-
Sagara pran talmalala ( सागरा प्राण तळमळला )
ही कादंबरी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या क्रांतीपर्वावर आधारीत आहे. यात त्यांचे कार्यच अधिक प्रभावीतपणे वाचकांसमोर मांडण्याचा प्रयत्न आहे. सावरकर अंदमानहून परत आले, इथेच हे लेखन थांबवण्यात आले आहे.
-
Maharshi Te Gauri ( महर्षी ते गौरी )
समाजानं घालून दिलेल्या रूढ-परंपरांच्या चौकटीच्या धाकाला न बधलेलं कर्वे घराणं. शिक्षणानं स्त्री स्वावलंबी बनेल या विश्वासानं स्त्री शिक्षणाचा आग्रह धरणारे आणि त्यासाठी आपलं सारं आयुष्य वेचणारे महर्षी कर्वे! संतती नियमन आणि समागम स्वातंत्र्य या दोन गोष्टींनीच स्त्रीला मानसिक, शारीरिक आरोग्य लाभेल हे आपलं मत तर्कशुद्धपणे मांडताना समाजाशी एकाकी झुंज देणारे र. धों. कर्वे! आणि सत्तेच्या खेळाला मान्यता न देता व्यक्तिस्वातंत्र्याचा पुरस्कार करणार्या गौरी देशपांडे! ' या तीन नावांनी कर्वे घराण्याच्या तीन पिढ्या स्त्री-स्वातंत्र्याच्या प्रश्नांशी जोडल्या गेल्या. त्यांच्या रक्तातून वारसाहक्कानं प्रवाही झाले केवळ पुरोगामी विचार. स्त्री आज थोडंफार मोकळेपणानं जगत असेल, तर त्या श्रेयात कर्वे घराण्याचा वाटा मोठा आहे. स्त्री-स्वातंत्र्याच्या इतिहासातील काही पाने कर्वे घराण्यातील या तीन व्यक्तींचा इतिहासच आहेत.
-
Sthanabhrashta ( स्थानभ्रष्ट)
मुलांवर अतिविश्वास ठेवणाऱ्या माझ्यासारख्या भोळ्या (बावळट) वृद्धांना त्यांच्या जीवनाची अंतिम वर्षे दुःखात भिजून जाऊ नयेत, यासाठी सावध राहण्याचा मी सल्ला देतो. 'जे न देखे रवी ते देखे कवी' त्याच्यापुढे जाऊन म्हणावेसे वाटते, की 'जे न देखे कवी ते देखे अनुभवी!' म्हणून मला आलेल्या अनुभवांना शब्ददेह देऊन मी जिवंत उदाहरण समाजासमोर ठेवत आहे. हे कथन असले तरी ही कथा नाही. काही स्वजनांच्या बर्यावाईट कृत्यांची नोंद केल्याविना ते सादर होऊ शकत नाही, म्हणून त्यात तशा काही प्रतिक-प्रसंगाचे सविस्तर आलेखन आहे. ते केवळ वास्तवदर्शन घडवण्यासाठी आणि माझ्या सल्ल्यास वजन प्राप्त करून देण्याच्या हेतूने केले आहे. पुढच्यास ठेच मागचा शहाणा हे स्मरून मी भविष्यातील वृद्धांचे जीवनमान बिघडू नये, या हेतूने ही 'ठेच'; नव्हे, अनेक ठेचा सादर केल्या आहेत. आपल्या मुलांवरील प्रेमापोटी कमी-अधिक चुका प्रत्येकाकडून घडतात, पण या चुकांचा अतिरेक मुर्खपणा ठरतो. आपल्या मुलाची पत्नी वा मुलीचा नवरा यांच्या, आपल्याच मुलांना वश करण्याच्या क्षमतेस कमी लेखू नये. शक्य तो पायाखालची सरावाची जमीन सोडू नये.
-
Khel Sadeteen Takkyancha (खेळ साडेतीन टक्क्यांचा)
कोणत्या माणसांच्या संस्कृतीबद्दल आपण बोलत असतो ? कोणाच्या साहित्यकलांबद्दल आपण बोलत असतो ? मूठभर मंडळी भरल्या पोटाने आपल्याच जगण्या-भोगण्याचे चित्रण करत राहणार. त्यात इतरांना गौरव वाटावा असे काय आहे ? त्यात त्यांनी अभिमान बाळगावा असे तरी काय आहे ?
-
Bharatacha Arthsankalp (भारताचा अर्थसंकल्प)
या पुस्तकात भारतीय अर्थसंकल्पाविषयीच्या ऐतिहासिक माहितीचा पट लेखकाने मांडला आहे. यात अर्थसंकल्पाबाबतच्या काही स्मृती व घटनाही नमूद केल्या आहेत. स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या अर्थमंत्र्यांपासून ते सध्याच्या अर्थमंत्र्यांपर्यंत सर्व अर्थमंत्री आणि त्यांनी सादर केलेले अर्थसंकल्प यांची माहिती तक्त्याच्या रूपात आहे. अशी एकत्रित माहिती वाचकांना संदर्भासाठी उपयुक्त ठरावी.
-
Nondi dayarinantarchya (नोंदी डायरीनंतरच्या )
लोकसत्ता मधील स्तंभामुळे प्रवीण बर्दापूरकर हे नाव महाराष्ट्रात प्रसिद्ध झाले. नंतर हाच स्तंभ बर्दापूरकरांनी "लोकप्रभा" साठी लिहिला त्यावर आधारित हे पुस्तक. मराठवाड्याच्या दूरच्या मागास खेड्यात दारिद्र्याचे चटके सोसून मिळतील ती कष्टाची कामे करीत, रोजगार हमी योजनेवर खडी फोडत विधवा आईच्या पाठिंब्याने शिक्षण घेत आंतरिक ओढीने पत्रकारितेत शिरले. विविध वृत्तपत्रांमधून पणजी-चिपळूणपासून ते पुणे, औरंगाबाद , नागपूर इत्यादी ठिकाणी काम करून त्यांनी लोकसत्ता दैनिकाचे नागपूरचे शहर मुख्य वार्ताहर, मुख्य संपादक व स्थानिक संपादक अशी मजल मारली. तीन दशकाच्या पत्रकारितेच्या आयुष्यातील अनुभव "नोंदी डायरीनंतरच्या" या पुस्तकात संकलित केल्या आहेत.
-
Videshi Khichadi (विदेशी खिचडी)
पुस्तकाच्या नावातून सूचित होते. त्याप्रमाणे हा संमिश्र संग्रह आहे. लेख, लघुनिबंध, प्रवासवर्णन अशा विविध बांधणीच्या लेखनातून प्रकट होतो. जीवनाचे विशाल दालन उघडून दाखवणारा आकृती बंध.
-
Pragatichi Kshitije (प्रगतीची क्षितिजे)
आजच्या जगात यशस्वी व्हायचे तर अर्थव्यवहाराचे, व्यवस्थापनाचे तंत्रमंत्र माहीत हवेत. या आधुनिक व्यवहाराची सांगोपाग, सुबोध माहिती देणारे उपयुक्त पुस्तक.
-
-
Vicharvedh Bhag 2 (विचारवेध भाग २)
पाश्चात्त्य संस्कृतीमधील महान आणि महत्त्वाच्या संकल्पना. मानवाच्या दोन-अडीच हजार वर्षांच्या वैचारिक प्रवासात विकसित झालेल्या संकल्पना; त्यावर घडून आलेली प्रगल्भ चर्चा व मत-मतांतरे यांचा उद्बोधक आढावा. धार्मिक, सामाजिक व व्यक्तिगत जीवन क्षेत्रातील विचारसूत्रे.
-
Lalbag (लालबाग)
लालबाग! मुंबईचा एक असा सांस्कृतिक भाग, की जिथे माणसांबरोबर माणुसकीही नांदली. लालबाग-परळ-नायगाव म्हणजेच गिरणगाव हे समीकरण रूढ झालं. आधुनिक यांत्रिकीकरणामुळे, नव्या भांडवलदारांमुळे आणि 'संपा'च्या तीक्ष्ण हत्यारामुळे गिरणीकामगारांचं झालेलं शोषण, त्यांचं ध्वस्त जगणं या सर्वांचा आलेख लेखकानं या पुस्तकात मांडला आहे. त्याचबरोबर सांस्कृतिक बर्काव्यान्च्या पार्श्वभूमीवर तो मानवी व्यवहार व मनोव्यापार यांची सुरेल सांगड घालणारा आहे. आज टॉवरसंस्कृतीच्या विळख्यात जात चाललेल्या 'लालबाग'चा गेल्या आठ दशकांचा सामाजिक इतिहास साकारलेला हा ग्रंथ उल्लेखनीय दस्तऐवज ठरणार आहे.
-
Kshitijavaril Shalakaa (क्षितिजावरील शलाका)
स्त्रीला आजचे व्यक्तित्व प्राप्त झाले आणि ती 'अर्ध्या' आकाशा' वर हक्क सांगण्याइतपत समर्थ झाली, या पाठीमागे गेल्या हजार-दोन हजार वर्षांतील कर्तबगार महिलांचे कार्यकर्तुत्व आहे. त्यामध्ये क्लिओपात्रापासूनकमला सोहोनींपर्यंत अनेकींचा समावेश होतो. त्यांनी राजकारण-विज्ञानापसून दुःखितांच्या सेवेपर्यंत विविध क्षेत्रांत असाधारण कामगिरी केली आणी त्याआधारे मानवी समाजात काहीमुल्यांची प्रतिष्ठापना केली. शारदा साठे यांचे हे पुस्तक या विशाल ऐतिहासिक पटाचे चित्र उभे करते; आणि त्याबरोबर मानवी इतिहास व स्त्री-पुरुष संबंध याबद्दलचे वाचकाचे आत्मभान जागृत होत जाते.
-
Nyayalayin Vyavhaar Ani Marathi Bhasha
(यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सहकार्याने) भाषावार प्रांतरचना झाल्यानंतर, न्यायालयीन व्यवहार प्रांतिक भाषेत (लोकभाषेत) झाल्यास सर्वसामान्यांना सुलभ झाले असते. परंतु, आजही महाराष्ट्रात मराठीच्या वापराबाबत हवी तशी प्रगती नाही. यावर वेळोवेळी चर्चा-परिसंवाद झाले. विविधांगी लिखाण झाले. शासनाने ठराव मांडले व यातील अडचणींचे निराकारण करण्याचा ऊहापोह झाला. महाराष्ट्रात ‘न्यायालयीन व्यवहार आणि मराठी भाषा’ यांचा समन्वय साधण्यासाठी झालेल्या प्रयत्नांचा हा सर्वांगीण आढावा.
-
Sambhav (संभव)
भा.ज.प. आणि त्यांचे साथीदार यांनी आपल्या ‘विेशासाचा प्रश्न’ म्हणून रामराज्य भूमीचा वाद वाढवत नेला, आणि एके दिवशी या कथेची सुरुवात सुचली. मी लिहीत गेलो. मी एखादा प्रसंग लिहावा आणि कालांतराने तसेच घडावे असे झाले. हे सर्व योगायोग की चमत्कार?’’