-
Ganaryache Por ( गाणार्याचे पोर)
दिवंगत गायक भारतरत्न भीमसेन जोशी यांचे ज्येष्ठ चिरंजीव राघवेंद्र जोशी यांनी लिहिलेले ' गाणार्याचे पोर ' बदामीतल्या त्या स्वतंत्र संसारातील सुखाच्या आठवणी येताच आई आपल्यातच हरवून जात असे. पहाटे उठून भीमण्णा नुसत्या खर्जाची मेहनत करत. एकदा चहा घेऊन ते रियाजाला बसले होते. घसा खाकरून खाकरूनही खर्ज (मंद्र सप्तकातला षड्ज) नीट लागला नव्हता. आईकडे दुसर्या चहाची मागणी झाली. बशीत ओतून दोनच घोट घेतले असतील-नसतील. बाहेर एक वासरू हंबरले. हातातली चहाची बशी खाली ठेवून भीमण्णांनी त्या हंबरण्यात आपला सूर मिळवला व आईला ओरडले- 'हा बघ खरा खर्ज!' बदामीत असतानाच एकदा भीमण्णा टायफॉईडने खूप आजारी पडले. गावातल्या डॉक्टरांनी सतत औषधोपचार केले. आईने अहोरात्र सेवा केली, म्हणून त्यातून ते वाचले. एके दिवशी तर ताप डोक्यात शिरून वात झाला. खडेमीठ घेऊन ते डोक्याला चोळले होते. आवाज पूर्ण गेला होता. दीड महिन्यानंतर एके दिवशी चहा पीत असताना भीमण्णांनी सूर लावला आणि आवाज बाहेर येताच आईला आनंदाने म्हणाले- 'नंदी माझा आवाज परत आला गं.' हळूहळू प्रकृती सुधारून परत गाणे सुरू झाले. माझ्या या स्वरभास्कर पित्याच्या आयुष्यात माझ्या आईने तिचे पत्नीचे कर्तव्यच जरी केले असले, तरी तिचे हे योगदान कधीच न पुसले जाणारे आहे. आपले ' कुंकू ' राखण्यासाठी तिने हे केले, तरी भविष्यातील ' भारतरत्न भीमसेन ' चा तो पुनर्जन्मच होता! त्याच सुमारास भीमण्णांच्या काकांनी, गोविंदकाकांनी एक कन्नड नाटक ' भाग्यश्री ' लिहिले व रामकाकांनी ते नाटक करायचे ठरविले. रामकाका स्वत उत्तम नट होते. नाटकात मुख्य भूमिका भीमण्णा करणार होते; पण स्त्रीपात्र कोण करणार हा प्रश्न होता. कर्नाटकात त्या काळी कोणीही स्त्री नाटकात काम करत नसे; पण इकडे औरंगाबादकडील ' वत्सला मुधोळकर ' या स्त्रीला भीमण्णा रेडिओ स्टेशनवरील भेटीमुळे ओळखत होते. गावोगावी मेळ्यांतून ' त्या ' मिळतील त्या भूमिका करत. अशा वेळी कोणाकडेही मुक्काम करण्याचा ' त्यां ' ना अनुभव होता. जालन्यातही गुरूगृही ' घरंदाज ' तालीम ' त्यां ' नी घेतल्याचे सर्वांना माहीत होते. त्यामुळे अजिबात कन्नड येत नसतानाही त्यामुळे ' त्यां ' ना धारवाडला बोलविले गेले. सतत नाटकाच्या तालमी व त्यातले ' संवाद ' समजावून सांगण्याच्या निमित्ताने ' त्यां ' चा भीमण्णांशी सहवास वाढत गेला. असल्या प्रकरणाचे रामकाकांनाही काहीच वावडे नव्हते. गंमत संपताच प्रकरण संपते, हा त्यांचा स्वतचा अनुभव! या नाटकाचे धारवाडला प्रयोग झालेच; पण पुण्या-मुंबईलाही झाले. प्रयोग थांबताच भीमण्णा परत बदामीला येऊन आपल्या संसारात-गाण्यात मग्न झाले... हे नाटकच ' सुनंदा ' च्या संसाराला आग लावेल, याची मात्र तेव्हा कोणीच कल्पना केली नव्हती. त्यामुळे आईला पुढेपुढे जेव्हा या गोष्टी आठवत, तेव्हा ती रामकाका व इतर जोश्यांच्या नावे एकेरीत शुद्ध सात्त्विक शिव्यांची लाखोली वाहे! अतोनात अन्याय भोगाव्या लागलेल्या त्या अबलेच्या हाती आणि काय होते? आई साधीच होती. ' त्या ' एक दिवस अचानक बदामीला आल्या व आईचे पाय धरून, 'मी केवळ गाणे शिकण्यासाठीच आले आहे व ' भीमण्णां ' ची शिष्या म्हणून राहीन' असे वचन आईला दिले. येथेच आई गाफील राहिली. माझा व उषाचा तोपर्यंत जन्मही झालेला होता व आईला परत दिवस राहिले होते. त्यामुळे आईने हो म्हटले. आईच्याच थोरल्या बहिणीच्या वाड्यात ' त्या ' भाड्याने खोली घेऊन राहू लागल्या. वेळेला आई किंवा माझी मावसबहीण सुधा ' त्यां ' ना जेवणही पाठवी. दिवस भरून आईने सुमंगलाला जन्म दिला. दीड-दोन महिने गेले आणि एक दिवस मात्र उगवला तो, आईच्या आयुष्यातला काळाकुट्ट दिवस! सकाळी भीमण्णा अंथरुणात नव्हते. नीट पाहिल्यावर आईला आपली पत्र्याची ट्रंकही उघडी दिसली. आता येतील, मग येतील म्हणून आईने स्वयंपाक केला; पण यांचा पत्ता नाही. तेवढ्यात आईची भाची सुधा पळत आली आणि ' त्यां ' चाही पत्ता नाही, म्हणाली. आईने पत्र्याची ट्रंक तपासली, तर त्यातली आईची सोन्याची साखळी गायब झाली होती. पुढे नागपूरला रेडिओवर गाणे होते, हे भीमण्णा मित्राजवळ बोलल्याचे व ते तिकडेच गेल्याचे आईला कळले. आईचे बाळंतपण ' त्यां ' च्या पथ्यावर पडले होते. कसलाही माहेरचा व सासरचा आधार नसलेली माझी आई दु:खाने व फसवणुकीने गर्भगळित झाली. आईने सांगितल्याप्रमाणे तिला आमच्या घराण्याचे गुरू स्वामी-राघवेंद्रस्वामी यांनी आतूनच जाणीव दिली की- 'काहीही झाले तरी नवर्याची पाठ सोडू नकोस. संसाराच्या गाडीचे एक चाक निसटले आहे; पण तू कच खाऊ नकोस!' स्वामींचा तो आदेश मानूनच अगोदर आई-सुमंगला नागपूरला गेले. नंतर मी व उषा, आम्हाला घेऊन जाण्यास गदगला आलेल्या भीमण्णांबरोबर १९५१ च्या सुमारास नागपूरला जाऊन पोहोचलो. २४-२५वर्षांची तरणीताठी सुंदर बायको व पदरी तीन मुले, हे नागपूरकरांनी पाहताच प्रतिष्ठित लोकांत हे जमणारे नाही, म्हणून ' त्या ' व भीमण्णा पुण्याला आले. (ज्या श्रीमंत बाबुराव देशमुखांची ' भीमसेन ' पुस्तकात ' त्यां ' च्या लग्नाची साक्ष सांगितली गेली आहे, तेच भीमण्णांना रागावले व त्यांनी त्यांना चांगलेच खडसावले होते.) 'पहिली बायको वेडी आहे!' असे ' त्यां ' च्याकडून अगोदर सांगितले गेले होते; पण प्रत्यक्ष आई व आम्हाला पाहताच तो बार पोकळ गेला. तेथे विवाह केला, असे नंतर छापून आणले गेले. लग्नाचा खोटा प्रचार करण्याचे गोबेल्सचे तंत्र सर्वकाळ वापरले गेले; पण सत्य वेगळेच होते. आईच्याच ' सोन्याच्या साखळी ' चे रूपांतर ' मंगळसूत्रा ' त झाले होते व सत्यनारायण करून ते गळ्यात घातले गेले होते. नागपूरमधील वास्तव्य मला पूर्णपणे स्मरणात आहे. शुक्रवार तलावाजवळ ठाकुरांच्या वाड्यात आम्ही भाडेकरू होतो. ते नवरा-बायको आम्हावर अतोनात प्रेम करत व आईला मानसिक आधार देत. वाड्याच्या मालकीणबाई जनाताई ठाकुरांनी तर आम्हा भावंडांना लळाच लावला होता. नागपूरचा तो जीवघेणा उन्हाळा, रात्रीच्या गच्चीवरील ' अंगत-पंगती ' नंतर खाल्लेली ' दही-साखर ', जनाताईंबरोबर लग्नाला जाऊन खाल्लेला ' भजी-भात ', सर्व स्वच्छ आठवते. श्रीमंत बाबुराव देशमुखांकडे बैलपोळ्याला गेलो असताना चांदीच्या ताटात ' पेशवाई ' थाटाने केलेले जेवण व त्यांच्या शेतावर जाऊन झोडलेली हुर्डा-पार्टीही चांगलीच लक्षात आहे! जेमतेम वर्षभराच्या मुक्कामानंतर आम्ही पुण्याला निघालो. माझी पहिलीची परीक्षा संपताच माझा व्यंकणकाका आम्हाला पुण्याला न्यायला आला. दोन-तीन दिवस ही सामानाची बांधाबांध चालू असताना आई मात्र उदास होती. मध्येच डोळ्यांतून टिपे गाळायची. बदामीहून नागपूरला येताच बसलेल्या जबरदस्त मानसिक धक्क्यातून सावरत इथल्या वातावरणात थोडी स्थिरावली होती. जनाताईंनी जी माणुसकी दाखवली, प्रेम दिले व जो जिव्हाळा दाखवला, त्यामुळे तिला सारखे भरून येत होते! माझे शाळेतले मित्रही घरी सारख्या चकरा मारून जात होते. जिवलग मित्र दिलीप बडवेशी परत भेटण्याच्या आणाभाकाही रडत रडत घेऊन झाल्या. निघायचा दिवस उजाडला. आम्ही सर्वांच्या पाया पडलो. आईचा, जनाताई आणि ठाकुरांसमोर वाकताना मात्र बांध फुटला. ती रडू लागली. 'जनाताई, काय होणार माझ्या पोराबाळांचे? तुम्हीच सांगा की हो! आता मला कोणाचा आधार?', आई. 'सुनंदा स्वतला आवर! रडू नकोस. सोन्यासारख्या पोरांकडे बघ. काळजी करू नकोस, देव तुझ्या पाठीशी आहे.' असे म्हणत जनाताईंनी आईला कवेत घेतले व हळूच एक नोट तिच्या हाती कोंबली. 'चला गाडीला उशीर होतो आहे!' व्यंकणकाका म्हणाला. परत एकदा सर्व घर भरल्या डोळ्यांनी पाहून घेतले व बाहेर पडलो. बाहेर टांगा उभाच होता. आयुष्यात परत नागपूरला जाण्याची वेळ आली नाही; पण ' नागपूर ' नाव येताच मात्र काळ्या-सावळ्या जनाताई व त्यांचे रांगडे पती, भाबडे हसू घेऊन माझ्यासमोर उभे राहतात! आयुष्यभर आईला त्यांच्या रूपात भेटलेले ' विठोबा-रखुमाईच ' आठवून जातात.
-
Chipad (चिपाड)
आजीच्या प्रोत्साहनाने पोलिस खात्यात प्रवेश करून स्पर्धा परीक्षा पास होऊन पोलिस उपनिरीक्षक झालेल्या तारा या तरुणीचं आयुष्य गवळण कलकत्ते या कांदबरीत मांडतात. कथानायिका तारा पोलिस नोकरीत असताना सामान्यां[...]
-
Disha Andharlya(दिशा अंधारल्या)
असं म्हणतात, आयुष्याची पायवाट चालताना एखादा आशेचा किरण माणसाला अपुरा असतो. तो त्याची उमेद वाढवतो, त्याला चालत ठेवतो परंतु माणसाची आशा विझली तर… चारी बाजूला अंधार दाटून आला आणि भविष्यातही फक्त काळोखाचा हुंकारच ऎकू आला तर … दिशा हरवलेल्या माणसांच्या या कथा...
-
Jaticha Dakhla Ani Tyachi Padtalni(जातीचा दाखला आण
जातीचा दाखला आणि त्याची पडताळणी १ राज्य घटनेतील तरतुदी २ महाराष्ट्र अनुसूचित जाती - जमाती, विभुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग अधिनियम २०००. ३ महाराष्ट्र अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र नियम २००३.
-
Antarman Ani Swapnsrushti (अंतर्मन आणि स्वप्नसृष्ट
अंतर्मन आणि स्वप्नसृष्टी (शास्त्रीय दृस्तीकोनातून) १ स्वप्न जगाशी संपर्क साधा २ स्वप्नांवर निंयत्रण ठेवण्याची कला
-
Antarmanachi Antardrushti (अंतर्मनाची अंतर्दृष्टी)
अंतर्मनाची अंतर्दृष्टी १ अंतर्मन स्वप्ने आणि दिवास्वप्ने २ अंतर्मन सवयी आणि इन्द्रिय संस्कार ३ जप आणि अंतर्मन ४ लैगिकता आणि अंतर्मन ५ भय आणि अंतर्मन
-
Slum Rehabilitation Authority Zopadpatti Punarvasa
झोपडपट्टी धारकांसाठी खास बनविलेला कायदा! १ झोपडपट्टीधारक कोण? २ झोपडपट्टी पुनर्वीकास योजना व झोपडपट्टी पुनर्वसन योजनांची माहिती ३ सदर कर्तव्ये ४ स. र. अ. च्या महत्वाच्या अधि सूचनेतील माहितीपूर्ण बाबी ...
-
Grampanchayat Kayda Ani Tyache Mhatva (ग्रामपंचायत
या पुस्तकाचा हेतू हा सर्वसमान्य वाचकास कायद्याचे ज्ञान व्हावे हा आहे. या पुस्तकामध्ये हे ज्ञान प्राप्त होण्यासाठी जी माहिती अंतर्भूत करणे आवश्यक आहे, ती ती सर्व माहिती अंतर्भूत करण्याचा प्रयत्न केला आहे. सर्वसामान्य माणसाला सर्व कायदे एकत्रितरीत्या मिळावेत, या हेतूने शासकीय मुद्रणालयातून प्राप्त झालेली पुढील कायदे जसेच्या तसे साभार या पुस्तकात दिले आहेत: १) ग्रामपंचायत कायदा, १९५८ २) मुंबई ग्रामपंचायत नियम, १९५९ ३) मुंबई ग्रामपंचायत (ग्रामसभेच्या बै ठ की) नियम, १९५९ ४) मुंबई ग्रामपंचायत (जिल्हा ग्रामपंचायत अधिका रयांची कामे) नियम, १९५९ ५) ग्राम न्यायालय अधिनियम,२००८ इ.
-
Manusmruti (मनुस्मृती)
मनुस्मृती समज - गैरसमज १ अेक अभ्यास २ अेक चिंतन ३ अेक शोध
-
Natures Human Philosophy (नेचर्स ह्युमन फिलोसॉफी)
मनुष्य आणि इतर सजीवसृष्टीची निर्मीती कशी झाली, या बद्दल अनेक धर्म पंथामध्ये विविध मत प्रवाह मांडले गेले आहे. प्रत्येकाचे तत्वज्ञान समान नसले तरी प्रत्येक शास्त्र आपल्या तत्वज्ञानावर, मतांवर संबधीत विषय असल्या कारणी फारसे उघडपणे चांगले अथवा वाईट कोणी बोलण्यास तयार नाही, त्यामुळे मुळ प्रश्न शेकडो वर्षे अधांतरीत आहे. विज्ञानवादी मंडळी चिकित्से पेक्षा श्रद्धेच्या बळावर ठाम आहेत. अश्या या अनुत्तरीत प्रश्नांवर तत्वचिंतक अश्विनजी यांनी प्रकाश टाकले आहे ब्रम्हांड, निसर्ग कशा पद्धतीने सारे विश्वांचे सर्जन करते. याचा उलगडा करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. एक माणूस म्हणून पृथ्वीतलावर मी आल्यानंतर माझी विभागणी विविध धर्म आणि जाती मध्ये कशी झाली याची विवंचना या पुस्तकामध्ये करण्यात आली आहे. मृत्यूनंतर माझ्या अस्तीत्वाचे काय? या यक्ष प्रश्नांची उत्तरे चिकित्सक पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. थोडक्यात काय, २१ व्या शतकाचे "नेचर्स ह्युमन फिलोसॉफी" हे तत्वज्ञान प्रत्येकानी आत्मसात करण्यासारखे आहे .
-
Chakravyuh Bhed ( चक्रव्युह भेद)
एक म्हातारा त्याच्या नातीसह हॉटेल रंभामध्ये एक आठव्द्याकरिता उत्तरला.वीस वयाच्या त्या सुंदर, देखण्या नातीचा तो साठीतील म्हातारा होता. दोघं अगदी मौज माजात राहत होते. म्हातारा रंगीन शौकीन वागत होता. इष्क, मोहबत्तीची गाणी गुणगुणायचा, भरघोस सेंट मारून हॉटेलभर फिरायचा, भडक चित्रांची मासिकं बकोटीला मारून हिंडायचा. एकंदरीत त्याचं ते वागणं पाहून हॉटेलवाल्यांना काही वेगळाच संशय येत राहिला. तिसरया मध्यरात्री हॉटेलवर पोलिसांची रेड पडली आणि दोघं पोलीस म्हातारयाच्या दारावर जोरजोरात दंडूका आपटू लागले. हॉटेलमधील दिवेही मालविण्यात आले. म्हतारयाने दार उघडले आणि तो चार बोटी हात दरवाज्याच्या फटीतून त्यानं पाहिला. "ए म्हातारया, या वयात हे धंदे?" सोबतचा हवालदार म्हणाला. "आम्हाला सगळी खबर असते." "याला समोरच्या खोलीत डांबून ठेव. मी बघतो या धंदेवालीकडे!" त्या तरुणीकडे आशाळभूतपणे पाहत तो गॉगलधारी म्हणाला . "इन्स्पेक्टर पाटणकर, तुझा खेळ संपलाय." ताठ उठून उभा राहात म्हातारयाच्या वेषातला मियां म्हणाला. "नाही!" पाठीमागून राजहंसचा अवाज घुमला." हा इन्स्पेक्टर पाटणकर नाही. हा त्याचा तोतया. इन्स्पेक्टर रानडे गिरफ्तार करा याला."
-
Samrat Ashokcharitra (सम्राट अशोकचरित्र)
सुमारे अडीचहजार वर्षापूर्वी या भारतभूमीवर आपले अधिपत्य निर्माण करणारा इतिहासात अतिउद्य स्थान असलेला असा 'सम्राट अशोक' नावाचा राजा होऊन गेला. त्याने केवळ सर्व भारतखंडावर राज्य केले नाही तर येथील जनतेला धर्मज्ञान, सदाचार व भूतदया याची शिकवण दिली, प्रजेने त्याप्रमाणे वागावे अशी अपेक्षा धरून तसा प्रयत्न आयुष्यभर केला. अशा महान प्रियदर्शी राजाच्या चरित्रासंबंधी फारसे संदर्भ उपलब्ध होत नाहीत. शंभर वर्षापूर्वी तसे प्रयत्न झाले. काळाच्या ओघात संशोधनात अनेक संदर्भ मिळत गेले व ते आजही मिळत आहेत. कदाचित यापुढेही मिळतील. व संशोधनास नवीन विषय मिळत राहील यात शंका नाही. 'सम्राट अशोकाचे' चरित्र त्याने लिहिलेल्या स्तंभ- लेखाद्वारेच मिळते. श्री. वागो. आपटे यांनी मराठीतून चरित्र लिहून ७५ वर्ष लोटली. त्यानंतर असे मराठीत चरित्र प्रकाशित झाले नाही. मधल्या काळात झालेल्या संशोधनाचा आधार घेऊन श्री.प्र.रा. आहिरराव यांनी हे चरित्र परिपूर्ण (विकसित) केले आहे. अनेक नवीन संदर्भ, विचार व विषय घेतले आहेत, ते उपलब्ध झालेली छायाचित्रे व अशोकाच्या शिल्पांचे परिश्रमपूर्वक संपादन करून या चरित्रात दिले आहे. या महान सम्राटाचे पुनस्मरण करण्यास हातभार लावला आहे. मराठी वाङ्ममयातील एक उणीव या ग्रंथरूपाने भरून काढली आहे.
-
Ladak (लडाक)
मला हायकींगची फारच आवड आहे. हायकींगप्रमाणे लडाखला जायची माझी फार इच्छा होती. मला जायचं होतं. तेव्हा आत्माराम परब यांचं नाव सुचवलं गेलं. मला फार कुतूहल वाटलं आणि मी लगेच लडाखला जायचं नक्की केलं. माझ्या मानतील इच्छा वयाच्या चौरयाहत्तराव्या वर्षी पुर्ण झाली. या सहलीत आम्हाला घरगुती वातावरणात वावरल्याच आनंद मिळाला. आत्माराम बरोबर केलेली ती सफर अविस्मरणीय अशीच होती. नंतर मी ईशा टुर्स बरोबर सहकुटुंब भुतानलाही जाऊन आलो. आणखी बरयाच देशात मला आत्माराम बरोबर जायचं. आंतरराष्ट्रीय किर्तीचे न्युरो स्पायनल तज्ज्ञ डॉ. प्रेमानंद रामाणी
-
Bakhar Sambhaji (बखर संभाजीची)
महाराष्ट्राच्या पावन भूमीवरील एक अनोखे तीर्थक्षेत्र म्हणजे श्री क्षेत्र तुळापूर. भामा ,भीमा आणि इंद्रायणी या नद्यांच्या त्रिवेणी संगमावर वसलेल्या या क्षेत्राने महाराष्ट्राच्या इतिहासातील महत्वपूर्ण घटना पाहिल्या आहेत. महाराष्ट्राच्या इतिहासावर उमटलेली लखलखती, देदी प्यमान विद्युतरेखा म्हणजे छत्रपती संभाजीमहाराज. आपल्या अल्प कारकिर्दीतही सं भाजी महाराजांनी बजावलेल्या चतुरस्त्र कामगिरीला तोड नाही. मुघलांपासून ते पोर्तुगिजांपर्यंत स्वराज्याच्या सर्व शत्रूंना आपल्या समशेरीची जरब बसणारे शंभूराजे कवी प्रतिभेच, संवेदनशील राज्यकर्ते होते. या तेजस्वी पुरुषाची ओजस्वी गाथा सांगणारया या पुस्तकात जिथे संभाजी महाराजांनी वीरमरण पत्करले त्या तुळापूर परिसराचा इतिहास, भूगोल, संस्कृती यांचा वेधही घेतलेला आहे.