-
Nakalat Sare Ghadale (नकळत सारे घडले)
देवयानी, खरं म्हणजे त्या मेरी गो ग्रुपची मेन लीडर. तीच आकस्मिक निधन त्या सर्वानाच चटका देणारं होतं. परन्तु तिनं आपल्या मृत्युनंतरही त्यांच्यात टेक चैतन्य जागृत होतं... त्यांना प्रेरित कल. एक दिवस तिनं स्वप्नात सांगीतल, "माझ्या मृत्युनंतरही माझा आत्मा तुम्हाला सहकार्य देइल.. एवढंच नाही टार मी तुमच्या बरोबर असेल." आपल्या मित्राना दिलेलं वचन.. दिलेला शब्द त्याप्रमाण त्यांना कोणत्या ना कोणत्या अडचणींतुन, समस्येतुन वाचवलं होतं. त्या त्या उद्भवलेल्या समस्या दूर केल्या होत्या.. कधी धोक्याचे इशारे दिले होते.. सर्वसाधारण लोकांना मात्र त्यांच्या अलौकिक कर्तृत्वाबद्दल नेहमीच कुतूहल वाटत होत... अन् आश्चर्यही. मी मी म्हणणाऱ्याणा... आणि दंदेलाशाली करणाऱयानाही त्यांची जागा दाखवली. टी म्हणजे देवयानिच्या माध्यमांतून!
-
Komejlel Phul (कोमेजलेलं फूल)
'कोणती स्वप्न बघितली होती आणि काय झांल?' बाळ गेल, बाळाचे वडिल गेले. आता सुगंधानं जायची तैयारी सुरु केली. पाच-सहा महीने टी हॉस्पिटल मधेच होती. डॉक्टरांना, नर्सेसला तिल जबरदस्तीनं औषधं द्यावी लागायची. डॉक्टर कुलकर्णी रोज भेटायला यायचे. समजावून सांगायचे. पण सुगंधाचं उत्तर ठरलेलं असायचं- 'आता जगुन काय करू?'
-
Musalmani Riyasat Khand-2(मुसलमानी रियासत-२)
मुसलमानी रियासतीच्या दोन खंडांतील इतिहासाचा कालखंड इ.स. १००० पासून इ.स. १७०७ पर्यंत सुमारे सातशे वर्षांचा आहे. महंमद गझनीच्या भारतावरील पहिल्या स्वारीने मुसलमानी इतिहासाचा आरंभ होतो आणि मोगल बादशहा औरंगजेबाच्या मृत्यूबरोबर या इतिहासाचा शेवट होतो. या इतिहासाबरोबरच इ.स. १००० पासून सतराव्या शतकाच्या मध्यापर्यंत गुजरातचा इतिहास, विजयनगरच्या साम्राज्याचा उदय, उत्कर्ष आणि अस्त, स्वतंत्र रजपूत राज्ये यांचा संक्षिप्त इतिहासही मुसलमानी रियासतीमध्ये वाचायला मिळतो. मुसलमान कोण होते? त्यांच्या पूर्वेतिहास कोणता? हे सांगत असतानाच रियासतकारांनी त्यांचा धर्म, संस्कृती, राजकीय धोरण, धर्मप्रसाराचे सूत्र, त्यांनी अरबस्तानापासून भारताच्या वायव्य सीमेपर्यंत पोहोचण्यासाठी स्वीकारलेले मार्ग यांचीही माहिती दिली आहे.
-
Musalmani Riyasat (मुसलमानी रियासत)
मुसलमानी रियासतीच्या दोन खंडांतील इतिहासाचा कालखंड इ.स. १००० पासून इ.स. १७०७ पर्यंत सुमारे सातशे वर्षांचा आहे. महंमद गझनीच्या भारतावरील पहिल्या स्वारीने मुसलमानी इतिहासाचा आरंभ होतो आणि मोगल बादशहा औरंगजेबाच्या मृत्यूबरोबर या इतिहासाचा शेवट होतो. या इतिहासाबरोबरच इ.स. १००० पासून सतराव्या शतकाच्या मध्यापर्यंत गुजरातचा इतिहास, विजयनगरच्या साम्राज्याचा उदय, उत्कर्ष आणि अस्त, स्वतंत्र रजपूत राज्ये यांचा संक्षिप्त इतिहासही मुसलमानी रियासतीमध्ये वाचायला मिळतो. मुसलमान कोण होते? त्यांच्या पूर्वेतिहास कोणता? हे सांगत असतानाच रियासतकारांनी त्यांचा धर्म, संस्कृती, राजकीय धोरण, धर्मप्रसाराचे सूत्र, त्यांनी अरबस्तानापासून भारताच्या वायव्य सीमेपर्यंत पोहोचण्यासाठी स्वीकारलेले मार्ग यांचीही माहिती दिली आहे. दोन खंडांची मिळून पृष्ठसंख्या - ११०० पुठ्ठाबांधणी व आकर्षक बॉक्ससह दि. १६ ऑगस्ट २०१२ पासून संच पाठविण्यास सुरुवात होईल.
-
Aagnimanchak (अग्नीमंचक)
मुंबईच्या सैलसर आणि पुढारलेल्या वातावरणात मनमोकळे वाटणार होते. इथे ख्रिश्चन समाज पुधारालेला असला तरी डेटिंग. रात्रिबेरात्री बॉबफ्रेंडबरोबर भटकणे हे पश्चात्य रिवाज फारसे सभ्य लोकांना रुचत नसत. मुंबईत मात्र हे चालते. शिवाय अफाट मुंबईत छिपाछिपी खेलने सोपे.भोळ्या एस्थर आन्टीला चकवणे टार त्याहुन सोपे. इथे गोव्यामधे संथ आणि ठण्ड हवेत आनखिन दोंन वर्षात तारुण्य वाया घालवण्यापेक्षा आत्ताच कॉलेज सोडून मुंबईला जाने काय वाईट? बी.ए. होउन फरक काय? थोड़ा पगार जादा मिळेल. पण एवढी पैशांची निकड नव्हतीच. पप्पांची इस्टेट खुप होती. पोर्तुगीज कायद्याने मुलीला बरोबरीने हिस्सा मिळतो. पप्पंच्या पश्यात टी, फिलिप, अग्नेस व फिलोमिना यांना इस्टेटीचा बरोबर एकेक चतकोर येणार होता. तोही थोड़ा नव्हता.
-
Vishwas (विश्वास)
'झांलं ते चांगलं झांलं सुजा जिथं प्रेम नहीं तिथं संसारही नाही. तो सुखी नक्कीच झाला असता. पण तुझ आयुष्य मात्र दु:खानं झोकाळून गेलं असतं. लग्न झाल्यावर चुकीची दुरुस्ती करता येत नाही. चुक होण्याआधीच तू सावारालीस ते ठींक झाल.' क्षणभर ते थांबले. मग तिच्याकडे एकटक पाहत म्हणाले. 'हा तुझ्या वेदना मला काळातत. पण वेदना सहन करण्याची ताकद परमेश्वरानं त्याला आधीच दिलेली असते. तो त्याची परिक्षाच पहात असतो.
-
Ganimi Kava (गनिमी कावा )
मराठ्यांच्या या युद्धतंत्राची प्रेरणा घेऊन हिंदुस्थानात १८५७ चा उठाव झाला जगातील ४२ गुलाम राष्ट्रांना स्वातंत्र्य मिळविण्याची प्रेरणा आणि ताकद या शिवतंत्राने दिली. शिवतंत्राचा उपयोग करून जी राष्ट्रे स्वतंत्र झाली त्यामध्ये क्युबा, व्हिएतनाम, जर्मनी, जपान अगदी शेजारील बांगलादेशही आहे. व्हिएतनामचे गुरिल्ला वार, जर्मनीची ब्लीट्स क्रिग, जपानची छापामारी, माओत्सोतुंगचा स्वातंत्र्य लढा ही सर्व शिवछत्रपतींची गनिमी काव्याची आधुनिक रूपे. म्हणून खऱ्या अर्थाने मराठ्यांचे युद्धतंत्र जागतिक कीर्तीचे आहे. या देशातील क्रांतीकाराकांनी जेव्हा सशस्त्र क्रांतीचा लढा उभारायचे ठरविले तेव्हा त्यांच्या समोर एकच नाव, एकच प्रदेश आणि एकच युद्धतंत्र होते. ते म्हणजे शिवशंभू छत्रपती, महाराष्ट्र आणि मराठ्यांचा गनिमी कावा. शंभूराजांच्या २०० व्या जयंतीचे (१४ मे १६५७) अवचीत्य साधून या देशातील क्रांतिकारकांनी पहिला उठाव केला. तो म्हणजे १८५७ चा राष्ट्रीय उठाव. आणि हाच गनिमी काव्याचा वणवा पेटता ठेवून आझाद हिंद फौज आणि इतर संघटनांनी मिळून पुढील नव्वद वर्षात हा देश स्वतंत्र केला आणि म्हणून या देशाच्या स्वातंत्र्याचे प्रेरणास्थान आणि यशस्थान जर काय असेल तर तो मराठ्यांचा गनिमी कावाच. आता याच गनिमी कावा युद्धतंत्राचा उपयोग जगातील प्रगत ३५ राष्ट्रांमध्ये केला जातो. आपण या शिवतंत्राचा उपयोग आजही आपल्या देशाच्या संरक्षणासाठी आणि संवर्धनासाठी निश्चित करू शकतो.
-
Panipatcha Vijay (पानिपतचा विजय)
विदेशी आक्रमकांना कायमचा धडा शिकविणाऱ्या महायुद्धाचा खरा वेध या युद्धात जसे मराठ्यांचे नुकसान झाले तसेच मोठ्या प्रमाणावर अब्दालीचेही झाले. विजय म्हणावा तसा अब्दालीला या युद्धातून ना पैसा मिळाला, ना मुलुख, ना एखादी सत्ता. मग विजय तो कसला आणि कशाचा? या युद्धातून मराठ्यांना तात्पुरती माघार घ्यावी लागल्याचे क्षणिक चित्र दिसते तर दुरगामी दृष्टिकोनातून पाहिले तर मोठा दीर्घकालीन निर्णायक विजय मराठ्यांनी या युद्धात नोंदवला. या युद्धानंतर ३५ वर्षे दिल्लीवर भगवा फडकला. मराठ्यांचा या पार्थ पराक्रमामुळे पंजाबातील शिखांनाही परकीय आक्रामकांविरुद्ध उभे राहण्याची ताकद मिळाली. स्वातंत्र्यासाठी अनेक दशके लढणाऱ्या शिखांच्या स्वातंत्र्याची पायरी मराठ्यांनी बसविली हे विसरून कसे चालेल. अब्दाली स्वतःच्या अटीवर नव्हे तर मराठ्यांना हवा तसा तह करून या प्रसंगातून सही सलामत बाहेर पडू इच्छित होता ते याच कारणामुळे. मराठ्यांनी अब्दालीला दिलेला तडाखा एवढा जबरदस्त होता की खुद्द अफगाणिस्थानात अब्दाली जिवंत राहील का? असा प्रश्न लोकांना पडला. कांदाहारात अनेक प्रकारच्या बातम्या पसरू लागल्या. त्यात अब्दालीचा दारूण पराभव झाल्याची बातमी सराव मोठी होती. आता हिंदुस्थानात तर काही मिळाले नव्हते. आणी तिकडे दोन वर्षे अब्दाली भारतातच अडकल्यामुळे त्याच्या प्रभावाची बातमी तिकडे पोहोचल्यामुळे तिथले तख्तही बुडण्याच्या भीतीने अब्दालीला पाळणे भागच होते, तो जिवंत राहिला होता हेच त्याचे नशीब आणि हाही इतिहास जाणून होता की सिकंदर सारख्या जगजेत्याला हिंदुस्थानातील लोकांनी तांगडून मारला होता आणि बेबीलोनला तो जिवंत पोहचू दिला नव्हता. आपलाही मराठे सिकंदर करतील या भीतीने गाळण उडालेल्या अब्दालीने असेल तशा परिस्थितीत मोकळ्या हातांनी खिन्नावस्थेत हिंदुस्थान सोडला.