-
Fault Line ( फ़ॉल्टलाइन )
पर्यावरणाचा विचार न करता ऐश आरामासाठी माणसाला धावताना बघताना बेसुमार इंधनांचा वापर करताना त्याहीपेक्षा त्यामागची बेफिकिरीची भावना पाहून मनात निर्माण होणाऱ्या प्रश्नांनी एका काल्पनिक वैज्ञानिक कथेचं रूप घेतलं . एरव्ही स्वतः पुरतीच असणारी आणि वाढीस आलेली भावनिकता पाहता ही काल्पनिक असणारी गोष्ट खरोखर होऊ शकते . अशीदेखील भीती वाटली . या आणि अशाच विचारांनी एका कथेच्या रूपाने घेतलं .
-
Jinkun Denarya Savai ( जिंकून देणार्या सवयी )
जीवनात ध्येयप्राप्तीच्या मार्गावर वाटचाल करताना आपल्या अनेक कृतींचे सवयीत रूपांतर होते. आणि त्याच सवयी आपल्याला ‘जिंकून देणार्या सवयी’ ठरतात. त्याचे समग्र विवेचन या पुस्तकात आले आहे. विजेता नेमका कशामुळे ‘विजेता’ होतो? हे स्पष्ट करणारे पुस्तक. अनेक प्रथितयश आणि लोकप्रिय व्यक्तींच्या आयुष्यासंदर्भातल्या उदाहरणांद्वारे झालेली सहजसोपी मांडणी हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य. शक्यता दृढतेत बदलली जाण्यासाठी, क्षमता योगदानात बदलली जाण्यासाठी आपल्या सवयी या जिंकून देणार्या सवयी ठरतात. त्यामुळे आयुष्याला खर्या अर्थाने गती प्राप्त होते. हे विशद करणारे पुस्तक. जिंकून देणर्या सवयींची जोपासना हा आपल्याला पुढे नेण्याचा एकमेव मार्ग कसा ठरू शकतो याचं मर्म उलगडणारं पुस्तक.
-
Apala Vyaktimattwa Ghadavinyasathi ( आपलं व्यक्तिम
नवीन आव्हानं आणि प्रतिष्ठा मिळविण्याच्या दृष्टीने आटोकाट प्रयत्न करण्यासाठी आपण स्वत:ला जेव्हा सिद्ध करतो, तेव्हा खर्या अर्थी विकास घडून येतो, याचे महत्त्व विशद करणारे पुस्तक. छोट्या-छोट्या पैलूंच्या साहाय्याने आपले व्यक्तिमत्त्व कशा प्रकारे आकारास येऊ शकते, हे या पुस्तकात स्प्ट केले आहे. स्वत:चे व्यक्तित्व घडविण्याच्या दृष्टीने जी ठिणगी चेतवली जाण्याची गरज आहे, तिचे अनन्यसाधारण महत्त्व विशद करणारे पुस्तक. आपलं व्यक्तिमत्त्व योग्य प्रकारे घडविण्यासाठी ‘तुम्ही कशाची वाटत पाहात आहात?’ तर त्याचं उत्तर देऊ शकणारं महत्त्वपूर्ण पुस्तक.
-
Sahaj, Sobat Jodidarachi ( सहज, सोबत जोडीदाराची )
विवाह या अतिशय सुंदर अशा नात्याचा गाभा उलगडणारं हे पुस्तक आहे. छोट्या छोट्या गोष्टींच्या वा कृतींच्या प्रत्यक्ष अवलंबनाद्वारे आपलं वैवाहिक जीवन कसं परिपूर्ण करता येईल, याचं मर्म उलगडणारं हे पुस्तक आहे. लेखकाने खुमासदार शैलीत वेगवेगळ्या उदाहरणांद्वारे वैवाहिक नात्यातल्या महत्त्वपूर्ण बाबी उलगडल्या आहेत. वैवाहिक जीवनातले खाचखळगे ओळखा आणि दूर करा या विचारसूत्राभोवती फिरणारं पुस्तक. प्रत्येक जोडप्याने एकमेकांना आवर्जून भेट द्यावं असं पुस्तक.