-
Celebriteenchya Bhetigaathi (सेलिब्रिटींच्या भेटीग
चित्रपटसृष्टीशी निगडित विविध स्तरांवर काम करणार्या काही कलाकार, संगीतकार, दिग्दर्शक, लेखक, पार्श्वगायक अशा वीसहून अधिक सेलिब्रिटींसोबत झालेल्या भेटीगाठींदरम्यान आलेले अनुभव, काही रंजक किस्से, घडलेल्या सत्यघटना, आठवणी या पुस्तकाद्वारे लेखिकेने सांगितल्या आहेत. यामधूनच आपल्याला त्या सेलिब्रिटींच्या वी, त्यांच्यातील विविध पैलूंची नव्याने ओळख होते.
-
Ye Hai Mumbai Meri Jaan (ये है मुंबई मेरी जान)
सरदार कुलवंतसिंग कोहली.मुंबईच्या सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक अन् राजकीय क्षेत्रांतमोलाचं योगदान दिलेलं हे व्यक्तिमत्त्व.योगायोगानं मुंबईच्या मोहक मयसभेशी - चित्रपटसृष्टीशीकुलवंतजींचा घनिष्ठ संबंध आला. कपूर कुटुंब, दिलीपकुमार - राजेंद्रकुमार - धर्मेंद्रपासून राजकुमार - संजीवकुमार - जितेंद्रपर्यंतचे नायक,मीनाकुमारी - मधुबालापासून माला सिन्हापर्यंतच्या नायिका,व्ही. शांताराम - असीफ - मेहबूबसारखे दिग्दर्शक,नौशादपासून रवीपर्यंतचे संगीतकार, प्राणसारखे दिलेर खलनायक -किती किती नावं सांगायची?अशा दिग्गज कलाकारांबरोबर कुलवंतजींच्या तारा जुळल्या.सामान्य माणसासाठी आकाशीची नक्षत्रं असणारेहे चित्रपटसृष्टीतील तारे-तारका कुलवंतजींनाहाडामांसाची माणसं म्हणून न्याहाळता आली. अटलबिहारी वाजपेयी - बाळासाहेब ठाकरे -सुशीलकुमार शिंदे किंवा प्रमोद महाजन -झैलसिंग - बुटासिंग यांच्यासारखेराजकारणीदेखील या चित्राची चौकट बनून भेटतात. ही सारी माणसं अन्त्यांच्याबरोबर जगलेला अवघा काळकुलवंतसिंग यांनी आपल्यापुढे जिवंत केला आहे|