-
-
BramhandNakay Shree Swami Samarthanchi Bhramangath
ब्रम्हांडनायक श्री स्वामी समर्थांची भ्रमणगाथा प्रगटीकरणा पासून हिमालय ते अक्कलकोट पर्यंतची श्री स्वामी समर्थांची भ्रमणगाथा
-
lavachikata Anandi Jivanachi Kala(लवचीकता - आनंदी
जेव्हा गौरांग दास यांनी सांगितलेल्या गोष्टी तुम्ही तुमच्या जीवनामध्ये वापराल तेव्हा निश्चितच तुमचं हृदयपरिवर्तन होईल. तुम्हाला एका वेगळ्याच शांततेचा अनुभव मिळेल. यामुळे तुम्ही जास्त प्रभावीपणे निर्णय घेऊ शकाल आणि योग्य दिशेने प्रगती करू शकाल. त्यांचं जीवन आणि शिकवणीमुळे मी अतिशय प्रभावित झालो आहे. आता तीच शिकवण या पुस्तकरूपाने तुमच्यासाठी उपलब्ध झाली आहे. - जय शेट्टी, ‘न्यूयॉर्क टाइम्स’चे बेस्टसेलर लेखक * तुम्ही अति विचारांच्या गर्तेमध्ये हरवलेले आहात का? * कोणता निर्णय घ्यावा, या विचारांनी तुमची झोप उडाली आहे का? * जीवन, कामधंदा आणि नातेसंबंध या सगळ्या गोष्टींमध्ये प्रगती करून जीवनाला जास्त चांगला अर्थ प्राप्त व्हावा असं तुम्हाला वाटतं का? * आईन्स्टाईन एकदा म्हणाले होते की, ज्ञान हे शाळेत जाण्यामुळेच मिळतं असं नाही तर जीवनभर ते मिळवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांनी ते प्राप्त होत असतं. तुमची शोधमोहीम या पुस्तकाच्या माध्यमातून जास्त चांगल्या प्रकारे सुरू होऊ शकते. या पुस्तकातील महान कथा आणि त्यामधून घ्यावयाचा बोध याच्या माध्यमातून गौरांग दास हे आपल्याला एका वेगळ्याच यात्रेवर घेऊन जातात. अपेक्षांच्या आणि अस्वीकृतीच्या दर्याखोर्यांमधून पलीकडे जाऊन आपल्याला आपल्या खर्या अस्तित्वाची ओळख करून देतात. यामुळे आपल्या हृदयाची दारं खुली होतात आणि आपल्याला खर्या आध्यात्मिक अस्तित्वाची जाणीव होते. गौरांग दासजी आपल्यामध्ये असलेलं असामान्य सामर्थ्य आणि लपलेल्या गोष्टींची आपल्याला जाणीव करून देतात. विवेक बिंद्रा, बड़ा बिझनेसचे संस्थापक आणि सीईओ. गोष्टींच्या माध्यमातून अमूल्य असा संदेश देणारे गौरांग दास हे माझे प्रेरणास्थान आहेत. कथा सांगण्याची त्यांची शैली ही अतिशय वैशिष्ट्यपूर्ण, प्रगल्भ, सहज पण तितकीच प्रभावीही आहे.- राधाकृष्णण पिल्लई, लेखक आणि चाणक्य इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ लीडरशीप स्टडीजचे संचालक. यशाचे मापदंड हे जागतिक स्तरावरील व्यावसायिकांसाठी कालानुरूप बदलत चाललेले आहेत. पण या पुस्तकामधून आपल्याला हेच पाहायला मिळतं कीकितीही परिवर्तन झालं तरीही काही गोष्टी या कधीच बदलत नाहीत. त्यामुळेच यशाची खरी परिभाषा समोर येते.- अजय पिरामल.
-
Shree Swami Raja(श्री स्वामी राजा)
श्री अक्कलकोट स्वामी म्हणजे प्रत्यक्ष अवतारी विभुती. त्यांच्या कृपाप्रसादाचा अनुभव आजही कित्येकांना येतो. मनःशांती लाभणे हा फार दुर्मिळ लाभ. श्री स्वामींच्या नुसत्या स्मरणानेही दुर्मिळ मनःशांती प्राप्त होते, असे सांगणारी सर्व थरातील माणसे जेव्हा भेटतात, तेव्हा वाटते की ही नुसती अंधश्रद्धा नाही तर प्रत्यक्ष अनुभव आहे. आणि मग अवतारी पुरुषाच्या जीवनात डोकावण्याचा मोह होतो. ते जीवन पहिले की मन थक्क होते. ही अशी लेखनसेवा त्यामुळेच घडते. 'श्री स्वामी राजा' ही कादंबरी म्हणजे स्वामींच्या भव्यदिव्य साक्षात्कारी स्वरूपाला अर्पण केलेली भक्तिसेवाच आहे.
-
Navi Pidhi Navya Vata (नवी पिढी नव्या वाटा )
प्रकाशवाटा' या पुस्तकात आमच्या पिढीने भामरागडच्या जंगलात अंधाराकडून प्रकाशाकडे कशी वाटचाल केली याची गोष्ट मी सांगितली होती. 'नवी पिढी, नव्या वाटा'मध्ये गोष्ट आहे त्यानंतरच्या भरारीची. आदिवासींना सजग, सक्षम आणि सुदृढ बनवण्याचं बाबा आमटेंचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी उचललेल्या पुढच्या पावलांची. दिगंत-अनघा, अनिकेत - समीक्षा यांनी सोबतीला नवे कार्यकर्ते घेऊन हेमलकशातल्या 'लोकबिरादरी' प्रकल्पाचं काम वेगळ्याच उंचीवर नेलं आहे. या सर्वांना एकदिलाने काम करताना बघून आम्हा जुन्या कार्यकर्त्यांचं मन समाधानाने भरून येतं. प्रकल्पाच्या भवितव्याची आता तीळमात्रही काळजी नाही. - डॉ. प्रकाश आमटे
-
Divas Alapalli Che (दिवस आलापल्लीचे)
लेखिकेच्या लहानपणीच्या (वय वर्षे 8 ते 11) आठवणींचा अतिशय तरल, उत्कंठावर्धक आणि तितकाच भावविभोर पट म्हणजे हा कथासंग्रह आहे. सदर पुस्तकास महाराष्ट्र शासनाच्या पुरस्कारासह सहा पुरस्कार प्राप्त आहेत. एकाच पुस्तकाला एकाच वर्षात सहा पुरस्कार मिळण्यात लेखिकेचे अतिशय प्रामाणिक प्रसंगवर्णन, घटना वाचकाच्या डोळ्यासमोर जिवंत करण्याचे कसब हेच महत्वाचे शक्तिस्थळ आहेत. प्रत्येकाने जरूर वाचावे असे एक उत्कृष्ट पुस्तक...
-
TV Malika Ani Barach Kaahi (टीव्ही, मालिका आणि
टीव्हीविषयी माझ्या मनात प्रचंड कृतज्ञता आहे. ह्या क्षेत्रानं असंख्य कलावंत मित्रमैत्रिणींना सन्मान आणि सुबत्ता मिळवून दिलीय. अहोरात्र चालणारी ही करमणुकीची यंत्रणा मुग्धा या पुस्तकातून आपल्याला समजावून सांगते. ती आरोपीचा वकील अजिबात होत नाही. ह्या क्षेत्राला कमी लेखणाऱ्यांना ती दूषणं देत नाही. प्रत्येक लेखातून उलगडत जाते मालिका - खिंड लढवणाऱ्या कित्येकांच्या मेहनतीची गोष्ट. मुग्धाच्या पुस्तकाची सफर अत्यावश्यक आहे. कारण ९०% घरांमध्ये टीव्ही आहे. कॉलेजमध्ये असताना एकांकिका विश्वात कुतुहलानं वावरत असल्यापासून मी मुग्धाला ओळखते. तिचं मोहक व्यक्तिमत्त्व बघता ती अभिनयक्षेत्रात रमणार, ही अटकळ मनाशी बांधणं सोपं होतं. पण पुढे मुंबईत स्थिरावताना तिनं मालिकांचं लेखन सुरू केलं आणि आज ती त्यातही यशस्वी आहे. मुग्धा तिच्या प्रवासात सजगपणे चालत राहिली. स्वत:च्या प्रवासाकडे ती प्रांजळपणे पाहू शकतेय. आता त्यातले बारकावे ती आपल्यासाठी खुले करतेय. अभ्यासू तरी रंजक अशी ही शोधकथा मनोरंजनासाठी आसुसलेल्या असंख्य प्रेक्षकांसाठी मोलाची ठरणार आहे. -- सोनाली कुलकर्णी