-
Rebel Sultans (रिबेल सुलतांस)
रिबेल सुलतान्स हे एक नेत्रदीपक कथन आहे. पिल्लई यांनी आपल्या अत्यंत प्रभावी अशा कल्पनाशक्तीचा आणि उत्तुंग शब्दप्रतिभेचा वापर करून एक अस्सल थरारक पुस्तक लिहिले आहे. हे पुस्तक एकदा वाचायला सुरुवात केल्यावर संपल्याशिवाय थांबणे अशक्य आहे.- इंडियन एक्सप्रेस आपल्या प्रतिभासंपन्न आणि रसाळ शैलीने पिल्लई आपल्या वाचकांना मंत्रमुग्ध करतात...- द हिंदू रिबेल सुलतान्स, या पुस्तकामध्ये मनु पिल्लई यांनी तेराव्या शतकाच्या अंतापासून अठराव्या शतकाच्या आरंभापर्यंतची दख्खनची कथा सांगितली आहे. यात रंजक कथा आणि लक्षवेधी पात्रं यांची रेलचेल आहे. हे पुस्तक आपल्याला अल्लाऊद्दीन खिल्जीच्या युगापासून शिवाजी महाराजांच्या उदयापर्यंतचा प्रवास घडवते. त्या काळी दख्खन ही चमत्कारांना प्रेरणा देणारी भूमी होती. इथल्या खजिन्यांची, राजेलोकांची ख्याती दूरवर पसरली होती. ही भूमी समुद्रापल्याडच्या प्रतिभावंतांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरत होती. दख्खन हे आवेशपूर्ण धाडसांचे क्षितिज होते. इथे येणाऱ्या प्रवाश्यांना लष्करात भरती करण्यासाठी उपलब्ध असणारी युरोपिअन नेमबाजांची पथके; हिऱ्यामोत्यांनी सजलेल्या बाजारपेठा पाहायला मिळत. इथल्या दरबारांमध्ये पर्शिअन, मराठे, पोर्तुगीज आणि जॉर्जिअन यांची भरभराट होत होती. दख्खनमध्ये शेकडो भवितव्ये रचली गेली, जी मुघल साम्राज्यांच्या असंख्य पिढ्यांच्या भीतीदायक असूयेस कारणीभूत ठरली. या पुस्तकात आपल्याला विजयनगर साम्राज्याचा नाट्यमय उदय आणि पाडावही पाहायला मिळतो; तसेच त्यांची सत्ता उलथून टाकणाऱ्या बहामनी राजांची आणि बंडखोर सुलतानांची षड्यंत्रेही पाहायला मिळतात. भारताच्या इतिहासातील मंत्रमुग्ध करणाऱ्या या काळाच्या प्रवासात आपल्यासमोर चांदबिबीसारख्या पराक्रमी राणीच्या हत्येसारखे थरारक प्रसंग, हिंदू देवतांची उपासना करणारा इब्राहिम दुसरा, मलिक अंबरसारखा इथिओपिअन सरदार आणि विजयनगरच्या हिरेजडित सिंहासनावर विराजमान झालेला कृष्णदेवराय अशी उल्लेखनीय ऐतिहासिक पात्रेही येतात. मध्ययुगीन भूतकाळातील विस्मरणात गेलेल्या प्रकरणावर प्रकाश टाकताना रिबेल सुलतान्स आपल्याला दख्खनमधील एका वेगळ्या युगाचे आणि एका वेगळ्या काळाचे स्मरण करून देते–एक असे युग ज्याने एका साम्राज्याचा अंत केला आणि भारताचे भविष्य नव्याने लिहिले.
-
Styling At The Top
ही प्रेरणादायी कथा आहे, बॉलिवूडच्या एका सुप्रसिद्ध हेअर-स्टाइलिस्टची. दारिद्य्र आणि अपमान यांच्या संगतीत लहानाचा मोठा झालेला शिवराम भंडारी पुढे चालून बॉलिवूडचा लोकप्रिय हेअर-स्टाइलिस्ट होईल, शिवाज् या नावाने मुंबईत स्वतःच्या सलॉन्सची शृंखला निर्माण करेल, असं कोणाला कधीच वाटलं नव्हतं. या पुस्तकात शिवाचा अद्भुत जीवनप्रवास मांडण्यात आला आहे. यामुळे त्याने लहानपणापासून भोगलेल्या यातना आणि घेतलेले कष्ट आपल्या समोर येतात. आज शिवाज् हा ब्रँड असला, तरी त्यामागची कठोर तपश्चर्या या पुस्तकात आपल्या समोर येते.
-
T.V.Sardeshmukh - Atmanishth Lekhakachi Bakhar (त्
l शिष्यात इच्छेत पराजयम l प्रिया निघोजकर या माझ्या शिष्येने त्र्यं.वि.सरदेशमुख यांच्या साहित्यसंशोधनाला दिलेले हे ग्रंथरूप मराठी साहित्याचे अभ्यासक संशोधक आणि वाचक या सर्वांसाठी मौलिक ठरणार आहे . विद्यार्थी , विषय आणि मार्गदर्शक ह्या त्रिवेणी संगमातून उत्तम लेखन होऊ शकते , याचे हे ग्रंथरूप आदर्श उदाहरण आहे . मराठी साहित्यातील महत्त्वाचे कादंबरीकार आणि साक्षेपी समीक्षक असलेल्या सरदेशमुखांच्या साहित्याची एक नवी ओळख ह्या ग्रंथातून वाचकांना होईल .
-
Vavtal Peral Tar Vadalach Ugvel
प्राचीन काळात व्यापारी उद्देशाने सौदागरांचे तांडे देशीविदेशीचा भूगोल पालथा घालत. या तांड्यांबरोबर नट, नर्तक, वैदू, हेर, चोर असे घटकही सोबत जात. क्वचित परक्या भूगोलावर गुन्हेगारी धुडगूस घालत. आजचे भूराजकारण असेच काहीसे आहे. पृथ्वीवरील खनिजसंपत्ती आणि ती वाहून नेण्याचे व्यापारी मार्ग हे फक्त युरोप-अमेरिकेच्या ताब्यात हवेत, ही आजची अटीतटी मोठी आहे. त्यासाठी पाश्चात्त्य सांस्कृतिक संस्था, गुप्तचर यंत्रणा आणि शस्त्रलॉबी हातात हात घालून काम करतात. व्यापारी मार्गांवरील देशांना मांडलिक बनवण्याच्या नादात युद्धाचे वणवे पेटवून देतात. मध्यपूर्वेतील अशा युद्धकहाराची ही गोष्ट!
-
Thakare Viruddha Thakare (ठाकरे विरुद्ध ठाकरे)
‘ठाकरे’ म्हणजे अर्धशतकाहून अधिक काळ महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी असलेले घराणे. प्रबोधनकार ठाकरे हे संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील प्रमुख नेत्यांपैकी एक. ‘शिवसेना’ स्थापन करणारे बाळासाहेब ठाकरे म्हणजे केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर देशभरात दरारा असलेले नाव. पण बाळासाहेबांच्या डोळ्यांदेखत ‘शिवसेने’त फूट पडली अन् ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना’ जन्माला आली. उद्धव ठाकरे अन् राज ठाकरे हे दोघे एकमेकांविरोधात उभे ठाकले ! दोन सेना. दोन सेनापती. काय असणार या दोघांची रणनीती अन् नियती ? महाराष्ट्राच्या राजकारणातील एका विलक्षण सत्तासंघर्षाचा विविध अंगांनी घेतलेला वेध
-
Palvi (पालवी)
पुण्यातल्या मध्यमवर्गीय कुटुंबातला तो. बघता बघता व्यसनाच्या विळख्यात ओढला गेला. आईची माया, बहिणीचा जिव्हाळा, काहीच त्याला रोखू शकलं नाही. ना धड शिक्षण, ना नोकरी, ना व्यवसाय ! रस्ता हेच घर. पोलीस-कोठडीची हवाही खाल्ली. तो व्यसनातून सुटू पाहत होता. सुटल्यासारखा वाटला, तरी पुन्हा खेचला जात होता. br>अखेर त्याने व्यसनावर मात केली. एवढंच नाही तर स्वत: एक व्यसनमुक्ती केंद्र उभं केलं. एका फिनिक्सचं विलक्षण प्रांजळ आत्मकथन.
-
Raavan Aryavartacha Shatru (रावण आर्यावर्ताचा शत्र
WITHOUT THE DARKNESS, LIGHT HAS NO PURPOSE. WITHOUT THE VILLAIN, WHAT WOULD THE GODS DO? INDIA, 3400 BCE. A land in tumult, poverty and chaos. Most people suffer quietly. A few rebel. Some fight for a better world. Some for themselves. Some don’t give a damn. Raavan. Fathered by one of the most illustrious sages of the time. Blessed by the Gods with talents beyond all. Cursed by fate to be tested to the extremes. A formidable teenage pirate, he is filled with equal parts courage, cruelty and fearsome resolve. A resolve to be a giant among men, to conquer, plunder, and seize the greatness that he thinks is his right. A man of contrasts, of brutal violence and scholarly knowledge. A man who will love without reward and kill without remorse. This exhilarating third book of the Ram Chandra series sheds light on Raavan, the king of Lanka. And the light shines on darkness of the darkest kind. Is he the greatest villain in history or just a man in a dark place, all the time? Read the epic tale of one of the most complex, violent, passionate and accomplished men of all time.