-
Vaat Tibetchi
चीनने गिळंकृत केलेल्या तिबेटचे अनेक वैशिष्ट्यांसह वर्णन या पुस्तकात केले आहे. तसेच ड्रॅगनचे खरे रूप दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे.
-
Ekta Jiv (एकटा जीव)
दादा कोंडके, एक हजरजबाबी, विनोदी अभिनेता, द्य्वर्थी गीतं-संवाद-लेखक आणि एक यशस्वी चित्रपट निर्माता, दिग्दर्शक - दादांची हीच प्रतिमा जनमाणसात रूढ आहे; पण दादा कोंडके म्हणजे फक्त एवढंच नाही. ते एक प्रगल्भ व होतं. दादांच्या आयुष्यात प्रचंड विविधता होती. त्यांचं बालपण, तरुणपण कसं होतं? त्यांच्या जीवनात येऊन गेलेली माणसं कोण होती? दादांशी त्यांचे नातेसंबंधांच कसे होते? माणूस म्हणून दादा कसे होते अशा सर्व प्रश्नांची उत्तरं या पुस्तकात मिळतील. कारण, या पुस्तकात दादा स्वतः त्यांच्याच शब्दांत आपल्या व्यक्तिगत आणि व्यावसायिक आयुष्याबद्दल मनमोकळेपणाने सांगत आहेत.
-
-
Menduchya Antarangat
जिल टेलर या मेंदूवर संशोधन करणाऱ्या स्वतःलाच ब्रेन स्ट्रोक झाला ; त्या साक्षात्कारी अनुभवाची कथा .....
-
Shyamchi Aai
साने गुरुजींनी आपल्या लहानपणाच्या सात्विक भावनांचा क्रमश: कसा विकास होत गेला, हे मार्मिकपणे व अंत:करण हेलावून सोडतील अशा सहृदयतेने ह्या पुस्तकात वर्णन केले आहे. ‘‘श्यामची आई’’ हे पू. साने गुरुजींचे पुस्तक महाराष्ट्रात घरोघरी वाचले जाते. ह्या पुस्तकाचे वाचन करणे वा करवून घेणे हा एक सांस्कृतिक भाग झाला आहे. देवदिकांची स्तोत्रे आपण म्हणतो, आपल्या मुलांच्याकडून म्हणवून घेतो. त्याचप्रमाणे साने गुरुजींनी लिहिलेले ‘‘मातृप्रेमाचे स्तोत्र’’ घरोघरी वाचले जाते.
-
-
Kshano Kshani
वाचकप्रिय कादंबरीकर सुहास शिरवळकर यांच्या समर्थ लेखणीतून उतरलेली मनाची पकड घेणारी भन्नाट कादंबरी.