-
Nipun Shodh (निपुण शोध)
‘सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट’ हे डार्विननं सांगितलेलं तत्त्व ‘कॉर्पोरेट विश्वा’लाही लागू पडतं. कोट्यवधी रुपये – डॉलर्सची उलाढाल करणाऱ्या या जटिल कॉर्पोरेट जगातली कामंही अजबच! कंपनीला जाहिरातीविना अधिकारी नेमायचा असतो. एखाद्या कंपनीतला प्लँट नव्याने उभारून तो कार्यान्वित करण्याची टोकाची तातडी असते. त्या प्लँटसाठी काम करणारी संपूर्ण ‘टीम’ त्वरित नेमून देणारा कुणी हवा असतो. ‘वर्क फ्रॉम होम’च्या नव्या जमान्यात एखादा बनेल अधिकारी एकाच वेळी दोन कंपन्यांत बेकायदेशीरपणे नोकऱ्या करत असतो. अशा लबाड्या पकडणाऱ्याची गरज असते. अशी नानाविध कामं करणारा जादूगार : ‘हेडहंटर’! गिरीश टिळक या निष्णात ‘हेडहंटर’चे देशविदेशांतल्या कंपन्यांसाठी कामं करतानाचे वास्तव अनुभव इतके नाट्यमय, उत्कांठावर्धक आहेत की, काल्पनिक, रंजक कथाही फिक्या ठराव्यात!
-
Padadyamagche Kisse (पडद्यामागचे किस्से )
रंगमंचावर नाटक सादर होते , तेव्हा त्यातील नाट्य प्रेक्षकांचे मनोरंजन करते ; पण नाटक रंगमंचावर सादर होण्याआधी आणि नाटकाचा पडदा पडल्यानंतरही काही मजेशीर आणि कधी काही गंभीरसुद्धा किस्से , प्रसंग घडत असतात , कधी अनवधानाने , कधी अपघाताने , कधी विविध प्रकारच्या स्वभावप्रकृतींमुळे , तर कधी अनपेक्षितपणे उद्भवलेल्या अडचणींमुळे अशा गोष्टी घडतात , त्या प्रेक्षकांसमोर कधीच येत नाही , त्यातील गंमत ही त्यांत गुंतलेल्या लोकांपुरतीच राहते , लेखक राज्य शासनाच्या सांस्कृतिक संचालनायात कार्यरत होते ,शासनाच्या हौशी नाट्य - नृत्य - चित्रपट - संगीत - लोककला आदि स्पर्धा - महोत्सवांच्या आयोजनात ते सक्रिय होते , त्यांनी त्यांच्या आठवणीतले निवडक किस्से या पुस्तकात हलक्याफुलक्या शब्दांत सांगितले आहे , ते वाचनीय तर आहेतच , शिवाय त्यातून रंगभूमी व अशा स्पर्धा - महोत्सवांचे विविध पैलूही उलगडले आहे ,
-
Jeevansafalyasathi Vicharanchya Chandanya ( जीवनसा
आपल्या ठायी असलेल्या 'विचारशीलता' या स्वभावविशेषाद्वारे कुठलीही कृती प्रत्यक्षात साकारते , अमुर्त संकल्पनांना मूर्त स्वरूप मिळते , नेमका हाच धागा पकडून लेखकाने या पुस्तकातील लेखांद्वारे वैचारिक चांदण्यांची उधळण केली आहे , वाचनाचा निखळ आनंद देण्यासोबतच हे विचार सर्वानांच अंतर्मुखही करतात ; किंबहुना ते आत्मचिंतनाकडे नेणारे आहेत , आपलं जीवन सर्वार्थाने तेजाळण्याची क्षमता असलेल्या या 'विचारांच्या चांदण्या !'
-
Paragrahavarun Corona Aani… (परग्रहावरून कोरोना आण
विज्ञान काल्पनिका-वास्तविका या अनोख्या स्वरूपातली ही ‘कोरोना’ या विषयावर आधारित कादंबरी. जगभर कोरोना कसा पसरला आणि सगळ्या देशांनी तो थोपवण्याचे कसे प्रयत्न केले, हे समग्रपणे मांडणारी ही कादंबरी. वैज्ञानिकदृष्ट्या अतिशय सुस्पष्ट आणि सहजशैलीत अभिव्यक्त झालेली ही कादंबरी मानवी स्वभाववैशिष्ट्यांवरही प्रकाश टाकते. सत्य आणि कल्पना या दोन्ही स्तरांवर विहरणारी ही कादंबरी कोरोनाच्या साथीचा मुद्देसूद आणि परिपूर्ण लेखाजोखा मांडते. प्रत्येक पानागणिक वाचकांची उत्सुकता वाढवणारी आणि देशोदेशींच्या रोमहर्षक घटनांसह अनेक देशांचे चित्रण करणारी ही विज्ञान काल्पनिका- वास्तविका.
-
Apurvarang 4 (अपुर्वरंग 4)
‘अपूर्वरंग’ या मालिकेतील या शेवटच्या पुष्पात मीनाताई आपल्याला जपान दाखवतात.
-
Apurvarang 3 (अपुर्वरंग 3)
अपूर्वरंग ३ या पुस्तकात केलेली प्रवासवर्णने. १. सिंगापूर, २. इंडोनेशिया, ३. फिलिपीन्स, ४. ताइवान, ५. कोरिया
-
Apurvarang 2 (अपुर्वरंग 2)
अपूर्वरंग २ या पुस्तकात केलेली प्रवासवर्णने. १. अंदमान, २. म्यानमार, ३. व्हिएटनाम, ४. कंबोडिया, ५. थायलंड, ६. मलेशिया
-
Four Seasons (फोर सीझन्स)
कामायनी ही व्यक्तिरेखाच आपल्या आयुष्याचा पट आपल्यासमोर उलगडत आहे. निर्णय एकटीनं घेऊन तो परिणामांसकट जबाबदारीनं निभावण्याची हिंमत तिच्यात यावी ही तिच्या बाबाची अपेक्षा तिनं कधीच पूर्ण केली नाही. तिच्या आयुष्यात वेगवेगळ्या टप्प्यांवर आलेल्या पुरुषांनी त्यांच्या विचारांच्या प्रभावाखाली तिचे निर्णय झाकोळून टाकले. आणि मग त्यांचे टेकू घेतले म्हणूनच तिचं आयुष्य आQस्थर राहिलं. आपलं आयुष्य आपल्या स्वतःच्या विचारांच्या पायावरच भक्कम आणि ठाम स्थिरावू शकतं, हे शिकायला तिला माळरानावरच्या या कणखर कातळावर यावं लागलं. इथल्या चार ऋतूंमध्ये ती जे शिकली ते आजवर मिळालेल्या धड्यांपेक्षा कितीतरी अधिक, जास्त सकारात्मक आहे. सगळं संपल्यानंतरही नव्याने जीवन सुरू करण्याची उमेद, जीवनचक्रातली लय, ठामपणा, चिवटपणा.. आयुष्याने जे दान दिलं ते स्वीकारून, अन्यायाने कुढत न बसता नव्या वाटा शोधत पुढे जाण्याची जीवनेच्छा, विस्थापनानंतरचं स्थलांतर, नवजीवन.. या कातळावर, इथल्या ओसाडीत तिच्यात बरंच काही नव्यानं रुजलं. निसर्गाचं- ऋतूंचं एक जीवनचक्र माळरानानं आश्वासकतेनं पूर्ण करून दिलं, अशीच भावना घेऊन ती या माळरानावरून पुढच्या प्रवासाकरता निघते.
-
Chanaksha (चाणाक्ष)
अनासक्ती, अफाट व्यासंग, चाणाक्ष बुद्धिमत्ता, धोरणी राजकारण, इतक्या सर्व सद्गुणांचा समुच्चय एका चाणक्य नावाच्या व्यक्तीत झाला आहे. धूर्त व यशस्वी राजकारणी असून देखील चाणक्याला राजपदाचा मोह नव्हता. राजसत्तेच्या वैभवाला निर्मोही वैराग्याची जोड असणे, हा आदर्श आर्य संस्कृतीचा विचार चाणक्यामुळे दृढ झाला. वर्तमान जगताला आजदेखील या परंपरेची नितांत आवश्यकता भासते आहे, हे अमान्य करून चालणार नाही. सामान्यत: फारसा परिचित नसलेला हा एका महानायकाचा इतिहास कथास्वरूपात या कादंबरीत मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
-
The Greater Goal (द ग्रेटर गोल)
कंपनीचा अध्यक्ष म्हणून नव्यानेच सूत्रे हाती घेतलेल्या अॅलेक्स बेकले नावाच्या एका तरुणाची ही कथा आहे. कंपनीचा अध्यक्ष म्हणून जबाबदारी पेलताना अॅलेक्सला आपल्या व्यावसायिक व कौटुंबिक जीवनातील अयशस्विता प्रकर्षाने जाणवत असते. अशातच त्याला जीवघेणा अपघात होतो. अपघातातून वाचलेल्या अॅलेक्सला कंपन्यांसाठी सल्लागार व विशेष तज्ज्ञ सल्लागार म्हणून काम करणारा क्विन मॅक्डगॉल मार्गदर्शक म्हणून भेटतो. तो अॅलनला पाच महत्त्वाच्या आचरण पद्धती सांगतो. त्या आचरण पद्धतींचा सखोल अभ्यास आणि अवलंब करून अॅलनचं व्यावसायिक आणि कौटुंबिक जीवन कसं बहरतं, याची मनोवेधक आणि मार्गदर्शक कहाणी आहे ‘द ग्रेटर गोल.’
-
Anitala Jamin Milto (अनिताला जामीन मिळतो)
कायदेमंडळे आणि सरकार म्हणजे लोकशाहीचे दोन आधारस्तंभ. पण या व्यवस्थांमधला गलथान कारभार अनेकदा नागरिकांच्या मूलभूत हक्कांचीच पायमल्ली करतो. याचा अनुभव खुद्द माजी मंत्री असलेल्या अरुण शौरी यांनी घेतला. त्यांनी अनुभवलेल्या या मनस्तापजनक घटनेची कारणमीमांसा करत शौरी यांनी भारतीय न्यायव्यवस्थेच्या कारभारावरच या पुस्तकात प्रकाश टाकला आहे.
-
Shivputra Rajaram (शिवपुत्र राजाराम)
मराठ्यांच्या राष्ट्रजीवनातील अत्यंत कठीण अशा काळात अकरा वर्षं नेतृत्व करणाऱ्या छत्रपती राजारामांची चरितकहाणी आहे ‘शिवपुत्र राजाराम.’ मराठी सरदार आणि मुत्सद्दी यांना एकत्र आणून बलाढ्य अशा मोगल साम्राज्याला टक्कर देण्यासाठी प्रेरित करणाऱ्या, त्यांच्या शौर्याला, आक्रमक वृत्तीला पूर्ण स्वातंत्र्य देणाऱ्या, उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत, पश्चिमेपासून पूर्वेपर्यंत मराठी वीरांनी उभारलेल्या प्रखर स्वातंत्र्यलढ्याचं नेतृत्व करणाऱ्या राजाराम महाराजांची तेजस्वी जीवनगाथा.