-
Shantidoot ( शांतिदूत)
शांती ही विलक्षण गोष्ट आहे आणि स्वातंत्र्य अत्यंत पवित्र. 'कार्डिनल्स' आणि 'नीलपंखी' जे पक्षी आपापसात लढाया करतायत. संभ्रमात पडल्यामुळे नीलपंखी जे पक्ष्याला डगमगायला झालं. त्याला आपली तलवार लहानग्या कार्डिनलच्या मानेवर उतरवताच आली नाही. कार्डिनलने आपले डोळे मिटले आणि तलवारीच्या वाराची वाट पहात त्याने मान आक्रसून घेतली... नॅन्सी यी फान सहावीत असताना क्रांतियुद्धं, दहशतवाद आणि 9/11 च्या घटनेचा अभ्यास करत होती. त्याच रात्री तिला लढाई करत असलेल्या पक्ष्यांबद्दलचं धडकी भरवणारं स्वप्न पडलं. दुस-याच दिवशी तिने विश्वशांतीचा संदेश देण्याकरता कादंबरी लिहायला सुरुवात केली. अवघ्या बारा वर्षांच्या या अत्यंत बुद्धिमान बाललेखिकेने मैत्री आणि साहस या गुणांच्या जोरावर जुलमावर कशी मात करता येऊ शकते, ते या सशक्त कादंबरीतून दाखवून दिलेलं आहे.
-
Pray Savaj ( प्रे सावज )
पृथ्वीतलावरील प्रचंड प्रजातींपैकी फक्त मानव, चिम्पँझी व ओरंगउटान ह्यांच्यात स्वत्वाची जाणीव असते. तरीही आपल्यामधला स्वत:बद्दलचा भ्रम हा मानवजातीचा खास गुणधर्म आहे. एकविसाव्या शतकात कधीतरी आपल्या या संभ्रमातून उद्भवलेल्या बेदरकारपणाची आणि वाढत्या तंत्रज्ञानामधील शक्तीची टक्कर होणार आहे. ही टक्कर नॅनो तंत्रज्ञान, जैव तंत्रज्ञान आणि संगणक तंत्रज्ञान यात घडून येईल. ह्या तीनही तंत्रज्ञानामधील नॅनो तंत्रज्ञान सर्वात नवीन आहे. ह्यामध्ये अत्यंत सूक्ष्म यंत्रे, म्हणजे मानवी केसांच्या जाडीपेक्षा १००० पट लहान आकाराची यंत्रे बनवण्याचा ध्यास घेतलेला आहे. याद्वारे येत्या पन्नास-शंभर वर्षात नवीन प्रकारचे सजीव उदयाला येण्याची शक्यता आहे. मानवाने त्यांची रचना केली, म्हणून त्यांना कृत्रिम म्हणता येईल. पण ते पुनरुत्पादन करू शकतील.... त्यांची उत्क्रांती फारच वेगळ्या पद्धतीने आणि प्रचंड वेगाने होईल.... त्यांचा मानवजातीवर आणि जैवमंडलावर होणारा परिणाम विलक्षण असेल.... स्वत:ला प्रगत करू शकणार्या अतिसूक्ष्म शिकारी यंत्रमानवांच्या एका झुंडीवरचा संशोधकांचा ताबा सुटतो आणि.... भविष्यात घडू शकेल अशी थरारक विज्ञानकथा
-
Chicken Soup For The Womens Soul
स्त्रीची व्याख्या अनेक प्रकारांनी करता येईल. विद्यार्थिनी, कन्या, मौत्रीण, पत्नी, आई, गृहिणी, व्यावसायी! प्रत्येक रूप हे खास अलौकिक असे असते. तरी त्यांतही एक असा सामान्य धागा असतो. तो प्रत्येकीच्या स्वभावात असतो. प्रेमाचे बंध हळुवारपणे जपणारी, आजीवन मौत्री किंवा नाते निभावणारी, निवडलेल्या क्षेत्रांशी बांधिलकी घट्ट करणारी ही स्त्री! कौटुंबिक जीवनात फुलोरा फुलवणारी, त्याच बरोबर सामाजिक जीवनही सुसह्य करणारी! New York Times च्या Chicken soup for the Soul ह्या मालिकेत वेगवेगळ्या शीर्षकांखाली भावभावनांचे खास मिश्रण आहे! या पुस्तकामध्ये स्त्रीशी निगडित असलेल्या सार्या गुणवौशिष्ट्यांचे मार्मिक चित्रण आढळते. स्त्रीच्या आत्म्याची मंगलता व सौंदर्य इथे प्रगट होते! व्यावसायिक असो की गृहिणी, बालिकेपासून वृद्ध स्त्री पय|त सगळ्यांना हे अनुभव भावतील. ह्यातून त्यांना स्फूर्ती, आनंद मिळेल. इतकेच नव्हे; तर स्वत:चीही ओळख होऊ शकेल. ह्या अनुभवांची सोबत दीर्घकालपर्यंत स्त्रियांना मिळू शकेल.
-
Chicken Soup For The Sisters Soul
आपल्याला बहीण असणं आणि आपण कुणाची तरी बहीण असणं किती भाग्याचं आहे याचा साक्षात्कार घडवणार्या हृद्य कथा! ""ती नेहमीच माझ्या पाठीशी उभी असते.'' ""तिच्याविना मी सौरभौर होईन!'' ""मी तिला काहीही सांगू शकते.'' ""मी तिच्याशी दिवसा-रात्री कधीही बोलू शकते.'' "चिकन सूप फॉर द सिस्टर्स सोल' मधल्या कथांमधून वारंवार येणारी ही वाक्यं खूपच बोलकी आहेत. हे पुस्तक म्हणजे ह्या अनोख्या नात्याची थोरवी मानण्याचा एक उत्सवच आहे! बहिणी असतात आपल्या अत्यंत मौल्यवान अनुभवांच्या खजिनदार. आपली सुख-दु:ख वाटून घेणार्या साक्षीदार. कुटुंबाच्या वाट््याला आलेले काळेकुट्ट क्षण जोडीनं भोगणार्या सख्या. आपल्याला सर्वाधिक ओळखणार्या आपल्या मौत्रिणी. विविध अनुभवांद्वारे या कोमल नात्याचे अनेक तलम पदर उलगडून दाखवणार्या ह्या प्रेरणादायी कथा आपल्या मनाच्या सहसंवेदनेची तार झंकारत ठेवतात!
-
Chicken Soup For The Couples Soul ( चिकन सूप फॉर क
देवाने गाठी जरी स्वर्गात बांधल्या, तरी विवाह साजरे होतात इथे पृथ्वीवरच! ते निभवावेही लागतात आपल्या तुपल्यालाच! कसं निभावतो आपण हे नातं? - त्याच्या या कथा! एकांड्या आयुष्यात दुस-याचा प्रवेश झाला, की जीवनाचे आयाम बदलतात. मग प्रेमाच्या बहरात सप्तरंगी स्वप्न फुलतात. रोमान्स, स्फूर्ती, उत्साहाची कारंजी उडतात. जबाबदारी वाढली की संघर्ष आला - संकटं आली! एकमेकांच्या मदतीनं त्यांनाही तोंड देण्याची हिंमत येते. प्रेम कार्यप्रवण बनवतं - प्रेम व्यक्तीला स्वतंत्र करतं. कधी भानावर आणायचं कर्तव्य पार पाडतं - कधी आत्मभान जागृत करतं! एकमेकाला गृहीत धरलं तरी एकमेकाचा आदर करायला शिकवतं. मुरलेले प्रेम जन्मोजन्मीची साथ करतं. हळुवार प्रेम तितकंच कणखरही असतं. कुटुंब-समाज अशा अवघ्या पसार्यात स्वत:च्या अस्तित्वाचा शोध घ्यायला प्रवृत्त करतं. पती-पत्नीच्या सहजीवनाच्या अशा या कथा आपल्या प्रत्येक भावनेला स्पर्श करतात. काही कथा जुन्या - पण आजही तितक्याच ताज्या वाटणा-या - कालातीत! देशातीतही. फरक फक्त संस्कृतीचा आहे. पाश्चात्य संस्कृतीच्या चष्म्यातून कथा वाचल्या, की लक्षात येतं, अरे या तर आपल्याच कथा - आपल्या आयुष्यात आपल्या आसपास घडणा-या! कपल्ससाठी असणारं हे "चिकन सूप', "तुमचं - आमचं सेम असतं' याची प्रचीती देणा-या!
-
Alive ( अलाइव्ह )
चाळीस उतारू व पाच कर्मचारी यांना घेऊन उड्डाण केलेले ते विमान अँडीज पर्वतावर आदळले. तुकडे झालेल्या विमानाचा अर्धा भाग एवढाच आसरा त्यांना उरला ! थोडीशी वाईन व काही चॉकलेटे एवढेच खाद्य ! अपघात झाला तेव्हा फक्त 32 जण वाचले होते. काही दिवसात 27 उरले. मग 19 आणि शेवटी फक्त 16 ! शेवाळेसुद्धा नसलेल्या बर्फाच्छादित उंचीवर ते 72 दिवस कसे जिवंत राहिले ? कसे वागले ? त्यांची सुटका कशी झाली ? आणि सुटकेनंतर त्यांना कोणत्या अनुभवाला सामोरे जावे लागले ? याची रोमांचकारी सत्यकथा !
-
India In Slow Motion ( इंडिया इन स्लो मोशन )
तीस वर्षांहूनही अधिक काळ बी. बी. सी. चे भारतातील प्रतिनिधी म्हणून काम करीत असताना मार्क टुली यांना 'वाईट सरकारी प्रशासन' या केवळ एकाच कारणामुळे भारताच्या प्रगतीला खीळ बसली आहे हे लक्षात आलं. अयोध्या प्रकरणानंतर खुद्द अयोध्येमधील हिंदू लोकांची सहिष्णू वृत्ती, गालिचे विणणार्या बालकामगारांच्या प्रश्नाचे खरे आणि राजकीय स्वरूप, तेहलका प्रकरणातून उघड झालेला संरक्षण खात्यातील भ्रष्टाचार, हैदराबादचे 'सायबराबाद' करण्याचा चन्द्राबाबू नायडू यांचा प्रयत्न, गुजराथमधील जलसंधारणाचे खाजगी स्तरावरील प्रयत्न, शेतकर्यांच्या आत्महत्या, काश्मीरमधील खरी परिस्थिती अशा अनेक विषयांना मार्क टुली यांनी मर्मग्राही स्पर्श केलेला आहे. अनेक भारतीयांना अजूनही माहीत नसलेले असे एक वेगळे विश्व त्यांनी उलगडून दाखवलेले आहे. या सर्वांतून 'सारे जहॉंसे अच्छा' असलेला आपला भारत देश अजून मागे का रेंगाळतो आहे, याचे उत्तर त्यांनी फार समर्पकपणे दिले आहे.
-
Mera Parivaar (मेरा परिवार)
रशियाचा 'सर्टिफिकेट आॅफ आॅनर' हा मानाचा पुरस्कार मिळालेली नटाशा ही खरंतर एक सामान्य रशियन नागरिक, अनाथाश्रमात वाढलेली, परिस्थितीनंही बेताची परंतु, अनाथ मुलांविषयी मनात असलेल्या प्रेमाच्या ऊर्मीतून अन् अनाथपणाच्या दु:खातून तिचा जीवनप्रवास सुरू होतो. लग्न झाल्यानंतर मूल होण्याची शक्यता नाही, हे समजल्यावर नटाशा आणि तिचा नवरा डेहिड समजूतदारपणानं अन् एकमतानं, परिस्थितीच्या कचाट्यात सापडलेली अनाथ मुलं आपल्या घरी आणतात. नटाशा या मुलांची आई बनून त्यांचं पालनपोषण करते, त्यांच्या उत्कर्षासाठी जिवापाड प्रयत्न करते. हे सगळं करत असताना आलेले बरेवाईट अनुभव आणि सहजीवनातील चढउतार यांचं प्रांजळ कथन...