-
Survanta (सुर्वंता)
सुर्वंता...मल्हारी या ऊसतोडणी कामगाराची देखणी बायको...नवऱ्याबरोबर ऊसतोडणीला गेल्यावर तिला प्रकर्षाने जाणीव होते मुकादमाकडून होणाऱ्या शोषणाची...मुकादम तिच्यावर बलात्कार करतो आणि गर्भपात होतो तिचा...तिचं मन तडफडायला लागतं त्या चिरडलेल्या जीवनातून बाहेर पडण्यासाठी...तेजरामच्या रूपाने तिला बाहेर पडायचा रस्ता दिसतो...पण स्वत:चं शील विकून...काय होतं पुढे? सुर्वंताचं सुस्थिर जीवन जगण्याचं स्वप्न साकार होतं का?
-
Davhala (डव्हाळं)
"‘डव्हाळं’ हा श्री. बा. ग. केसकर यांच्या सोळा कथांचा संग्रह. या संग्रहात श्री. केसकर यांनी ग्रामीण जीवन आणि त्या जीवनातील समस्या, गुंतागुंत व मूल्यसंघर्ष यांचं विश्लेषण प्रत्ययकारी केलं आहे. आजच्या ग्रामीण जीवनात सुनी जीवनमूल्ये, अंधश्रद्धा आणि कालबाह्य परंपरा काही प्रमाणात कमी होत आहेत, परंतु त्याऐवजी नवी जीवनदृष्टी आणि नव्या यंत्रयुगाच्या प्रखर वास्तवाचं भान मात्र आवश्यक त्या प्रमाणात येत नाही. त्यामुळे एकीकडे दारिद्र्यात राहूनही कष्ट करणाऱ्या ग्रामीण स्त्रीविषयी सहानुभूती वाटते, तर दुसरीकडे अन्याय, शोषण करणाऱ्या समाजातल्या एका समूहाविषयी विलक्षण संताप निर्माण होतो. नवी पिढी मात्र संवेदनशून्यपणे, वास्तवाकडे मुर्दाडपणे (की अगतिकतेने?) पाहत जगत आहे. ही अनकलनीय शोकांतिका वाचकाला अंतर्मुख करते. "
-
Ashich Kahi Pana (अशीच काही पानं)
सरस्वतीबाई राजवाडे म्हणजे अद्भुत कादंबरीतल्या नायिका किंवा आकाशातून या भूतलावर अवतरलेल्या जणू शापग्रस्त अप्सराच! आपल्या असामान्य रूपामुळे काही काळासाठी त्या रंगभूमीवर झळकल्या. वाद्यवृंदाबरोबर गायिका म्हणून बालवयातच त्यांनी भारतभर प्रवास केला. पंधराव्या वर्षी त्या अंबिकापती रायशास्त्री राजवाडे या उच्चपदस्थ अधिकाऱ्याशी विवाहबद्ध झाल्या. त्यांनी श्रीमंत संसाराच्या सुखाबरोबरच एकान्तवासाचं दु:खही अनुभवलं. या कालखंडात त्यांनी अनेक भाषा आत्मसात केल्या. त्यांनी तमिळमध्ये पहिली कथा लिहिली. त्यानंतर त्यांनी कन्नडमध्ये कथा लिहायला सुरुवात केली. त्यांनी स्वत: स्त्रियांसाठी `सुप्रभात` नावाचं मासिकही चालवलं. सरस्वतीबार्इंचं जीवनचरित्र म्हणजे जीवनभर प्रेमाचा शोध घेत, एकाकी जगत एकान्ताकडे वळलेल्या एका जिवाची कथा!
-
Shisticha Bali (शिस्तीचा बळी)
‘इन्डॉमिटेबल’ युद्धनौकेवरील खलाशी बिली बडला त्याचे सहकारी अडचणीत आणत असतात. जॉन क्लॅगार्ट हा निशाण खात्याचा प्रमुख या सगळ्या प्रकारामागे आहे, असं या युद्ध नौकेवरचा अनुभवी पण वयस्कर खलाशी लास्कर, बिलीला वारंवार सांगतो; एके दिवशी अगदी सहजपणे जॉनचं खरं रूप बिलीच्या समोर येतं. काय होतं तेव्हा?
-
Idea Man (आयडिया मॅन)
पॉल अॅलन...मायक्रोसॉफ्ट कंपनीचे सहसंस्थापक...विद्यार्थी दशेपासूनच संगणकाची जबरदस्त ओढ...त्या ध्यासातूनच बिल गेट्सबरोबर मायक्रोसॉफ्टची केलेली स्थापना...मायक्रोसॉफ्टचे चढ-उतार...बिलबरोबरचे व्यावसायिक आणि वैयक्तिक पातळीवरचे संबंध...मायक्रोसॉफ्टमधून बाहेर पडल्यावर बास्केटबॉल, अंतरिक्ष, संगीत, मेंदू संशोधन इ. क्षेत्रांतील महत्त्वपूर्ण संचार...पॉलनी कॅन्सरशी दिलेला लढा...अशा महत्त्वपूर्ण घटनांची रेलचेल असलेलं पॉल अॅलन यांचं वाचनीय आणि प्रेरणादायक आत्मकथन आहे ‘आयडिया मॅन.’
-
Nagkeshar (नागकेशर)
प्रसिद्ध लेखक विश्वास पाटील यांची ‘नागकेशर’ ही डोंगरे-देशमुख या एकाच कुटुंबातील सहकारमहर्षी बापूराव आणि बबननाना या दोन भावांमधील सत्तासंघर्षाची कहाणी आहे. हा संघर्ष त्यांच्या पुढच्या पिढ्यांमध्येही चालू राहतो. बापूराव गजरा साखर कारखान्याचे चेअरमन होतात, तर बबननाना कारखान्यात शिरकाव करण्याच्या हेतूने बापूरावांना कोणत्याही अडचणीच्या प्रसंगी हरप्रकारे मदत करण्याची भूमिका पत्करतात. बापूंचा मुलगा राजकुमार अर्थात प्रिन्स आणि नानांचा मुलगा बाजीराव. प्रिन्सशी विवाह करण्याची मनीषा बाळगणाऱ्या नेत्रादेवीला विचित्र दैवगतीमुळे बाजीरावच्या गळ्यात वरमाला घालावी लागते; तर नवऱ्याच्या छळाला व मारझोडीला कंटाळून आश्रयाला आलेल्या जिद्दी, करारी व देखण्या शलाकाचा प्रिन्स पत्नी म्हणून स्वीकार करतो. कारखाना, डिस्टीलरी आणि गजरा एज्युकेशनल ट्रस्टची सूत्रे प्रिन्स आणि शलाकाकडेच जातात; पण कारस्थानी सल्लागार बबननाना, रगेल पैलवान बाजीराव आणि स्वार्थांध नेत्रा व तिची सासू चंचलानानी यांच्या कट-कारस्थानांमुळे प्रिन्स आणि शलाकाला सत्तेवरून पायउतार होणं भाग पडतं. प्रिन्स आणि शलाका ती सत्ता परत मिळवतात का, प्रिन्स आणि शलाकाचा राजकारणात प्रवेश, तिथेही शलाकाचा आधीचा नवरा रमेश दिवसे आणि बाजीराव - नेत्राचा चढेल मुलगा सुपरप्रिन्स यांनी शलाका आणि प्रिन्सच्या विरोधात उभे ठाकणे, रमेश - शलाकाचा मुलगा अभिषेकने निवडणुकीत उतरणे, अशा अनेक नाट्यपूर्ण घडामोडींमुळे वाचकाची उत्सुकता शेवटपर्यंत ताणणारी ही कादंबरी अवश्य वाचावी अशी आहे.
-
Pachuche Bet (पाचूचे बेट)
डॉली जहाजावरील दोन खलाशी नूकूहेवा बंदरात जहाज आल्यावर जहाजावरून फरार होतात. आणि लपतछपत थेट नरभक्षक टैपी लोकांच्या प्रदेशात दाखल होतात. माणसाचं मांस खाणाऱ्या या जमातीच्या तावडीत सापडल्यानंतर त्यांचं नक्की काय होतं? या उत्कंठावर्धक अनुभवांची थरारक कहाणी..
-
Gharpartichya Vatevarti (घरपरतीच्या वाटेवरती)
घरपरतीच्या वाटेवरती... ही सरू ब्रायर्ली या तीसवर्षीय ऑस्ट्रेलियन मुलाने लिहिलेली आत्मकथा आहे. सरू मूळचा भारतातल्या मध्य प्रदेशातील खांडव्याचा. लहानपणी आपल्या मोठ्या भावाबरोबर ट्रेनमधून जात असताना तो हरवतो व कोलकात्याला अनाथाश्रमात पोहोचतो. तिथे असताना १९८७मध्ये एक ऑस्ट्रेलियन दाम्पत्य त्याला दत्तक घेते. आपल्या ऑस्ट्रेलियातील नव्या कुटुंबाबरोबर आनंदात राहत असूनसुद्धा भारतातल्या कुटुंबाबद्दलच्या त्याच्या आठवणी त्याला नेहमीच अस्वस्थ करत राहतात. पंचवीस वर्षांनी सरू आपल्या लहानपणीच्या पुसट आठवणींच्या जोरावर, ‘गुगल अर्थ` व ‘फेसबुक`च्या मदतीने भारतातील आपले गाव, घर शोधून काढतो. भारतात येतो व आई, भावंडांशी आपले संबंध पुनप्र्रस्थापित करतो. ही कथा अद्भुत पण खरीखुरी आहे, त्याच्या गरिबीत काढलेल्या दिवसांची, हरवल्यानंतरची आणि कोलकात्याच्या अनाथाश्रमातील खडतर अनुभवांची, ऑस्ट्रेलियातल्या जीवनाची, आपले भारतातले मूळ गाव व कुटुंब शोधण्याच्या ध्यासाची, धडपडीची आणि अविरत प्रयत्नांची आणि हे सगळं करत असताना मनात उठलेल्या विचारांच्या कल्लोळाची! ही धडपड होती, आपण कोण आहोत, कुठून आलो, आपल्या भावाचं काय झालं ते शोधून काढण्याची व भारतातील कुटुंबीयांना तो अजून जिवंत आहे हे सांगण्यासाठी! त्याचा हा संघर्ष म्हणजे कठीण परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी मिळेल ती संधी साधत, हार न मानता सतत प्रयत्न चालू कसे ठेवावेत, याचा वस्तुपाठच आहे.
-
Dhivarachi Aarta Saad (धीवराची आर्त साद)
धीवराची आर्त साद’ची कथा तीन कुटुंबांतील तीन मुलींभोवती फिरते. सुक्कोरिना, डॉना आणि मायोला. सुक्कोरिना गरीब, डॉना श्रीमंत आणि मायोला मध्यमवर्गीय कुटुंबातलीR. सुक्कोरिना आणि डॉनाला आई-वडिलांकडून प्रेम मिळालेलं नाही. मायोलाला ते मिळालंय, पण तिची मोठी बहीण झरेला हिच्या स्वैर वर्तनाला अप्रत्यक्षरीत्या कारणीभूत ठरलेले आई-वडील आणि झरेलाने केलेली आत्महत्या यामुळे समुपदेशक असलेली मायोला अस्वस्थ आहे. सुक्कोरिनाचा विवाहित पुरुषाकडून झालेला कौमार्यभंग आणि तिने केलेला गर्भपात, याचं तिच्या वैवाहिक जीवनावर पडलेलं सावट, त्यामुळे ढळेलेलं मानसिक संतुलन, प्रेमाच्या शोधात वणवण फिरणाऱ्या डॉनाचं अयशस्वी ठरलेले दोन विवाह, त्यामुळे तीव्र निराशेने (डिप्रेशन) ग्रासलेलं मन. सुक्कोरिना, डॉना आणि मायोलाचं नाट्यमयरीत्या एकत्र येणं...तिघींच्या जीवनाचा हा प्रवास अनुभवण्याजोगा आणि मन:स्पर्शी.
-
Chandralok (चंद्रलोक)
लक्षावधी वर्षांपूर्वी चंद्रजन्म कसा झाला? समुद्राला चंद्रामुळे भरती-ओहोटी का येते? चंद्राच्या लहरीप्रमाणे मानवी मनावर तरंग उमटतात का? सूर्यचंद्रांना लागणारी ग्रहणे, त्यांचा घास गिळायला टपून बसलेले राहू-केतू... यासारख्या गोष्टींचे खरे वैज्ञानिक स्पष्टीकरण काय? या व अशाच इतरही असंख्य प्रश्नांची वैज्ञानिक उत्तरे देतानाच गेल्या पन्नास-साठ वर्षांमध्ये रंगत गेलेल्या अवकाशस्पर्धेचा आढावा घेणारा हा देखणा ग्रंथ. रशिया-अमेरिकेतल्या स्पर्धेचे विविध टप्पे, अपोलो-11 मोहिमेसारख्या आजवर योजल्या गेलेल्या सर्व चांद्रमोहिमा आणि त्यांचे यशापयश...या आणि अशाच इतरही असंख्य घटनांचा सुबोध परामर्श घेणारा हा बहुरंगी ग्रंथ.
-
Adolf Hitler Ani Dusre Mahayuddha (अॅडॉल्फ हिटलर
जितांचा इतिहास जेते लिहितात, म्हणून इतिहासाचे विकृतिकरण होते. ॲडॉल्फ हिटलरवर अनेक गंभीर आरोप केले जातात. त्यांतील सर्वांत प्रमुख आरोपांपैकी एक म्हणजे त्यांनी आपल्या युद्धासक्त प्रवृत्तीमुळे दुसरे महायुद्ध घडवून आणले नि जगाचा विनाश केला. ॲडॉल्फ हिटलर आणि दुसरे महायुद्ध याबाबत सत्य आणि विपर्यास.
-
Vinasayas Weight Loss Aani Madhumeh Pratiband (विन
लठ्ठपणा, उच्चरक्तदाब, मधुमेह, हृदयविकाराचा झटका, तसेच मेंदूतील रक्तस्राव अशा अनेक असांसर्गिक रोगांचे भारत देश हा आगर बनला आहे. लठ्ठपणा हा स्वत: एक आजार आहेच पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे त्याच्यामुळे उपरोक्त इतर रोग होण्याची जोखीम वाढते. इन्सुलिन हे संप्रेरक आपल्याला लठ्ठ बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. कर्बोदके असलेले खाणे वारंवार खाण्यामुळे रक्तातील इन्सुलिनची पातळी वाढलेली राहते. या वाढलेल्या इन्सुलिनचे दुष्परिणाम म्हणजेच वर वर्णन केलेले रोग होत. सध्या लठ्ठपणा कमी करणे हा अनेकांचा धंदा बनला आहे. दुर्दैवाने हजारो रुपये खर्च करूनही लोकांच्या पदरी निराशाच येते. लठ्ठ लोक हताश होतात. या पुस्तकात सुचवलेला उपाय हा साधा-सोपा तर आहेच पण बिनखर्ची आहे. त्यासाठी डॉक्टरकडे जाण्याची गरज नाही वा महागडी उपकरणे किंवा विशिष्ट अशा आहाराचीही गरज नाही. सर्वात महत्वाचे म्हणजे कोणीही व्यक्ती संपूर्ण आयुष्यभर हा उपाय अंगिकारू शकेल. रक्तातील इन्सुलिनची पातळी कमी करणारा हा उपाय लठ्ठपणाबरोबरच मधुमेहाच्या प्रतिबंधासाठीही उपयुक्त ठरेल. सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने हा उपाय म्हणूनच बहुमूल्य असाच आहे. कै. डॉ. श्रीकांत जिचकारांनी त्यांच्या मृत्यूपर्यंत शास्त्रोक्त विवेचनाद्वारे व समाजा-प्रतीच्या तळमळीने हा उपाय व्याख्यानांद्वारे महाराष्ट्र व देशात पोचवला. डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी डॉ. जिचकारांचा हा ज्ञानदीप पुस्तकरूपाने सर्व भारतीयांसमोर आणला आहे. आता ही चळवळ ‘स्थूलत्व व मधुमेहमुक्त भारत’ या अभियानाच्या रूपाने अग्रेसर होत आहे.
-
Sanwad (संवाद)
मनुष्य हा समाजप्रिय प्राणी आहे, म्हणूनच इतिहासात डोकावून बघितलं, तर आदिम काळापासून मनुष्य समूहानं किंवा टोळ्यांनी राहत असलेला बघायला मिळतो. अगदी सुरुवातीला माणसानं एकमेकांशी संवाद कसा साधला असेल? या प्रश्नाच्या कुतूहलातूनच अच्युत गोडबोले यांचं ‘संवाद’ हे पुस्तक लिहिलं गेलं आहे. ‘संवाद’ या पुस्तकात चित्रलिपीद्वारा, खाणाखुणा करून, वेगवेगळे आवाज करून आदिमानवाच्या परस्परांतल्या संवादाला कशी सुरुवात झाली याचा इतिहास तर आहेच, पण त्याचबरोबर शेतीमुळे स्थैर्य आल्यानंतर माणसाच्या जगण्यात जे बदल झाले, त्यातच त्यानं लावलेला छपाईयंत्राचा शोध असेल किंवा टपालव्यवस्थेचा शोध असेल, या सगळ्या शोधांनी माणसं एकमेकांशी कसा संवाद साधायला लागली, त्यातून काय गमतीजमती घडत गेल्या, या शोधकर्त्यांना कुठकुठल्या अडचणींना तोंड देत आपल्या ध्येयापर्यंत पोहोचावं लागलं, त्या त्या काळात तंत्रज्ञान कसं बदलत गेलं, तंत्रज्ञानानं माणसाच्या संवादात काय बदल घडवून आणले, या प्रवासात किती तंत्रज्ञांचा मृत्यू अत्यंत हलाखीत झाला आणि किती जणांचं आयुष्य प्रचंड वैभवात गेलं, हे सगळं या पुस्तकात वाचकांची उत्कंठा वाढवणार आहे. त्याचबरोबर प्रत्येक शोधाचा शोधकर्ता, त्या शोधामागचं तंत्रज्ञानदेखील ‘संवाद’मध्ये अतिशय सोप्या भाषेत उलगडून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आदिमानवापासून व्हॉट्सअपच्या युगापर्यंत माणसानं एकमेकांशी संवाद कसा साधला याविषयीची एक रंजक आणि चित्तथरारक कहाणी म्हणजे ‘संवाद’! यामध्ये शिंग, तुतारी, आगीपासून ते भाषेचा आणि लिपीचा उगम, कागद आणि छपाई यांचे शोध, टपालव्यवस्था, वर्तमानपत्र, मोबाइल
-
Hit Refresh (हिट रिफ्रेश)
SATYA NADELLA is a husband, a father and the chief executive officer of Microsoft - only the third in the company's forty-year history. On his twenty-first birthday, Nadella emigrated from Hyderabad, India, to the United States to pursue a master's degree in computer science. He joined Microsoft in 1992. As much a humanist as a technologist, Nadella defines his mission and that of the company he leads as empowering every person and every organisation on the planet to achieve more.