-
Daddy Longlegs (डॅडी लाँगलेग्ज )
जेरुशा - अनाथालयातली एक पोरकी मुलगी. तिची बुद्धिमत्ता पाहून एक दयाळू विश्वस्त तिचा कॉलेजशिक्षणाचा पूर्ण खर्च उचलतात. मात्र अट एकच. तिची प्रगती तिनं पत्रांतून त्यांना कळवत ठेवायची. जेरुशानं आपल्या अनामिक उपकारकर्त्याला एकदाच ओझरता पाहिलेला. लांब ढांगांचा उंच मनुष्य. म्हणून त्याचं नाव - ’डॅडी लाँगलेग्ज’! आपल्या अनामिक वडलांना जेरुशानं पाठवलेली नितांत सुंदर पत्रं म्हणजे ही कादंबरी. एका तरुण, देखण्या अनाथ मुलीचं भावविश्व हळुवारपणे उलगडत नेणारी, मनावर प्रसन्नतेचा शिडकावा करणारी...
-
Hasre Dhukha ( हसरे दुःख )
'माझं आयुष्यच नाट्यमय आहे. तेव्हा माझ्या आयुष्याचा प्रभाव माझ्या चित्रपटांवर पडणारच. त्यातील सारं वास्तव मी स्वतःच अनुभवल्यामुळे माझे चित्रपट जिवंत वाटतात. नकळत मी लोकांना जीवनातलं दुःख दाखवून देतो.’ आपल्या हसर्या मुखवट्यातून जीवनाच्या वेदनेचा सूक्ष्म वेध घेणार्या मनस्वी कलावंताच्या आयुष्याची कहाणी.
-
Akrosh ( आक्रोश )
बेरडांनी चोरी करावी, प्रतिष्ठितांची चाकरी करावी, पोलिसांच्या लाथा खाव्यात. हेच त्यांचे जीवन- लाचार, दरिद्री! देवीला सोडलं म्हणून या देवदासी-वेश्या. पण त्यांच्यामुळेच समाजातील अनेकींचं पतिपतापण शाबूत राहतं. उपेक्षित बेरड समाज आणि देवदासींच्या व्यथा वेशीवर टांगणार्या जागत्या चळवळीची सत्यकथा.
-
Sparshgandh (स्पर्शगंध )
आयुष्यरंगातील अस्वस्थ पदर व्यक्त करणारा, मन ढवळून काढणारा कथासंग्रह. या कथांचे आपणही सहप्रवासी असल्याची अनुभूती देणा-या आगळ्या-वेगळ्या, जिवंत कथांचा अमूल्य ठेवा.
-
मनातल्या वावटळी
या कथांमधून, निवेदनांमधून लेखिका रोजच्या जगण्यातल्या संगती विसंगती सांगत प्रश्नांची भेंडोळी निर्माण करते. त्या त्या कथेतील व्यक्ती रेखा कधी आपण जगलेली, पाहिलेली असते, त्यांचे प्रश्न परिचयाचेही असतात. वाचकाने उत्तर देण्याचे आवाहन त्यात असते. आपणही त्यावर नकळत विचार करू लागतो, सुन्न होऊन !
-
Madmaya ( माडमाया )
निसर्गाच्या कुशीत वावरणारी आणि वडपिपंळात महापुरुष पाहणारी नजर लाभलेली कोकणी माणसं ! कुळथाच्या पिठीसारखी तिखट . कोंड्याचा मांडा करण्याचा हातखंडा . नजरेत भरणाऱ्या निसर्गाची मिजास बेताबेतानि सांभाळून आपल्याच जगण्याची खूशी कशी मिरवतात नि जगणं जिरवतात त्याची ही वानगी!