-
Jamat E Purogami (जमात ए पुरोगामी)
पत्रकार वा साहित्यिक यांना पुरोगामी प्रतिगामी असायची कुठलीही गरज असते. समाजाचे प्रबोधन हे अशा वर्गाचे खरे कर्तव्य असते. जेव्हा असा वर्ग विचारधारेचा गुलाम होतो आणि खोटीनाटी प्रमाणपत्र पुरवून जनतेची दिशाभूल करण्यास हातभार लावण्यात पुढाकार घेतो,तेव्हा त्याचेही दिवाळे वाजू लागते. आज वर्तमानपत्रे,वाहिन्या किंवा साहित्य क्षेत्राची त्यामुळेच धूळधाण उडालेली आहे.नावाजलेले संपादक वा माध्यमे दिवाळखोरीत गेली आहेत. हमीद दलवाईंच्या पुरोगामी विचार वा भूमिकांना हेच लोक पायदळी तुडवत असतील , तर त्यांचे पुरोगामी मुखवटे फाडण्याची गरज आहे आणि त्या मुखवट्याआड लपलेल्या पुरोगामी जमातीचा खरा चेहरा सामान्य माणसाला दाखवणे अगत्याने आहे. एकवेळ जिहादी कसाब किंवा तालिबानी ओसामा परवडला. कारण तो समोरून येणारा उघड शत्रू असतो. पण जमते पुरोगामी हा गाफील ठेऊन मिञरूपाने येणार मायावी राक्षस असतो. त्याच्याविषयी जनतेला सातत्याने सावध करणे व त्याच्या मायावी रुपमागचा हिडीस चेहरा लोकांना उग्गोचर करून दाखवणे, हे खरेखुरे पुरोगामी व प्रगतिशील कार्य आहे.
-
Ghanagarda (घनगर्द)
हृषिकेशच्या सगळ्या कथांमधून आरपार जाणारं एक सूत्र आहे. ते म्हणजे त्यात दिसणारी कल्पनाशिलता. त्याच्या प्रत्येक कथेच्या केंद्रस्थानी मुठीतल्या काजव्यासारखी लुकलुकणारी एखादी कल्पना असते. हृषिकेश त्या कल्पनेच्या सगळ्या शक्यतांचा शोध घेत जातो. तिचे सगळे कोपरे धुंडाळतो. महत्वाचं म्हणजे, तो या प्रक्रियेचा आनंद घेतो. म्हणूनच त्याच्या कथांमध्ये एक चैतन्य सळसळताना जाणवतं. 'घनगर्द' या कथांसंग्रहामधून हृषिकेशच्या कथेने एक उंबरठा ओलांडला आहे. ती आता अधिक व्यामिश्र आणि पैलूदार होते आहे भय आणि अदभूताचा मार्ग तिने सोडलेला नाही. मात्र त्या मार्गाला आता अनेक नव्या वाटा फुटलेल्या आहेत. त्या नेमक्या कुठे जाणार हे कोणीही सांगू शकणार नाही. पण हा प्रवास दीर्घ आणि रोमहर्षक असेल. याची खात्री 'घनगर्द' वाचल्यावर पटते, हे महत्वाचं
-
Yuddhakhor America (युद्धखोर अमेरिका)
देशाची साखरेची गरज भागवण्यासाठी उद्ध्वस्त केलेली हवाई बेटं... एका खासगी कंपनीमार्पâत गिळंकृत केलेला हाँडुरस देश... मुजाहिदींना पुरवलेली शस्त्रास्त्रं आणि बेचिराख केलेला अफगाणिस्तान... व्हीएतनाममध्ये केलेला नरसंहार... विनाकारण घुसून सद्दामचा काढलेला काटा आणि इराकचं केलेलं ध्वस्तीकरण... जगावर आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी अमेरिकेने अनेक देशांमध्ये ढवळाढवळ केल्याची अशी कितीतरी उदाहरणं देता येतील — कधी त्यांनी तिथली सरकारं उलथवून लावली, कधी बंडखोरांना शस्त्रास्त्रसाठा पुरवला, तर कधी थेट आक्रमणंच केली... सुप्रसिद्ध लेखक अतुल कहाते यांनी अशा 'अमेरिकापीडित' १६ देशांच्या 'केस स्टडीज' अभ्यासपूर्णरीत्या या पुस्तकात मांडल्या आहेत. त्याआधारे त्यांनी अमेरिकेच्या वर्चस्ववादाचं विवेचन करून परखड चिकित्सा केली आहे. 'लोकशाहीवादी, खुल्या विचारांचा, संपन्न व समृद्ध देश', 'नशीब कमावण्याची स्वप्नभूमी' अशी ओळख असलेल्या अमेरिकेची आक्रमक बाजू समोर आणणारा पुस्तकरूपी दस्तऐवज... 'युद्धखोर अमेरिका'!
-
Bhartatil Davya Chalvalincha Magova (भारतातील डाव
लोकशाही सुदृढ व्हायची तर जनसामान्यांना देशात प्रदीर्घ काळ टिकून असलेल्या लोकाभिमुख विचारप्रवाहांची, चळवळींची सर्वांगीण माहिती असणं आवश्यक असतं... या पुस्तकात भारतातील गेल्या १०० वर्षांतील डाव्या चळवळींचा आढावा घेण्यात आला आहे. हे पुस्तक त्याविषयी केवळ समग्र माहिती देणारं नाही, तर त्याबद्दलचं वाचकांना सर्वांगीण आकलन साध्य व्हावं, या कळकळीने लिहिलेलं आहे. उदाहरणार्थ, या पुस्तकात प्रफुल्ल बिडवई यांनी केवळ डाव्या संसदीय पक्षांच्या निवडणुकीतील (लोकसभा, विधानसभा) कामगिरीचा आढावा घेतलेला नाही; तर त्या त्या वेळी विविध पुरोगामी जनसंघटनांच्या चळवळींनी वेâलेली कामगिरी, अशा निवडणुकींमध्ये कोणते मुद्दे महत्त्वाच होते, विविध राजकीय शक्तींचं आणि समाजातील घटकांचं संघटन कसं केलं गेलं (डावे, मध्यममार्गी आणि प्रस्थापित उजवे पक्ष, सर्वांद्वारे), तेव्हा आंतरराष्ट्रीय परिस्थिती कशी होती, कोणत्या आंतरराष्ट्रीय, साम्राज्यवादी शक्ती सशक्त होत्या वा देशातील कोणते वर्ग जोरावर होते याचे तपशील दिलेले आहेत आणि त्यामुळेच देशातील वेळोवेळीच्या राजकारणाचं खरं स्वरूप समजून घेण्यास अंतर्दृष्टी लाभते. तत्कालीन परिस्थितीचा संदर्भ स्पष्ट होऊन चळवळीच्या वाटचालीचं, चढ-उताराचं केवळ समग्र नाही, तर सर्वांगीण आकलन साध्य होतं.
-
Devdaranchya Chayetla Mrutyu (देवदारांच्या छायेतला
रस्किन बाँड यांच्या नवीन कथांच्या या विलक्षण संग्रहात गतकाळातल्या मसुरीत घडलेल्या रोमांचक गोष्टी आहेत. त्यात ‘खून झालेला पाद्री’, ‘विवाहबाह्य संबंध ठेवणारं जोडपं’, ‘जन्मतः दुष्ट असलेला मुलगा’, ‘बॉक्स बेडमधलं प्रेत’, ‘टपालातून आलेल्या विषाचं गूढ’, ‘कोन्यॅकमधून केलेला विषप्रयोग’, ‘रहस्यमय काळा कुत्रा’ आणि ‘दर्यागंजचा खुनी लेखक’ अशा चटकदार कथा ते सादर करतात|