-
Walking On The Edge (वॉकिंग ऑन द एज)
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांवर प्रेम करणारा एक भटक्या. त्याने ध्यास घेतला, सह्याद्री घाटमाथ्याच्या धारेवरून उभा महाराष्ट्र चालत जायचं, उत्तरेहून दक्षिणेकडे. कडेकपारीतले तब्बल हजार किलोमीटर ! हे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी तो ७५ दिवस एकट्याने चालत राहिला. रोज २०-२५ किलोमीटरची तंगडतोड केल्यावर जे गाव लागेल तिथे मुक्काम करायचा, जे घर आस्थेने विचारपूस करेल तिथे राहायचं आणि जे पानात वाढलं जाईल ते खायचं. रात्री पाठ टेकायची, की दुसऱ्या दिवशी पुन्हा पुढचा प्रवास सुरू. अशा पायपिटीची ही गोष्ट. या भ्रमंतीत जसं सह्याद्रीचं रौद्र रूप सामोरं आलं, तसंच दऱ्याखोऱ्यांमध्ये- पठारांवर राहणारी माणसं आणि त्यांच्यातली माणुसकी भेटली. त्याच वेळी रोजच्या अनिश्चिततेमुळे मनात खोलवर दडून बसलेल्या भीतीशीही सामना करावा लागला. पठाराचा काठ आणि आव्हानं अशा दोन्ही अर्थाने 'एज्'वरून केलेल्या भटकंतीतल्या अनुभवांची ही शिदोरी.. बॉकिंग ऑन द एज्.
-
Aivaj Ek Smrutibandh (ऐवज एक स्मृतिबंध)
अमोल पालेकर यांच्या कला कारकिर्दीचा ‘ऐवज’ वाचकांच्या हाती! हे पुस्तक केवळ एका कलाकाराचा प्रवास नाही; हे एका माणसाचं आत्मचिंतन आहे. यातून आपण जीवनातील साधेपणाचं सौंदर्य आणि स्वाभिमानाची ताकद अनुभवतो." "कलावंत म्हणून ते केवळ भूमिका साकारत नव्हते, तर समाजाला विचार करायला लावणारी कला निर्माण करत होते." सिद्ध चित्रकार, अभिनेता-दिग्दर्शक अमोल पालेकर यांच्या ऐंशीव्या वाढदिवसाचे औचित्य साधून ऐवज’ या आत्मकथनपर मराठी पुस्तकाचे प्रकाशन! यानिमित्ताने स्वत:चा वेगळा चेहरा निर्माण केलेल्या एका मनस्वी मराठी कलाकाराची नवी ओळख वाचकांना होणार असून पालेकर यांच्या कलात्मक प्रवासाला आकार देणाऱ्या अनुभवांचा तपशील वाचकांना समृद्ध करणारा ठरेल.पालेकर यांच्या आत्मकथनातून भारतीय चित्रपटसृष्टीच्या सुवर्णयुगातील काही मौल्यवान क्षणचित्रे गवसतात. व्यक्तिगत आठवणी, दुर्मीळ छायाचित्रे आणि सत्यदेव दुबे, बादल सरकार, हृषिकेश मुखर्जी, बासू चटर्जी, जयदेव वर्मा अशा नाट्य-चित्रपट जगतातील दिग्गजांना पालेकर यांनी अर्पण केलेले श्रद्धांजलीपर मनोगत समाविष्ट करण्यात आले आहे. पुस्तकामध्ये दिलेल्या ‘क्यूआर कोडमुळे पालेकर यांच्या कलाकृती बघण्याची संधी वाचकांना लाभणार आहे...!! माझा इथवरचा प्रवास न्याहाळताना, कला क्षेत्रातील परिवर्तनाचा आवाका, व्याप्ती आणि खोली लक्षात येईल. पडद्यावर दिसणाऱ्या भोळसट नायकापलीकडच्या माणसाची जडणघडण समजून घेता येईल