-
Pramanikahi Sundarahi (प्रामाणिकही सुंदरही)
अनुवाद म्हणजे भरतकाम केलेल्या कापडाची उलटी बाजू...’ ‘अनुवाद म्हणजे दुधाची तहान ताकावर भागवणे...’ ‘अनुवाद म्हणजे मूळ लेखनकृती वाचता येत नाही, याबद्दल मिळालेला दिलासा...’ ‘अनुवाद हा तरुण स्त्रीसारखा असतो; सुंदर असेल, तर प्रामाणिक नसतो आणि प्रामाणिक असेल, तर सुंदर नसतो...’या आणि अशा अनेक वचनांनी अनेक शतके अनुवादित साहित्याची बदनामी केली आहे.पण, कुशल अनुवादक जेव्हा अनुवाद-प्रक्रियेची सर्व पथ्ये पाळून जबाबदारीने एखादी साहित्यकृती अनुवादतो, तेव्हा त्याचा अनुवाद मूळ लेखनाशी प्रामाणिकही राहतो आणि लक्ष्य भाषेत सौंदर्याची अनुभूतीही देतो. हे शिवधनुष्य कसे पेलायचे, हे सोदाहरण स्पष्ट करणारे पुस्तक
-
Kalam 370 Aagraha Ani Duragraha (कलम ३७० आग्रह आणि
३७० रद्द करण्याच्या ऐतिहासिक व अकल्पित निर्णयामुळे उठलेले वादळ अजूनही घोंघावत आहे आणि त्यात अनेक बाबी दृष्टीआड होत आहेत वा केल्या जात आहेत. १९४७-४८च्या काश्मीरमधील युद्धजन्य परिस्थितीपेक्षाही शेख अब्दुल्लांच्या दुराग्रहामुळे कलम ३७० राज्यघटनेत समाविष्ट करावे लागले. महाराजा हरिसिंग यांनी हिंदुस्थानात संमीलित होण्यास संमती दिल्यानंतरही काश्मीरच्या जनतेचे मत अजमावावे, हा काँग्रेसचा आग्रह होता; पण त्याची परिणती ३७०व्या कलमात होईल आणि शेख अब्दुल्लांच्या अवास्तव मागण्या भारताच्या राज्यघटनेचा विपर्यास करतील, ही कल्पनाही कोणी केली नव्हती. नेहरूंना माणसांची पारख नव्हती. काश्मीरसाठी वेगळी राज्यघटना, वेगळे नागरिकत्व, वेगळा ध्वज आणि सदर-इ-रियासत व पंतप्रधान ही पदे, अशा बहुतेक सर्व मागण्या दिल्ली करारान्वये मान्य झाल्या. ‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?’ हा प्रश्न लोकमान्य टिळकांनी ब्रिटिश सरकारला विचारला होता. तोच प्रश्न तत्कालीन सरकारला विचारणे आवश्यक होते. गेली ७० वर्षे अनेक प्रयत्न करूनही काश्मीर प्रश्नाची सोडवणूक होऊ शकलेली नाही; कारण शेवटी सर्व चर्चा कलम ३७० वर येऊन थांबत असे. हे कलम रद्द केल्याने निर्माण झालेले प्रश्न वैधानिक व भावनिक आहेत. त्यांची सखोल चर्चा या पुस्तकात केली आहे.
-
Manuche Aranya Amazonchya Khoryatil Jangalbhatkant
‘मनू’ हे नाव आहे पेरू देशाच्या दक्षिणेला उगम पावणाऱ्या अन् नंतर महाकाय अॅमेझॉनला मिळणाऱ्या या एका नदीचे. अॅमेझॉनचे खोरे म्हणजे पृथ्वीतलावरील जैवविविधतेने स समृद्ध अशी जागा. पक्ष्यांची रंगीबेरंगी पिसारी दुनिया असो, हजारो प्रकारच्या वेगवेगळ्या वनस्पतींचे बहरलेले विश्व असो, जलचर अन् उभयचर प्राण्यांपासून कीटक अन् सस्तन प्राण्यांपर्यंतच्या हजारो प्रजाती असोत, या साऱ्या विविधांगी, विविधरंगी जीवसृष्टीला अंतरंगात सामावून घेणारे मनूचे अरण्य. पेरू देशाच्या आग्नेय भागात अँडीज पर्वताच्या उतारावर वसलेल्या या सदाहरित घनदाट जंगलात एका झपाटलेल्या निसर्गप्रेमीने मनसोक्त भटवंती केली. त्या भटवंतीतून नजरेपुढे साकार झालेले, शब्दांतून अन् छायाचित्रांमधून पानांवर उमटलेले मनुचे अरण्य: मोठा आकार, विपुल रंगीत/ कृष्णधवल छायाचित्रे.