आहे. पेÂरो मेमोसे हे इजिप्तचे राजे आहेत. इन्टेफ हा वजीर आहे. त्या वजीराला एक सुंदर मुलगी असते, लॉस्ट्रीस. ताईता, हा इन्टेफ वजीराचा गुणी गुलाम असतो. इन्टेफ हा व्रूÂर आणि विकृत असतो. त्याला स्त्रियांऐवजी पुरुषांबद्दल शारीरिक आकर्षण असते. तरुण गुलाम मुलांचं लैंगिक शोषण तो करत असतो. त्या दृष्टीने ताईता हा त्याचा आवडता गुलाम असतो. तसेच ताईताला वैद्यकशास्त्राची, ज्योतिषशास्त्राची चांगली माहिती असते, एवूÂणच तो हुशार असल्यामुळे त्याच्यावर इन्टेफची मर्जी असते. पण, अलीडा नावाच्या युवतीवर ताईताचं मन जडतं. हे जेव्हा इन्टेफला समजतं, तेव्हा तो ताईतासमोर अमानुष रीतीने अलीडाला मृत्युदंड देतो. अलीडाला मृत्युदंड देण्याचं काम रासफर या अधिकाNयाने केलेलं असतं.
-
Chotya Shaharacha Darya (छोट्या शहराचा दर्या)
ही गोष्ट आहे आयुष्याच्या पटावरील घटनांना अनिवार्यपणे सोसणाऱ्या एका किशोरवयीन मुलाची. वडिलांच्या दुर्धर आजारामुळं त्यांना त्यांच्या मूळ गावी अखेरचा श्वास घ्यायचा असतो. पण त्यांच्या इच्छेनं नायकाचं आयुष्य मात्र ढवळून निघतं. त्याचं मोठ्या शहरातलं धावपळीचं आयुष्य उखडून छोट्या शहरात रूजवलं जातं. तिथं जुळवून घेण्यासाठीची त्याची धडपड नव्या अवकाशातील माणसं..त्यांचं जगणं..नायकाच्या आयुष्याचा भाग होत जातं..पण तेव्हाच एक नवी वेदना त्याच्या पुढ्यात येऊन उभी राहते. प्रेम, मैत्री आणि नातेसंबंधांवरील मनाची पकड घेणारी कादंबरी.
-
Mahagai Ek Chakravyuh (महागाई एक चक्रव्यूह)
महागाई हा विषय केंद्रस्थानी घेऊन महागाईला कारणीभूत ठरणाऱ्या प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष गोष्टींबद्दल व महागाईवर परिणाम करणाऱ्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय घडामोडी, नियम, करार इत्यादी गोष्टींचा ऊहापोह करण्याचा प्रयत्न लेखनाद्वारे केलेला आहे. त्याच वेळेला प्रसारमाध्यमे, राजकारणी, प्रशासकीय अधिकारी व सर्वसामान्य जनता यांनी हक्काबरोबर कर्तव्याची जाण ठेवल्यास फक्त महागाईच नाही, तर भेडसावणाऱ्या सर्व अडचणींवर मात करणे कसे सोपे जाईल, याबद्दलही विचार मांडले आहेत.
-
Chasing Tomorrow (चेसिंग टुमॉरो)
ट्रेसी व्हिटनी या सौंदर्यवतीच्या आयुष्यात जेफ स्टीव्हन्सच्या रूपाने एक देखणा तरुण येतो आणि ते दोघे लग्नाच्या बेडीत अडकतात. जवाहिरांच्या, पुरातन मौल्यवान वस्तूंच्या चोऱ्या करण्याचे आपले जुने आयुष्य मागे ठेवून संसाराला लागतात. पण त्यांचा हा आनंद अल्पकाळच टिकतो. एक प्रचंड वावटळ त्यांच्या आयुष्यात येते आणि त्यांचा संसार उधळून लावते. त्यांच्या औटघडीच्या संसाराला कायमचे ग्रहण लागते. ट्रेसी जेफच्या आयुष्यातून नाहीशी होते. जेफ सैरभैर होतो आणि तिला शोधण्यासाठी जंग जंग पछाडतो. पण त्याला आपल्या पत्नीचा काहीही ठावठिकाणा लागत नाही.